नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.समीना बानो शेख अफसर (वय-२१) रा. नशिराबाद ता.जि. जळगाव असे मयत तरूणीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, समीना बानो ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी विवाहितेने राहत्या घरात कुणीही नसतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे की, “माझ्याकडून…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पोलीस नाईक व त्यांचा मुलगा जखमी झाले आहे.. याप्रकरणी ळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुलाब नामदेव माळी (वय-४३) रा. श्री रेसिडन्सी अपार्टमेंट, वाटीका श्रम जळगाव हे जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नोकरीला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता गुलाब माळी हे मुलगा पियुष माळी यांच्या सोबत दुचाकी (एमएच १९ डीके ९५२५) ने राष्ट्रीय महामार्गावरून घरी जात होते. त्यावेळी मागुन अज्ञात दुचाकीने भरधाव वेगाने येवून जोरदार धडक दिली. या अपघातात गुलाब माळी आणि त्यांचा मुलगा पियुष माळी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील आमोदा शिवारातून एकाची २० हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, छगन काशिनाथ भालेराव (वय-५२) रा. ओम नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते तालुक्यातील हातेड शिवारात मित्राला भेटण्यासाठी दुचाकी (एमएच १९ ए क्यू २९५४) ने गेले होते. त्यावेळी त्यांनी शेताच्या बंधावर दुचाकी पार्किंग करून लावली होती. रात्री १० घरी परतत असतांना त्यांना दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी तीन ते चार दिवस दुचाकीची शोधाशोध केली परंतू कुठेच…
बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील वाकी येथील एका तरूणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष सुभाष मगरे (वय-३५) रा. वाकी ता. बोदवड ह.मु. चिंचोली ता. मुक्ताईनगर असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष मगरे हा मंगळवारी ४ जानेवारी रोजी बोदवड तालुक्यातील वाकी शिवारातील केशव दौलत पाटील यांच्या शेतात कामानिमित्त गेला होता. दरम्यान शेतातील बांधावर असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आज बुधवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मयत तरूणाचे वडील सुभाष मगरे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण ३९ बाधित रूग्ण आढळून आले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकुण ३९ रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात १७, भुसावळ तालुका-९, अमळनेर-१, चोपडा-३, एरंडोल-४, चाळीसगाव-५ असे एकुण ३९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ९०६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आता ९१ बाधित रूग्ण संख्या झाली असून विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आता कोरोना रूग्ण संख्या…
मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवरीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे सर्व परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची दिली आहे. राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी…
प्रतिनिधी प्रविण पाटील । जळगाव तालुका शेतकरी सल्लागार समितीची पहिली सभा मंगळवारी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील कृषी कार्यालयात बैठक घेण्यात आली. ही बैठक समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जळगाव तालुका समिती सदस्य विलास पाटील, चंद्रकांत पाटील, नामदेव बिऱ्हाडे, नंदु पाटील, संजय माले, जितेंद्र पोळ, नारायण चव्हाण, जिजाबाई सोनवणे, संगीता बोंडे, सुरेखा देशमुख, निर्मला चव्हाण तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी पोकरा या योजनेबाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी आत्मा योजनेअंतर्गत समितीचे कार्याबाबत उपस्थित सर्व सदस्यांना माहिती दिली. या बैठकीला मंडळ कृषी अधिकारी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्यासह पथकाने शहरातील ९ ठिकाणी छापेमारी केली. ९ जुगार अड्ड्यावर कारवाई करून २९ जुगारांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ४१ हजार ९४२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकाने ९ ठिकाणी छापेमारी करून पोलीसांनी रोकड व मुद्देमाल जप्त केला. यात ९० हजार ९४२…
पालकमंत्र्यांच्या हस्ते तरडे व अहिरे येथे शेतरस्त्यांसह विकासकामांचा शुभारंभ ! धरणगाव प्रतिनिधी : मतदारसंघातील प्रत्येक गावातील शेत-शिवारांना जोडण्यासह नागरिकांसाठी आवश्यक असणार्या सर्व विकासकामांना आता प्रचंड गती मिळालेली आहे. विकासात कोणताही भेदभाव करण्यात येत नसून ग्रामस्थांनी आता कामे सुचवल्यास त्यांना तात्काळ निधी प्रदान करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील तरडे आणि अहिरे बुद्रुक या गावांमध्ये शेतरस्त्यांचे डांबरीकरण आणि अन्य सुमारे १ कोटी ३० लक्ष रूपयांच्या कामांचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शेत रस्त्यांच्या कामांना विशेष करून प्राधान्य देण्यात येत असल्याचे आवर्जून नमूद केले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव तालुक्यातील तरडे आणि…
जळगाव प्रतिनिधी । आकाशवाणी चौकातून पायी जाणाऱ्या तरूणाचा हातातून मोबाईल अज्ञात तीन जणांनी हिसकावून दुचाकीवरून धुमस्टाईल लांबविला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, कल्पेश चंद्रकिरण सपकाळे (वय-२१) रा.गंधर्व कॉलनी, माधव मंदिराजवळ जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकाकडून पायी जात असताना टीव्हीएस कंपनीच्या मोटरसायकली वरून अज्ञात तीन येवून कल्पेश सपकाळे यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला व दुचाकीने तीघे पसार झाले. याप्रकरणी रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कल्पेश सपकाळे याच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात तीन…

