लाईव्ह महाराष्ट्र न्यूज | जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना आज रात्री घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याशी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि गैरवर्तणुक केल्याने या वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसा आधीच राष्ट्रवादीने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. तर शिवसेना पदाधिकार्यांनीही निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर मुक्ताईनगरात फेसबुकवरील कॉमेंटच्या माध्यमातून झालेल्या वादात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत. यातच…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : व्यसनी पतीकडून सतत मारहाण व शिविगाळीने कंटाळून 46 वर्षीय विवाहितेने पतीचा खून केल्याची घटना भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरमध्ये ( हनुमान मंदिरामागे ) घडली. विशेष म्हणजे आरोपी पत्नीचं असल्याचे एका वर्षांनंतर पोलिसांनी निष्पन्न केले. या घटनेत गणेश प्रभाकर महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. आरोपी पत्नी सीमा महाजन (46, ) हिला पोलिसांनी अटक केली आहे. वर्षभरापूर्वी ही घटना घडली असली तरी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकस्मात मृत्यूच्या अहवालाची बारकाईने तपासणी केल्यानंतर मयताची आत्महत्या नसून खून असल्याचा निष्कर्ष काढला होता बारकाईने झालेल्या पोलिस तपासानंतर मयताचा खून झाल्याची बाब स्पष्ट झाली. भाजीपाला विक्री…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- जामनेर तालुक्यातील कुंभारी सीम शिवारातील शेतात काम करणाऱ्या सालदाराच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. कुंभारी सीम येथील पोलीस पाटील योगेश रमेश पाटील यांचे काका सुरेश गंगाराम पाटील यांच्या शेतात वर्षभरापासून मूळचा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मुंडिया ( पोस्ट – चिरिया ) येथील रहिवाशी दरबार मिठाराम बारेला ( पावरा , वय ५५ ) सालदार म्हणून कामाला आहे . तो शेतातच कुटुंबियांसह राहतो . या दाम्पत्याला ४ मुले आणि ३ मुली मिळून ७ अपत्ये आहेत . या दाम्पत्याला दारूचे व्यसन असल्याचेही सांगण्यात आले. किरकोळ वादातून त्यांच्या नेहमी भांडणे होत असत . आज सकाळी शेतमालक सुरेश…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील कॅफेत संदर्भात वृत्त वाहिनीवर बातमी चालविल्याने जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना धमकविणाऱ्या व्यक्तींवर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक याना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्व्हल कॅफेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅफेत दोन युगल देखील मिळून आले. संबंधित कॅफे चालकावर कारवाई देखील करण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती आणि अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. नंतर संपादक आनंद शर्मा यांना सदर व्हिडीओ वृत्त हटविणे संदर्भात किंवा कारवाई करण्याची धमकी देणारे…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील पष्टाणे गावातील ग्रामस्थांनी जाती – पाती भेद विसरून एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा ठराव एकमताने संमत करून ऐतिहासिक निर्णय २३/१२/२०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, घरकुल ड यादी एकही नाव न वगळता पहिल्या ७ लोकांना प्राधान्य देण्यात आले. तसेच येणाऱ्या १ जानेवारी २०२२ या नवीन वर्षापासून यापुढे होणारे सर्व अंत्यविधी सोनवद रोड कडील बांधकाम असलेल्या स्मशातभूमीत होतील. नवीन वर्षात त्या स्मशानभूमीत मुरूम टाकून भर करून रंगकाम व डागडुजी करून रिपेरिंग करण्यात येईल. यापुढे उखळवाडी रस्त्यालगत असणाऱ्या स्मशानभूमीत कोणीही अंत्यविधी करणार नाही. येणाऱ्या ३१ डिसेंबर नंत्तर तिला पाडण्यात येईल तसेच सुरेश…
धरणगाव तहसिल पथकाने आवळल्या रेती माफियांच्या मुसक्या धरणगाव लक्ष्मण पाटील : (२५ डिसेंबर) तालुक्यामध्ये अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या बातम्या येत असताना, त्या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालय पथकाने प्रांत अधिकारी एरंडोल विनय गोसावी व तहसिलदार नितीनकुमार देवरे यांच्या नेतृत्वात तलाठी सचिन कलोरे, अल्ताफ पठाण, महसूल सहाय्यक गणेश पवार, पंकज शिंदे, कोतवाल नारायण सोनवणे, अस्लम पटेल यांनी मध्यरात्री ट्रॅक्टर मध्ये गाद्या टाकून व त्यामध्ये बसून सरळ रेती माफियांचे रूप घेऊन बांभोरी प्र चा याठिकाणी गिरणा नदी पात्रात प्रवेश केला. तहसिल कार्यालय आणि पथकावर पाळत ठेवणाऱ्या रेती माफियांच्या नकळत नदीपात्रात सदर पथक मध्यरात्री १२ वाजून १० मिनिटांनी पोहोचल्यामुळे रेती माफियांची एकच दाणादाण…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : संपूर्ण राज्यात ओमिक्रॉनचा धोका जास्त वाढला आहे. ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. आता राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली होती.शासनाच्या आदेशाला अनुसरून जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन आदेश जारी केले आहेत. अशी असेल नियमावली संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या वाढत असून जिल्हा प्रशासन याच्या प्रतिकारासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून शासकीय रूग्णालयांमधील अग्नीशामन यंत्रणेसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर याला परतून लावण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत आणि स्वयंचलीत अग्नीशामन यंत्रणा उभारण्यासाठी ६ कोटी ५० लक्ष १८ हजार ४९९ रूपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ३ उपजिल्हा, १७ ग्रामीण, एक कुटीर व २ ट्रामा केअर…
प्रतिनिधी प्रविण पाटील: नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे आदिवासी मजुरांवर झालेल्या सामाजिक बहिष्कार व मारहाणीत संदर्भात एकलव्य संघटनेने जिल्ह्यात निवेदन देण्यात आले . नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे 17 रोजी आदिवासी मजुरांवर झालेल्या सामाजिक बहिष्कार व मारहाणीत संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की देण्यात आले दिनांक 17 रोजी नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील लखमापुर येथे निंदनीय घटना घडली शेतकऱ्यांनी व ग्रामपंचायत यांनी मिळून नियमावली करण्यात आली होती की, आदिवासी शेतमजुर आपल्याकडे कमी मजुरीवर कामावर आले नाही तर त्यांच्यावर पुर्ण गावातुन सामाजिक बहिष्कार टाकण्यात येईल, असे लेखी पत्र काढुन व जे काही आदिवासी महिला दुसऱ्याकडे कामाला जात असतांना…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या परस्पर तक्रारीवरून वाद निर्माण झाला असून या वादात रोहिणी खडसे यांनी वादग्रस्त स्टेटमेंट केल्यामुळे आज सायंकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अप्पर पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन आपल्या जिवाला एकनाथराव खडसे व ऍडव्होकेट रोहिनी खडसे यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला दिली याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात फेसबुक वरील एका पोस्ट वरून वाद निर्माण झाला या वादातून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल झाले आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असता असेच सुरु राहिले तरं उद्या आम्ही…

