Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । बांभोरी पुलाजवळ सकाळच्या घटनेनंतर आज दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी कंटेनर अडकल्याने गेल्या दोन तासांपासून वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा थप्प झाली असून वाहनधारकांना मनस्ताप करावा लागत आहे. जळगाव येथून जवळ आलेल्या बांभोरी पुलाजवळ आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास वाळूचे ट्रक्टरचे चाक निखळल्याने राष्ट्रीय महामार्गावर ट्रक्टर बंद पडले होते. यावेळी अर्धा तास दोन्ही बाजूने असलेली वाहतूक थप्प झाली होती. शहर वाहतूक शाखा आणि तालुका पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक्टर बाजूल करून रस्ता मोकळा केला होता. ही घटना घडल्यानंतर पुन्हा दुपारी ४ वाजेच्या सुमारास हॉटेल मराठा मटन समोर महामार्गावर पुन्हा कंटेनर अडकले होते.…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज:  शहरातील रामेश्वर कॉलनीतील मेहरूण परिसरात वादातून चाकूने सपासप वार करून जखमी झालेल्या  पवन उर्फ घातक मुकुंदा सोनवणे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या गुन्ह्यात दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी परिसरातील सोळा खोल्या येथे सागर पूनम कंडारे आणि विशाल विजय सपकाळे रा. सिंध्दार्थ नगर रामेश्वर कॉलनी हे अज्ञात कारणावरून शनिवारी ४ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वाद करत होते. त्यावेळी सागर कंडारे हा मोठमोठ्याने आवाज करून तुमच्या ‘एरीयाचा दादा पवन घातक याला बोलव, तो साला खूप माजला आहे, त्याला सुध्दा बघतो’ असे ओरडत होते. त्यावेळी पवन हा त्याच्या…

Read More

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉनवेरिएंटचा पाचवा रुग्ण दिल्लीत सापडला आहे .नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आता पर्यत भारतात पाच रुग्ण आढळले आहे.यात कर्नाटकमध्ये 2, गुजरातच्या जामनगरमध्ये 1 आणि महाराष्ट्रात एक आणि आता दिल्लीत एक अशा पाच रुग्णांची नोंद झाली आहे. नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या वक्तीला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला व्यक्ती 37 वर्षांचा आहे. दिल्ली प्रशासन यामुळं सतर्क झालं आहे. टांझानियातून आला रुग्ण ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रुग्ण हा टांझानियातून आला होता. संबंधित व्यक्तीचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं आता भारतातील…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील पिंप्राळा रोड परिसरातील माहेर असलेल्या विवाहितेचा चक्क तीस लाख रुपयांसाठी पतीसह सासरच्यांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरुध्द शनिवार ४ डिसेंबर राेजी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पिंप्राळा रोड परिसरातील लक्ष्मणनगर येथील हर्षा यांचा कलकलत्ता येथील क्रिष्णेंद्र मनोरंजन कुंडू यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पती क्रिष्णेंद्र यांच्यासह सासू नणंद व नंदोई यांनी विवाहिता हर्षा हिस वेळोवेळी शिविगाळ करत मारहाण केली. तसेच माहेरहून तीस लाख रुपये आणावेत म्हणून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला कंटाळून हर्षा या माहेरी निघून आल्या. याप्रकरणी हर्षा कुंडू यांच्या तक्रारीवरून शनिवारी पती क्रिष्णेंद्र…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामसेवक शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्या म्हणून पुढे राहण्यास अपात्र घोषित करण्यात आलं आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अशोक धोंडू मराठे यांनी वरील प्रकरणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या नावाने तक्रार अर्ज केला होता. तो मंजूर करत दिलेल्या अर्जानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून कार्यवाही करण्यात आली. प्रस्तुत प्रकरणी गुरुवार, दि. २ डिसेंबर २०२१ रोजी जळगाव उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्या वतीने काढलेल्या निकालाच्या सूचना पत्रात धरणगाव तालुक्यातील बोरगाव बु. येथील ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्या मिराबाई शिवाजी पवार यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या घरात राहत असल्याचे सिद्ध झाले…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्ह्य मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गुलाबराव देवकर यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यालयात करण्यात आला. त्यावेळी “पुढील निवडणुकांमध्येही यशाची परंपरा अबाधित ठेऊया” असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि गुलाबराव देवकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. “गेल्या महिनाभरापासून निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात फिरतोय आणि त्याचे फलित म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झालेला विजय झाला.असे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने आपलं कार्य केले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण काम करू या.अधिक चांगल्या पद्धतीने ‘शेतकरी बँक’ म्हणून ओळखली जाणारी…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : धरणगाव जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ धरणगांव संचलित के.जी. गुजराथी मुक बधीर निवासी विद्यालय, मतिमंद निवासी व अनिवासी विद्यालय, मुक बधीर निवासी कार्यशाळा (I.T.T.) धरणगाव येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रमोद पाटील (माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव) यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर यांचे प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथी जयदीप पाटील सर,( दिव्यांग विभाग प्रमुख पंचायत समिती धरणगाव), विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना संतोष भडांगे सर यांनी केले. दिव्यांगांचे हक्क, अधिकार व कायदे याविषयी ॲड. संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. तुळशिराम सैंदाणे सर (वि.…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : येथील पंचायत समितीच्या वतीने ३ डिसेंबर, आंतरराष्ट्रीय (अपंग) दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगाव पं. स. चे युडीआयडी समन्वयक जयदीप पाटील यांनी डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व उपस्थित दिव्यांगांना पुष्पगुच्छ व युडीआयडी कार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मिकराव पाटील, संतोष भडांगे सर, दिपक पाटील सर, तुळशीराम सैंदाने सर आदी मान्यवरांनी दिव्यांगाच्या विविध योजनेविषयी माहिती दिली. यावेळी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सल्ला व मार्गदर्शन…

Read More

प्रतिनिधी राजेंद्र पाटील : बेकायदेशीर गावठी बनावटीचा कट्टा, तीन जिवंत काडतुस व तलवार बाळगणाऱ्या एका तरुणाला तालुका पोलिसांनी बिबा नगर येथून शुक्रवार ३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता अटक करत त्याच्या ताब्यातील गावठी बनावटीचा कट्टा व तलवार हस्तगत केली आहे, याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बिबा नगर परिसरात एक तरूण बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचा कट्टा, कडतुस आणि तलवार बाळगत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, महेश महाले, रवींद्र मोतीराया, तुषार…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: चोपडा येथे पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या विशेष पोलीस पथकाने उमर्टी येथील 36 वर्षीय इसमाला गावठी कट्टा मँगजीनसह आरोपीला अटक केली. गावठी कट्टा, काडतुसे बाळगणा-या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या विशेष पोलीस पथकाला यश आले. गुरजितसिंह अकबरसिंह बर्नाला (36),रा.उमर्टी ता.वरला जि.बडवानी (मध्य प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव असून  त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा (₹ 30000/-)रु., एक मँगजीन (₹2000 /-) असा एकुण ₹32000/ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्यावर चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गु.र.न. 215/2021 आर्म अँक्ट 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पो.नि.बापू रोहम, सहायक फौजदार, बशिर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, पोलिस…

Read More