लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : ओबीसी आरक्षण येत्या तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून ओबीसींची जनगणना करण्यात येणार असून त्यातून राजकीय आरक्षणाचा विषय सोडविण्यात येईल , तसा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जळगावात येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तीन महिन्यानतंर एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका घेता येऊ शकतील, असेही ना अजित पवार म्हणाले असून एस टी कर्मचाऱ्यांनी तुटेपर्यंत ताणू नका. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका’, अशा शब्दांत ना .अजित पवार यांनी संपात सहभागी एस.टी.कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. जळगाव येथे आज जिल्हा दौऱ्यावर आले असता सकाळी 9 वाजेला जिल्हा नियोजन भवनात आढावा बैठक संपन्न झाली .या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख अनिल बाबुलाल सूर्यवंशी यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांचेकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. पाचोरा येथील प्रो. डॉ. जिजाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंदी विषया अंतर्गत “ज्ञानप्रकाश विवेक की ग़ज़लों का चिंतनपरक अनुशीलन” या विषयावर त्यांनी पीएच.डी.चा संशोधन प्रबंध सादर केला. या पीएच.डी. संशोधन कार्यासाठी कला शाखेचे माजी आधिष्ठाता प्रा.डॉ. मधु खराटे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. अनिल बाबुलाल सूर्यवंशी यांना शिक्षण क्षेत्रातली पीएच.डी. ही उच्च पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष एड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्षा श्रीमती. आशाताई पाटील, सचिव डॉ. स्मिताताई…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी बैलगाडीच्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. अमळनेर येथील बोरी नदीपात्रात आज सकाळी पोलीस प्रशासन, महसूल व आरटीओ विभाग यांनी वाळू चोरी करणाऱ्यांवर संयुक्तरित्या कारवाई केली. बोरी नदीपात्रात बैल गाडी च्या सहाय्याने वाळू चोरी करणाऱ्यांना पकडून पोलीस बंदोबस्तात थेट तहसील कार्यालयात आणण्यात आले होते. कारवाईत जप्त केलेल्या बैल गाड्या 15 असून 30 बैल जोडी व 15 धुरकरी जमा करण्यात आले आहे याना तहसील कार्यालय येथून गुन्हे दाखल करण्यासाठी सायंकाळी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. कारवाईत टेम्पो धारकांवर वाळू चोरीचे गुन्हे दाखल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज (विशेष प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील सारंखेडा यात्रा घोडेबाजार साठी जसे प्रसिद्ध आहे तशीच ती येतील दत्त मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे यावेळी जरी घोडेबाजार भरणार असला तरी मात्र इतर दुकानांना प्रशासनाने परवानगी नाकारल्याने व्यापारी व छोटे दुकानदारांचा हिरमोड झालेला दिसत आहे. कोरोना मुळे घोडेबाजार व दत्त भगवान ची यात्रा बंद होती कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळेया वर्षी घोडेबाजार असल्याने अश्वप्रेमी खरेदीदार आणि व्यापाऱ्यांमध्ये चैतन्य दिसत आहे. मात्र प्रशासनाने इतर खेळणी साहित्य, मनोरंजनाचे, शेती साहित्य, मसाले पदार्थ दुकान, कटलरी, शीतपेये दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने आदी सर्व स्टॉल यांना परवानगी दिलेली नाही यामुळे या विक्रेत्यांचा हिरमोड झाला आहे.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुक्रवार दि.17 डिसेंबर 2021 रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे. शुक्रवार दि. 17 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.55 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 8.15 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 8.55 वा मोटारीने प्रयाण. सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी 9.00 वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा व जळगाव जिल्ह्यातील कोविड-19 विषाणू प्रादूर्भाव व उपाययोजनांचा आढावा. सकाळी 10.50 वा. मोटारीने प्रयाण. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा दुध संघाचे आवार, शिवाजीनगर, जळगाव येथे आगमन. सकाळी 11.00 वा. जळगाव जिल्हा सहकारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जळगाव व भुसावळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यासाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जळगाव उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी जिल्हा दौर्यावर येणार आहेत. जळगाव आणि भुसावळ येथे आयोजीत करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा दूध संघाच्या नवीन प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. १७ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता अजिंठा विश्रामगृहावर भेटी आणि बैठक, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर भुसावळ येथे आयोजीत कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर भुसावळ येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासह अन्य…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तत्कालीन माजी कुलगुरू पी पी पाटील यांनी विद्यापिठाचा भोंगळ कारभारामुळे व ठेकेदार यांच्या दबावाला बळी पडून अचानक राजीनामा दिला होता.तसेच लगेच संशोधन चोरी प्रकरणात असलेले माजी प्र कुलगुरू माहुलीकर सरांनी राजिनामा दिला. त्यानंतर लगेचच परीक्षा नियंत्रक बी बी पाटील व भटू प्रसाद पाटील यानी राजीनामा देऊन नाशिक ला गेले. तसेच FAO यांनी गोहील यानी आरोप करून राजीनामा दिला.तसेच प्रभारी कुलसचिव म्हणून अँड भादलीकर यांची नियुक्ती झाली होती त्यांनी देखील लगेच राजीनामा दिला . व नवीन परीक्षा नियंत्रक प्रो के एफ पवार हे आताच नियुक्त झाले होते त्यांनी आज राजीनामा दिला .ही खेदजनक बाब आहे. विद्यापीठात कोणाच्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: विज्ञान व तंत्रज्ञान विभागा अंतर्गत औषधनिर्माण क्षेत्रातल्या संशोधनात केल्या बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी. एच. डी.) प्रदान केली. संशोधन क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल “यंग सायंटिस्ट ऑफ इंडिया” या पुरस्काराने गौरविण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रा. हर्षल लिलाधर तारे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागा अंतर्गत औषधनिर्माण क्षेत्रातल्या संशोधनात “प्रीक्लीनिकल इव्हॅल्युएशन ऑफ अँटीव्हेनोम पोटेंशिअल ऑफ सिलेक्टेड मेडिसिनल प्लांट्स फ्रॉम वेस्टर्न घाट्स ऑफ इंडीया” या विषयावर त्यांनी प्रबंध सादर केला.त्यांनी केलेल्या संशोधन बद्दल डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पी. एच. डी.) प्रदान करण्यात आली. साडेसात वर्षांच्या पी. एच. डी. संशोधन कार्यकाळात त्यांनी २३ पुस्तके, १२ शोधनिबंध आणि…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील रिंगरोडवरील राहणाऱ्या मेडीकल व्यवसायीकाची दीड लाखात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, प्रसन्न नरेंद्र जैन (वय-३५) रा. चंद्रप्रभा कॉलनी रिंगरोड हे मेडीकल साहित्य खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. ९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्यात त्यांनी फार्मासीटीकल इण्डी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून आपल्याला सिरीन अर्थात इंजेक्शन पुरण्याचे काम आपण देवू इच्छीतो असे सांगितले. त्यानुसार प्रसन्न जैन यांच्या विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्यातून १…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील एका कंपनीत पतीपत्नी काम करीत होते त्याच्या काही कौटुंबिक वाद झाले असता. त्या माहेरी निघून गेले असता बँकेत पत्नीच्या बनावट सह्या आणि कागदपत्र सादर करून खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले.याप्रकरणी पतीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जोगे तांड येथील माहेर आलेल्या प्रतिभाबाई भोजू राठोड यांचा विवाह जळगाव तालुक्यातील भोजू बंद्री राठोड यांच्याशी ८ मे २०११ रोजी झाला आहे. दरम्यान लग्न झाल्यानंतर पती पत्नी हे दोन्ही जैन कंपनीत कामाला होत्या. त्यानंतर पती पत्नीचा कौटुंबिक वाद सुरू होता. हा वाद न्यायालयात पोहचल्याने प्रतिभाबाई ह्या २० मार्च २०१९…

