जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजीव गांधी नगरातील ४० वर्षीय विवाहीतेवर दारुच्या नशेत पतीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ७ जानेवारी रोजी घडली. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, संगिता रमेश झेंडे (वय-४०) या राजीव गांधीनगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्याचे पती रमेश बाबासाहेब झेंडे हा काल संध्याकाळी दारुच्या नशेत घरी आला. काहीएक कारण नसतांना वाद घालून पत्न संगिताला लोखंडी पट्टीने हल्ला चढवून खांद्यावर, डाव्या बरगडीवर, मनगटावर जखमी करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली. जखमीच्या तक्रारीवरुन संशयीत पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस नाईक चंद्रकांत पाटिल करत आहेत.
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पालकमंत्र्यांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसांना मदत वाटप धरणगाव प्रतिनिधी : आज अत्यंत विपरीत स्थिती असली तरी कुणी जीवन संपविण्याचा प्रयत्न करता कामा नये. दिवस हे परिक्षा घेणारे आणि संघर्षाचे असले तरी राज्य शासन हे शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत १५ महिलांना प्रत्येकी २० हजार रूपयांच्या सहायता धनादेशाचे वितरण आणि आत्महत्याग्रस्त ३ शेतकर्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रूपये शासकीय मदतीने वाटप करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वर्षे वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या…
धरणगाव लक्ष्मण पाटील : शासकिय विश्राम गृह धरणगाव येथे धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माल्यार्पण प्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. तत्पुर्वी, अधिकृत पत्रकार संघाचे अधिकृत तालुकाध्यक्ष ऍड. वसंतराव भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मण माळी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. याप्रसंगी धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष व सदस्य ऍड.वसंतराव भोलाने, लक्ष्मण माळी, कडू महाजन (तरुण भारत), धर्मराज मोरे (पुण्यनगरी), भगीरथ माळी (जागर जनस्थान), बी.आर.महाजन (दिव्य मराठी), जितेंद्र महाजन (लोकनायक), आर.डी. महाजन (लोकमत), अविनाश बाविस्कर (LIVE TREND), बाळासाहेब प्रभूदास जाधव (सामना),…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथे ‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून ‘तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले होते या स्पर्धेत म्हसावद येथील थेपडे विद्यालयातील विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे. ‘तालुका मुख्याध्यापक संघ’ यांच्याकडून जळगाव येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत म्हसावद येथील स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील स्पर्धेच्या दुसऱ्या गटात इयत्ता दहावीतील सेजल संजय झवर हिने द्वितीय तर उच्च माध्यमिक विभागातील तिसऱ्या गटात बारावीतील प्रतिभा ज्ञानेश्वर पाटीलने प्रथम तर प्रियंका ज्ञानेश्वर मराठेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. सर्व विजयी स्पर्धकांचे संस्थेचे चेअरमन डॉ.केदार थेपडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनार, उपमुख्याध्यापक श्री.बच्छाव, पर्यवेक्षक श्री.भंगाळे, ज्यू.कॉलेजमधून…
पालकमंत्र्यांच्या हस्ते म्हसावद व चिंचोली येथे शासकीय भरड धान्य खरेदीस प्रारंभ ! जळगाव प्रतिनिधी । राज्य शासन हमी भावाने धान्य खरेदी करत असल्याने शेतकर्यांना वाजवी दर मिळून त्यांना लाभ होत आहे. तर धान्य दीर्घ काळापर्यंत सुरक्षित टिकवण्यासाठी गोदाम आवश्यक असून म्हसावद येथे गोदामाच्या बांधकामासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते तालुक्यातील म्हसावद येथे शेतकी संघातर्फे शासकीय भरडधान्य योजनेचा शुभारंभ करतांना बोलत होते. याप्रसंगी त्यांनी शेतकी संघाने धान्य खरेदीच्या माध्यमातून शेतकर्यांना उत्तम भाव देतांनाच संस्थात्मक पातळीवर नफा मिळवल्याबद्दल कौतुक केले. तर यानंतर चिंचोली येथे कृषी औद्योगिक सेवा सहकारी संस्थेतर्फे शासकीय धान्य खरेदीचा शुभारंभ पालकमंत्र्यांनी…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी कळमसरा (ता. पाचोरा) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. कळमसरा येथील सरपंच अशोक चौधरी व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबिर आयोजित केले आहे. शिबिरात डॉ. मनोज पाटील (न्यूरोलॉजिस्ट), डॉ अतुल भारंबे (कॅन्सर तज्ञ), डॉ श्रीराम महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ अभिजित पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. अनुश्री व्ही (एम. डी. मेडिसीन), डॉ वृषाली पाटील (नेत्ररोग…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्हा कोवीड प्रशासनाने शुक्रवारी पाठविलेल्या कोरेाना अहवाला दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. जळगाव जिल्ह्यात आज शुक्रवार ७ जानेवारी रोजी दिवसभरात एकुण ८८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहर -३१, भुसावळ तालुका-२४, चोपडा-२७, यावल-२, रावेर-१, चाळीसगाव -३ असे एकुण ८८ बाधित रूग्ण आढळले आहे. आता जिल्ह्यात २२३ बाधित रूग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ४० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील तरूणाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमोल छगन सपकाळे (वय-३१) रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. अमोल हा भाऊ रविंद्र आणि आई विजूबाई यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी आणि वाहन चालकाचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता आईला गावाला जावून येतो असे सांगून घराबाहेर निघाला. अमोल हा गावाला न जाता आव्हाणे शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ३००/ ३७ ते ३२६ या दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्यातील विविध शासकीय विभागावर दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविले आहे. स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दिशा स्पर्धा परिक्षा केंद्राच्या वतीने करण्यात आला आहे. यांचा झाला सत्कार माधव पवार, कैलास पाटील (नवी मुंबई पोलीस), आरती पाटील, वसंत मारणार (नंदूरबार पोलीस), भटेसिंग पाटील (आरबीआय सुरक्षारक्षक), यश पाटील, योगीता वर्मा, जयश्री बिऱ्हाडे (नवी मुंबई चालक) यांची निवड झाल्याचे मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी यांची उपस्थितीयाप्रसंगी प्रा.वासुदेव पाटील, प्रा.मदन बनसोडे, प्रा.उमेश सूर्यवंशी, प्रा.कपिलदेव कोळी, प्रा.ललित विसपुते, राजेंद्र वाघमारे, प्रा.आर. के.पाटील, प्रा.डॉ. अविंत पाटील, प्रा. प्रवीण पाटील यांची उपस्थिती होती.
फैजूपर प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरात ६ वर्षीय चिमुकल्याचा गळा दाबून खून करून बापाची गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी उघडकीला आली. याप्रकरणी फैजपूर पोलीसात नोंद करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, निलेश घनश्याम बखाल (वय-३५) रा. विवरे ता. रावेर ह.मु. बसस्थानकच्या मागे मिरची ग्राऊंड, फैजपूर ता. यावल हे आपल्या पत्नी व सहा वर्षाचा मुलगा आर्यन सोबत वास्तव्याला आहे. फैजपूर शहरातील बापू डेअरीचे संचालक आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास त्यांनी पत्नीला बाजार व किराणा आणण्यासाठी बाजारात सोडले. त्यानंतर ते घरी गेले. दरम्यान ११.३० ते १२ वाजेच्या सुमारास त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद…

