Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नांदेड शिवारात बिबट्याचे दर्शन ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
    धरणगाव

    नांदेड शिवारात बिबट्याचे दर्शन ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 31, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील नांदेड शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक अर्ज देवूनही वनविभाग डोळे झाकून दुध पिण्याचे सोंग करत आहे.

    धरणगावातील नांदेड शिवारातील एका शेतात मध्यरात्री काही शेतकरी शेतात काम करत असतांना बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आला. यावेळी काही शेतकऱ्यांनी बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केले आहे. यापुर्वी तालुक्यातील चमगाव गावाजवळील शिवारात असलेल्या नदीच्या काठावर बिबट्याने एका वासरूचा फडश्याप पडला होता. त्यावेळी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सुचना वनविभागाला दिल्या होत्या. मात्र वनविभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे.

    गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत पाच घटना घडल्या आहेत. बिबट्या पकडण्यात वनविभागाकडून उदासिनता दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी पंचनामा करून घेवून पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जाते. बिबट्याला पकडून जेरबंद करण्याची मागणी वारंवार करूनही याकडे दुलक्ष केले जात असल्याची ओरड ग्रामस्थांकडून केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात महसूल विभागाची धडक कारवाई; १० ते १२ बेवारस वाळूसाठे जप्त

    August 21, 2026

    खरेदीसोबत बक्षिसांची बरसात! पिंप्री येथील सेवा सुपर मार्टचा लकी ड्रॉ ठरला ग्राहकांसाठी ‘डबल धमाका’

    August 20, 2026

    धरणगाव येथे १४ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.