लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ येथील पोलीस उपनिरिक्षकावर हल्ला करून धमकावल्याच्या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. हे पोलीस निरीक्षक गस्तीवर होते. यातील मुख्य सूत्रधार निखील राजपूत हा अद्याप फरार असून त्याचा कसून शोध सुरू आहे. याबाबत सविस्तर असे कि तीन दिवसांपूर्वी मध्यरात्री शहरातील श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ टोळक्याने फौजदारावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक महेश धायतड यांच्या फिर्यादीनुसार निखिल राजपूतसह गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, अक्षय न्हावकर उर्फ थापा, नीलेश ठाकूर व अन्य एका अनोळखी अशा ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वच्या सर्व संशयित फरार झाले होते. त्यातील चेतन…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातीलपिंपळी जगताप येथे धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत गायरान गट क्रमांक 60 येते गरुड झेप अकॅडमी यांच्या हस्ते अडीच हजार जणांचा टप्पा पूर्ण करण्यात आला. श्री धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील गायरान गट क्रमांक ६० येथे लोकसहभागातून वृक्षारोपण करण्यात येत आहे . वृक्षारोपणाचा अडीच हजार झाडांचा टप्पा आज महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले स्पर्धा परिक्षा केंद्र गरूड झेप अकॅडमी यांच्या हस्ते पूर्ण करण्यात आला. वनराई मध्ये ४० प्रकारच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष श्री धर्मराज बोत्रे व विशाल बेंडभर यांनी दिली. गरुड झेप अकॅडमीचे पिंपळे जगताप मधील चारशे विद्यार्थ्यांनी वनराई मध्ये श्रमदान…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आम्ही 25 वर्ष जोडीने संसार केला मात्र जयंत पाटील यांना तो मोडला आहे असे उदगार ना गुलाबराव पाटील यांच्या सुपुत्र याच्या विवाहसोहळ्या वेळी आशीर्वाद रुपी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केले. ना गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र विक्रम याच्या विवाह सोहळ्याला महा विकास आघाडीचे नेते ना जयंत पाटील,ना बाळासाहेब थोरात, ना अब्दुल सत्तार,ना दादा भुसे, ना अदिती तटकरे, ना अनिल परब, ना संजय बनसोडे, ना दीपक केसरकर, ना सुनील केदार, आ मंगेश चव्हाण आ शिरीष चौधरी, आ गिरीश महाजन ,जैन इरिगेशन चे अनिल जैन, आशीर्वाद देण्यासाठी सर्व पक्षीय नेते व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी वर वधूला आशीर्वाद देण्यासाठी आ गिरीश महाजन हे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कापूस व्यापारी स्वप्नील शिंदे याच्या खून प्रकरणात एलसीबी व स्थानिक पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे यात एक पोलीस कर्मचारी असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रविण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मात्र त्यांनी आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला असून यात अजून काही आरोपी असू शकतात अशी शंका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान,पाच…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: येथील आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने यंदाचा खान्देश भूषण मोहसिन खान अजीज खान यांना देण्यात आला. शैक्षणिक/सामाजिक/ क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. २८ नोव्हेंबर रविवारी जळगाव येथील अल्पबचत भवन याठिकाणी वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार (जळगाव) हे होते तर अंकुर साहित्य परिषद सहसचिव हकीम आर चौधरी मुक्ताईनगर, लोकनियुक्त सरपंच भावना माळी अडावद, सरकारी वकील कलंतरी, अब्दुल मजीद जकरीया जळगाव, अब्दुल करीम सालार जळगाव, संभाजी ब्रिगेड चे दिनेश भाऊ कदम मुक्ताईनगर, मण्यार बिरादरी जिल्हाध्यक्ष फारूक शेख, अल्पसंख्यांक सेवा संघाचे अध्यक्ष जहांगीर खान, हाजी फजल सेठ अडावद, रि.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे उपमुख्य मंत्री ना अजित पवार हे आज जळगाव दौर्यावर येणार होते जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील सुपुत्र विक्रम याच्या विवाह निमित्त त्याला आशीर्वाद देण्यासाठी पाळधी येथे उपस्थित राहणार होते मात्र राज्यात कोरोनाचे संकट उभे राहिले असल्याने तातडीची बैठक लागल्याने त्याचा जळगाव दौरा रद्द झाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज पाळधी येथे दुपारी दोन वाजता आमदार गुलाबराव पाटील यांच्या घरी मुलाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी दिली आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कन्नड घाटातून जाणार्या अवजड वाहनधारकांकडून वसुली करण्याची बाब स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी समोर आणली होती. यातील दोषी चार कर्मचार्यांना पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबीत केले आहे. याबाबत वृत्त असे की, आमदार मंगेश चव्हाण यांनी मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत कन्नड घाटात स्टींग ऑपरेशन केले. आ मंगेश चव्हाण स्वत: ट्रक ड्रायव्हर बनले होते. तेव्हा त्यांच्याकडून पाचशे रूपयांची मागणी करण्यात आली. तसेच अन्य वाहनधारकांकडूनही याच प्रकारची वसुली करण्यात आल्याचे या स्टींगमधून दिसून आले होते. आमदारांनी याबाबत पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती., पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या प्रकरणी चौकशी करून यात दोषी आढळून आलेल्या गणेश…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराजवळ गुन्हेगारी टोळीची दहशत कायम ठेवण्याच्या हेतूने निखिल राजपूत व त्यांचे टोळीतील साथीदार यांनी पोलीस उपनिरीक्षक (प्रभारी)नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ यांचा गळा दाबून हल्ला केल्याची घटना रात्री घडली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने निखिल राजपूत सह सहा आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी महेश भास्कर घायतड पोलीस उपनिरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २७ रोजी रात्री ००:३० चे सुमारास श्रीराम नगर परिसरातील असलेल्या हनुमान मंदिराजवळ निखिल राजपूत,अक्षय न्हावकर उर्फे थापा,गोलू कोल्हे,नकुल राजपूत,आकाश पाटील,अभिषेक शर्मा,निलेश ठाकूर एक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चाळीसगाव शहरातील घाटरोड कोळीवाडा भागात राहत्या घरात शहर पोलीसांनी आज दुपारी टाकलेल्या छाप्यात सुमारे 1 लाख 66 हजार 620 रूपये किंमतीचा 11 किलो 214 ग्रॅम गांजा व रोख 58 हजार 370 रूपये असा 2 लाख 25 हजार रूपये 825 रूपयंाचा ऐवज जप्त केला आहे याप्रकरणी एका महिलेसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहर पोलीसांनी केलेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहीती अशी की, शहरातील घाटरोड, कोळीवाडा भागात गांजाविक्री होत असल्याची माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक के. के. पाटील, नायब तहसिलदार, महसुल चाळीसगांव विकास लाडवंजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले, विष्णु आव्हाड,…
क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतीदिन विशेष विशेष प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन, कार्य व विचारांचे दर्शन घडविणारा महाग्रंथ सर्वांनी जरूर वाचावा असे प्रतिपादन या ग्रंथ निर्मिती मंडळामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे एरंडोल चे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रांताधिकारी कार्यालय एरंडोल येथे गेलो असता मला विनयजी गोसावी यांच्या हस्ते क्रांतिरत्न महाग्रंथ भेट स्वरूप प्राप्त झाला. प्रसिध्द इतिहास लेखक प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. यामध्ये धरणगाव येथील शतकोत्तर शाळा प.…

