लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुस्लिम समाजाला शिक्षणात आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी जळगाव मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांना निवेदनव्दारे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती अतिमागास झालेली आहे. मुस्लिम हा इस्लाम धर्माचा एक समूह आहे. उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजाचे ५ टक्के शैक्षणिक आरक्षण मान्य केले होते त्यावरून ही बाब स्पष्ट झाली आहे की, मुस्लिम आरक्षणात धर्माचा अडसर नाही. महाविकास आघाडीच्या सरकारला मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीने आरक्षणासाठी वेळीवेळी निवेदनही दिले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादीचे एजाज मलिक, एमआयएमचे सनेर सय्यद, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमजद…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील पिंप्राळा भागात राहणार्या १७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू करून त्याने आपल्या आत्महत्येचे चित्रीकरण स्मार्टफोनमध्ये करून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. घनश्याम संजय भोई (वय-१७ रा. पिंप्राळा हुडको जळगाव ) या तरूणाने आज सायंकाळी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. घनश्याम भोई हा आई मंदाबाई,वडील मोठी बहिण गीता भोई यांच्यासह सेट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा परिसर जळगाव येथे वास्तव्याला आहे. आईवडील आणि मोठी बहिण हे देवाच्या कार्यक्रम असल्यामुळे मुळगावी नेरी पिंप्री जामनेर येथे गेल्याने तो घरात एकटाच होता. आज अर्थात, शुक्रवारी २४…
महाराष्ट्रात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे नियम ? लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : संपूर्ण राज्यात ओमिक्रॉनचा धोका जास्त वाढला आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. आता राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय मंत्री अनिल परब यांनी या नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी आहे. राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने गुरुवारी एकाच दिवसात 21 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांच्या दृष्टीला नवी चकाकी दिली आहे. जळगाव शहरातील विख्यात नेत्रतज्ञ डॉ वृषाली विवेक पाटील, भूलतज्ञ डॉ. स्नेहल गिरी, आॅप्थोमॅट्रेस जयेश वाल्हे, डॉ. विजय सरताळे यांच्या टीमने या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. समन्वयाचे काम डॉ. नितीन पाटील यांनी केले. रुग्णांना दुसऱ्याच दिवशी चष्मा वाटप करून घरी सोडण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून देवकर रूग्णालयात ना नफा ना तोटा तत्त्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया महाअभियान राबविले जात आहे. यात अवघ्या 2500 रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अवघ्या सहा हजार रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे. या…
जळगाव प्रतिनिधी : वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्यासह त्यांच्या कर्मचाऱ्याला थकित वीजबिल धारकाकडून शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सकाळी ११ वाजता सिंधी कॉलनी परिसरात घडला. याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दिक्षीतवाडी येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता जयेश जनीकांत तिवारी यांच्यासह कार्यालयीन सहाय्यक योगेश शेषराव जाधव, तंत्रज्ञ नमो मधुकार सोनकांबळे, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम लोंढे यांनी गुरूवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव शहरातील जोशी कॉलनी, सिंधी कॉलनी, बाबानगर परिसरात थकीत वीजबिल धारकांना विज बिल भरण्याबाबत सुचना करण्यासाठी दुपारी दीडवाजता गेले. त्यावेळी सिंधी कॉलनी येथील वीज ग्राहक टिकमदास…
प्रत्येक व्यक्तीचे समाधान हीच आमच्या कार्याची पावती – नितीनकुमार देवरे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील तहसिल कार्यालय येथे आज २४ डिसेंबर २०२१ रोजी “राष्ट्रीय ग्राहक दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज २४ डिसेंबर म्हणजेच “राष्ट्रीय ग्राहक दिनाचे” औचित्य साधून तहसिल कार्यालय धरणगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांचा तहसिल प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्राहक कल्याण फाउंडेशन चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक दिनाची पार्श्वभूमी सांगून “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. तद्नंतर अ.भा. ग्राहक…
मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक… लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा फैलाव वाढत असल्याचं राज्य सरकारची डोकेदुखी आणि नागरिकांसाठी चिंता वाढली आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 23 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक झाली. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर या बैठकीत चर्चा झाली. टास्क फोर्ससोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे सण-उत्सव लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : 17, 18 व 19 तारखेला सोलापूर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय 8 व्या स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्पर्धेत जळगाव जिल्हा टीमने चांगले प्रदर्शन करत घवघवीत यश मिळवले आहे. जळगाव जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्याने सोलापूर येथे राज्यस्तरीय स्पर्धेत नेतृत्व केले. स्पर्धेत जळगाव जिल्हा टीम तर्फे कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, धावणे, आर्चरी, स्विमिंग, बॅडमिंटन,चेस व गोळा फेक या स्पर्धेत जिल्हाभरातून 98 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात व्हॉलीबॉल टीम (चोपडा) ला सिल्व्हर मेडल, स्विमींग मध्ये ऋषिकेश पाटील (चोपडा) गोल्ड मेडल, चेस स्पर्धेत मध्ये राहुल लोहार यांना गोल्ड मेडल (चोपडा),…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात २३ तरूणींची सुटका करण्यात आली आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक ऋषीकेश रावले यांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक रावले यांच्या माहितीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह पथकाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जामनेर तालुक्यातील पाचोरा रस्त्याकडे जाणाऱ्या टाकळी गावाजवळ नागदेवता मंदिर परिसरात भरधाव जाणाऱ्या आयशर वाहनाने इंडिका कारला कट मारल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. इंडिका कार नाल्यात कोसळून त्यातील एक पुरुष व महिला जागीच ठार झाले उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाला आहे आज रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यात आणखी 2 जण अत्यवस्थ असून सहा महिन्याचे बाळ अपघातातून वाचले आहे. याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील नागरिक पाचोराच्या दिशेने लग्नकार्याच्या निमित्ताने इंडिगो कार क्र. (एम एच १८ डब्ल्यू २४१२) ने निघाले होते.कार पकंज गोविंदा सैंदाणे (वय-२५, रा. तुकाराम नगर, भुसावळ) हे चालवत होते. कारमध्ये सुजाता…

