लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : धरणगाव तालुक्यातील नांदेड शिवारात बिबट्या दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक अर्ज देवूनही वनविभाग डोळे झाकून दुध पिण्याचे सोंग करत आहे. धरणगावातील नांदेड शिवारातील एका शेतात मध्यरात्री काही शेतकरी शेतात काम करत असतांना बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आला. यावेळी काही शेतकऱ्यांनी बिबट्याला मोबाईलमध्ये कैद केले आहे. यापुर्वी तालुक्यातील चमगाव गावाजवळील शिवारात असलेल्या नदीच्या काठावर बिबट्याने एका वासरूचा फडश्याप पडला होता. त्यावेळी तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या सुचना वनविभागाला दिल्या होत्या. मात्र वनविभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत पाच घटना घडल्या आहेत. बिबट्या…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार आज गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील एमआयडीसी भागांमध्ये अवैधरीत्या बायो डिझेल ट्रक चालकांना विक्री करण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईत 68 हजार 800 रुपयांचे बायोडिझेल व दोन वाहने व तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी भागात अवैध बायोडिझेलची विक्री होत आहे त्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशाप्रमाणे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे प्रभारी अमोल मोरे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे मुदस्सर काझी योगेश बारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशलिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात सलग दुसऱ्या गुरुवारी 21 रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको शस्त्रक्रियांचा विक्रम करण्यात आला. पुढील गुरुवारी देखील 21 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. रुग्णालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या मोतिबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, मोफत नेत्र तपासणीसाठी दररोज रुग्णांची गर्दी वाढत आहे. तसेच रुग्णांकडून या महाअभियानाचे कौतुक केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हे अभियान राबविले जात असून यात 2500 रुपयात मोतीबिंदू व 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे. तपासणी पूर्णपणे मोफत या महाअभियानांतर्गत ना नफा ना तोटा तत्त्वावर अभियान राबविले जात असल्याने…
चाळीसगांव प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार, आमदार यांच्यासह चार ते पाच हजार जमावांवर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याबाबत वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शहरातील सिग्नल चौकात काल दुपारी २ ते ४ वाजताच्या सुमारास करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र पाटील, नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक शेख चिरागउद्दीन…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ‘ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकरण मोठ्याप्रमाणात समोर येत आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाहनातून होणारी गांजा तस्करी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गस्तीदरम्यान रोखत 33 किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी धुळ्यातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी मध्यरात्री बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, हवालदार लतीफ शेख, कॉन्स्टेबल प्रणय पवार हे रेल्वे स्टेशन परीसरात नाकाबंदी करीत असताना मध्यरात्री 2.25 वाजेच्या सुमारास मारोती स्वीप्ट क्रमांक एम.एच.01 बी.टी.6682 हिची तपासणी केली असता वाहनातील दोघांची हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने वाहनाची डिक्की उघडली असता त्यात प्लॅस्टीक बॅग उघडल्यानंतर त्यात गांजा आढळल्याने वाहनासह…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : महाविकास आघाडी सरकारला राज्यात दोन वर्ष पुर्ण होत आहे. यात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद मिळून दोन वर्ष पुर्ण झाले आहे. या निमित्ताने शिवसेनेचे उपनेते पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा दोनगावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर राघो पाटील यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाना सोनवणे, रविंद्र चव्हाण, जळगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, नगरसेवक मनोज चौधरी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील भादली खुर्द येथील शेतकऱ्याला काहीही कारण नसतांना सहा जणांना बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरी लूट केल्याप्रकार घडला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहीती अशी की, निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भादली खुर्द ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता किनोद येथे गेले होते. पैसे घेतल्यानंतर ते कठोरा गावाच्या मार्गाने भादली खूर्द येथे…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। शहरातील शांतीनगर येथे एका घरातून अज्ञात चोरट्याने रोकड आणि दागिने लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, कैलास बाबुराव चव्हाण (वय-४०) रा. शांतीनगर पोतदार शाळेच्या मागे, सावखेडा शिवार जळगाव हे मजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ ते २९ डिसेंबर रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील ६० हजार रुपयांची रोकड आणि १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कैलास चव्हाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून २९ डिसेंबर…
धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ॲड.रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ व हल्लेखोरांवर कारवाई करणे बाबत निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, तालुका अध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, माजी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील, सामाजिक न्याय अध्यक्ष अरविंद मानकरी, जिल्हा सरचिटणीस एन. डी. पाटील, तालुका कार्य अध्यक्ष अरविंद देवरे, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा पाटील, प्रदीप पाटील, दोनगाव सरपंच क्रांतिकुमार कोळी, सागर वाजपेयी, सिताराम मराठे, शामकांत पाटील, शालीग्राम पाटील, धनराज पाटील, गौतम सैंदाने, आकाश राणे, बिलखेडा सरपंच…

