जळगाव प्रतिनिधी । शहरातील टागोरनगरातील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचा छळ करणार्या पतीसह पाच जणांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील टागोरनगरातील माहेर असलेली ज्योती राहूल खरे (वय ३०) यांचे महाबळ परिसरातील समता नगरातील राहूल खरे यांच्यासोबत २५ मे २०११ रोजी विवाह झाला आहे. लग्नानंतर १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पती राहूल भिका खरे यांच्या सासरकडच्या मंडळींनी वेळोवेळी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. त्रास असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या होत्या. याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पती राहूल भिका खरे, सासरे भिका भावडू खरे, सासू चंद्रकला…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा स्पार्किंगमुळे शेतातील ऊसाला आग लागली. या आगीत दोन जणांच्या शेतातील सुमारे १० लाख रुपयांचा ऊस जळून खाक झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात नोंद करण्यात आली.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील वाहिद रज्जाक पिंजारी वय-४३ रा. म्हसावद हे शेतीकरुन उदनिर्वाह करतात. त्यांचे नशिराबाद शिवारात शेत असून गुरुवारी ३० रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतात काम करीत होते. याचवेळी त्यांच्या शेतालगत असलेल्या भुषण भागवत राणे यांच्या शेतातून विजेचे तार गेले आहे. वादळामुळे वीजतारांचा एकमेकांना स्पर्श झाला आणि त्यामुळे राणे यांच्या शेतातील ऊसाला आग लागली. बघताच आगीने रौद्ररुप धारण करीत शेजातील वहीद पिंजारी यांच्या…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ येथील आ. संजय सावकारे यांची कार परस्पर परिवहन मंत्र्यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याबाबत आ. सावकारे यांची आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडे तक्रार करु चौकशीची मागणी केली होती. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या फिर्यादीवरुन जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची (एम.एच.१९-सी-झेड-५१३०) या क्रमांकाची टोयोटा कंपनीची अलिशान गाडी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी परिवहन विभागाच्या पोर्टलवर अनधिकृतपणे प्रवेश करीत बनावट स्वाक्षरी, बनावट कागदपत्रांच्या आधारावर चक्क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्स्फर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार…
लाचखोरी मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर पोलीस विभाग लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : लाज देणे व घेणे हे कायद्याने गुन्हा असला तरी मोठ्या प्रमाणावर लाज घेतली जाते जळगाव जिल्ह्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईमध्ये लाच प्रकरणांमध्ये पोलीस विभागातील कर्मचारी सर्वाधिक पकडले गेले आहे त्यानंतर महसूल विभागाचा नंबर लागत आहे ज्यांच्यावर सुरक्षेची मदार आहे तेच लाचखोरी मध्ये तेच लाच खोरी मध्ये पुढे गेलेले दिसत आहे. शासकिय कार्यालयात अनेक योजना असोत वा कर्मचारी अधिकार्यांच्या सेवानिवृत्तीसह, कायदे कज्जे, खटले, शेती, उद्योग, सेवा लाभांची प्रकरणे मार्गी लागण्यासाठी अनेकांकडून आर्थीक लाभाची अपेक्षा ठेवून काम करणार्या ३३ लाचखोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी…
प्रतिनिधी प्रविण पाटील । एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार बळीराम सपकाळे हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बळीराम सपकाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे साहेब, कटारे, पोलिस उपनिरीक्षक जगदाळे तसेच गिरासे सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रतिलाल पवार, महेंद्र गायकवाड, सतिष गरजे, सचीन मुंढे आणि पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, हेमंत पाटील प्रदीप पाटील हे उपस्थित होते.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील भालोद येथील ३१ वर्षीय तरूणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र प्रभाकर जावळे (वय-३१) रा. भालोद ता. यावल असे तरूणाचे नाव आहे. रविंद्र जावळे हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवारी ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शौचास जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोधाशोध केली पंरतू आढळून आला नाही. दरम्यान भालोद-बामणोद रोडवर एकविरा देवीच्या मंदीराजवळ असलेल्या अशोक चौधरी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी रविंद्र जावळे याने…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यातील रसिक आणि परमेश्वरावर नितांत “श्रध्दा असणारा भाविक” ही रूपे अनेकदा दिसून येतात. ते अनेकदा जसे चित्रपटातील गाणी म्हणतात तसेच भजन किर्तनातही रंगतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कव्वालीच्या माध्यमातून भक्तीरंगाचे प्रदर्शन घडविले होते. आता अगदी याच प्रकारे तालुक्यातील अंजनविहिरी गावात आयोजीत करण्यात आलेल्या भागवत सप्ताहात ना. गुलाबराव पाटील यांनी थेट किर्तनात भाग घेऊन उपस्थितांना चकीत केले. किर्तनाच्या माध्यमातून संस्कारक्षम जीवनाची दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन करत त्यांनी जीवनातील परमेश्वर भक्तीवर केलेले भाष्य हे उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले. तर याच कार्यक्रमात त्यांना दहीहंडीचा सन्मान देखील प्रदान करण्यात आला.…
विश्वकर्मा वंशीय समाज संस्थाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विश्वकर्मा वंशीय समाज संस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील सुतारवाडी येथील ७ वर्षाच्या अबोली या बालिकेवर अमानुष व मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत संशयित आरोपी संतोष थोरात याला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक…
जळगाव आरटीओ विभागाचा भोंगळ कारभार उघड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांचे टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे वाहनक्रमांक एम एच 19 सी झेड 5130 हे परस्पर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव आरटीओ कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची चौकशी सुरू आहे. भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय वामन सावकारे यांची टोयोटा कंपनीचीएम एच 19 सी झेड 5130 या वाहनाची नोंदणी 23 फेब्रुवारी 2019 रोजी जळगाव आरटीओ कार्यालयात झालेली आहे ही गाडी परस्पर डिसेंबर 2021 महिन्यात अनिल दत्तात्रय परब राहणार रविकिरण को ऑफ सोसायटी बांद्रा ईस्ट मुंबई…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथे विनापरवाना गोमांस विक्री करणाऱ्या तरूणावर यावल पोलीसांनी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सीम परिसरात बेकायदेशीरित्या गोमांस विक्री होत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधिर पाटील यांनी पोलीसांना सुचना देवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोकॉ अनिल साळुंखे यांनी कारवाई करत शेख कलीम शेख रशीद (वय-३२) रा. सावखेडा ता. यावल याच्याकडून गोमांस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ. अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

