जळगाव प्रतिनिधी । पत्नीला मारहाण करून खून करणाऱ्या पतीला जळगाव जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांनी दिला आहे.अनिल चावदस सपकाळे वय ३० रा. शिक्षक कॉलनी जामनेर असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, ३ फेब्रुवारी रोजी जामनेर येथे शिक्षक कॉलनीत अनिल चावदस सपकाळे याने त्याची पत्नी मनिषा सपकाळे हिच्या डोक्यात मारहाण करत गंभीर दुखापत केली. उपचार सुरु असतांना दुसर्या दिवशी ४ फेब्रुवारी मनिषा हिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मनिषाची आई प्रभाबाई निना कोळी यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा न्यायालयात प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोरोना अहवालात दिवसात एकुण ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर एक बाधित रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. जळगाव जिल्ह्यात आत दिवसभरात एकुण ४६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर- १५, भुसावळ-२१, अमळनेर-२, धरणगाव-१, एरंडोल-३, रावेर-१, चाळीसगाव-३ असे एकुण ४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज दिवसभरातून जिल्ह्यात एक रूग्ण बरा होवून घरी गेला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाखप ४२ हजार ९५२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३७ रूग्ण बरे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। राज्य शासनाच्या वतीने शासकीय व निमशासकीय कार्यालयात परिपत्रकानुसार महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात याव्यात अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देवून केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासकीय व निमशासकीय कार्यालयात महापुरुषांच्या जयंत्या साज-या करण्यात येत असतात, परंतु नविन जीआर नुसार काही महापुरुषांची नवीन नावे समाविष्ट करण्यात आली आहेत, परंतु मागील वर्षी आमच्या निदर्शनास असे आले कि, कार्यालयाला सुटीचे दिवस असल्याने कर्मचारी, अधिकारी न येणे तसेच संबंधित महापुरुषांच्या प्रतिमा उपलब्ध नसने,या कारणांमुळे मागिल दोन,तीन वर्षे पासुन बरेच शे महापुरुषांची जयंती साजरी होत नाही असेआम्हाला स्थानिक पातळीवर निदर्शनास येत आहे,तरी हा महापुरुषांच्या…
जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील हुडको भागात राहणाऱ्या तरूणाला किरकोळ कारणावरून लोखंडी पट्टीने डोक्यावर मारून जखमी केले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन रमेश पाटील (वय-२४) रा. हुडको शिवाजी नगर जळगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गजानन पाटील हा मजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. त्याच्यासोबत बबलु जोहरे रा. हुडको हा देखील राहतो. दरम्यान मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गजानन पाटील आणि बबलु जोहरे यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात बबलू जोहेरे हा दारूच्या नशेत गजाननला शिवीगाळ करून मारहाण करून डोक्यात लोखंडी पट्टी टाकली.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सच्या आवारात हातात तीक्ष्ण हत्यार घेवून विद्यार्थ्यांना धमकावून दहशत निर्माण करत पैसे मागणाऱ्या तरूणाला गुरूवारी सकाळी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स परिसरात गुरूवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कृष्णा सुभाष ठाकूर (वय-२४,रा.वाल्मिक नगर जळगाव) हा नशेत असतांना हातात तिक्ष्ण हत्यार घेवून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरीक व विद्यार्थी, विद्यार्थींनींना पैसे मागवून धमकावत होता. यावेळी काहीनी त्याला हुलकावून लावले असता त्यांच्यापाठीमागे लागून त्यांना तिक्ष्ण हत्याराचा धाक दाखत होता. यावेळी काही नागरीकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव शहरातील मेहरूणमधील महादेव मंदीराजवळील कंजरवाडा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात आज गुरूवारी जेसीबीद्वारे नाल्यावर अतिक्रमण असलेले घरे तोडण्यात आली. सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक महिन्यांपासून मेहरूण मधील महादेव मदीराजवळील कंजरवाडा परिसरात असलेल्या नाल्याजवळ आधिक राहिवाश्यांनी अतिक्रमण करत रहिवास वाढविला होता. पावसाळ्याच्या दिवसात मेहरूण तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर हा नाला ओसंडून वाहतो. या नाल्यामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरते. कोणतीही दुदैवी घटना घडू नये, यासाठी अतिक्रमण विभागाने ही कारवाई सुरू केले आहे. यापुर्वी महापालिकेच्या वतीने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आले होते. बुधवारी ५ जानेवारी रोजी अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे…
ज्ञानमंदिरी हे ज्ञान अज्ञ गोरगरीबांना वाटणे म्हणजे सुंदर जगाची निर्मिती. लक्ष्मण पाटील प्रतिनिधी:- धरणगाव नगरपरिषदेच्या सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेस सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जेष्ठ विचारवंत व लेखक मा.जयसिंगराव वाघ, प्रसिद्ध कवी लेखक समीक्षक तथा व्यंगचित्रकार मा.प्रा.बी.एन.चौधरी, शिवसेना सह संपर्क प्रमुख मा.गुलाबरावजी वाघ,लोकनियुक्त नगराध्यक्ष व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.निलेश भाऊ चौधरी,उप नगराध्यक्षा सौ. कल्पना विलास महाजन व माळी समाजाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.विठोबा नामदेव महाजन चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.भानुदासजी विसावे व शिवसेना शहर प्रमुख मा.राजेंद्र महाजन हे उपस्थित होते. सर्व प्रथम प्रास्ताविकेत मा.गुलाबरावजी वाघ यांनी माईंनी केलेल्या कार्याचा…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव जिल्ह्यामध्ये अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘सिंधूताई सपकाळ’ यांचे मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटाने ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने हजारो अनाथ बालकांची माय हरपली असल्याकारणाने महाराष्ट्र मध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अभाविप तर्फे जिल्हाभरात माईंना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जिल्ह्यात जळगाव, महानगरांमध्ये नूतन मराठा महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एरंडोल येथील डी.डी.एस.पी महाविद्यालयामध्ये माईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य तसेच महाविद्यालयीन सर्व विद्यार्थी उपस्थित होते. अमळनेर तालुक्यामध्ये प्रताप महाविद्यालय…
धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथील वृद्ध जगन्नाथ तुकाराम धनगर यांच्या मुलांनी त्यांना अंधारात ठेवून शेतजमीन परस्पर नावावर करून दिल्याने हतबल झालेल्या वृध्दाने तहसीलदारांचे दार ठोठावले. वृध्दांची कहाणी तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी ऐकल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. सविस्तर माहिती अशी की, जगन्नाथ मोतीराम धनगर रा. गुजराती गल्ली, धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांना दिलीप धनगर, गोविंदा धनगर आणि अरूण धनगर ही तीन मुले आहे. दरम्यान तिन्ही मुलांनी त्यांना अंधारात ठेवून सन २०१९ कोऱ्या कागदावर अंगठा परस्पर टेकवून घेतला व त्यांच्या नावे असलेली धरणगाव तालुक्यातील बोरगांव शिवारातील गट नं ११७/१ क्षेत्र ०.९७ आर व ११७ क्षेत्र ३.०५ हे.…
जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यासाठी स्वस्त धान्य दुकानातून दिव्यांग बांधवांना ३५ किलो धान्य वाटपाचे आदेश मिळाला असून दिव्यांगांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित ठेवण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व स्मरणपत्र देवून देखील न्याय मिळाला नाही. म्हणून बांधव्यांच्या हक्कासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग सेनेतर्फे उपोषण करण्यात येत आहे. दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाकडून दि.१ जानेवारी २०२१ पासून अध्यादेश काढण्यात आलेला असून सदरील अध्यादेशानुसार घरातील कुठल्याही दिव्यांग व्यक्तीचे शिधापत्रिकेत नाव असल्यास संबंधिताचे संपूर्ण कुटुंबाला ३५ किलो धान्य वाटप करण्यात यावे. असे असतांना जळगाव शहरातील व जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानादारांकडून सदरील अध्यादेशाची उघड-उघड पायमल्ली होत असून दिव्यांगांना त्यांच्या…

