वेणुगोपाल झंवर यांची अध्यक्षपदी निवड लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जेसीआय जळगाव सेंट्रलचा पदग्रहण सोहळा शहरातील शिरसोली रोडवरील सुरभी लॉन येथे रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी पार पडला. नूतन अध्यक्ष वेणुगोपाल झंवर यांनी मावळते अध्यक्ष श्रेणिक जैन यांचेकडून तर नूतन सचिव तुषार बियाणी यांनी मावळते सचिव भावेश जैन यांचेकडून पदभार स्वीकारला. जेसीआय जळगाव सेंट्रलची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी सुरभि लाव्नस येथे एका कार्यक्रमात पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी झोन अध्यक्ष नंदलाल जयस्वाल, माजी राष्ट्रीय संचालक स्वरूप लुंकड यांचेसह आर्यन इको रिसॉर्टच्या संचालिका रेखा महाजन यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात खासदार…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : काळ आला होता पण वेळ आली नव्हती…शेतात असताना अचानक गर्भवती महिलेला कळा सुरु…ग्रामीण भाग असल्याने कुटुंबीयांची धावपळ…मात्र दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच महिलेची प्रसूती सुरु…महिलेच्या वेदनांनी आसमंत हादरले…रात्रीची बिकट वेळ…महिलेने चक्क जुळ्या बाळांना दिला जन्म… त्याचवेळी बाळांचेही शिशुरूदन सुरू…पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रसंगातून अतिरक्तस्राव होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या अथक परिश्रमानंतर तिचा जीव वाचविण्यात यश आले आहे. केवलबाई साहिदास भिल (वय २६, रा.उखडवाडी ता. धरणगाव) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे कुटुंब मजुरी करते. या महिलेची प्रसूतीची हि चक्क पाचवी वेळ होती. यापूर्वी २ मुली व २ मुले…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । जिल्ह्यात आज दविसभरात १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे. जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण १७९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात -६४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-७३, अमळनेर-१, चोपडा-२, पाचोरा-२, धरणगाव-१, जामनेर-५, रावेर-२, चाळीसगाव-१६, मुक्ताईनगर -२, बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४३ हजार ३०६ बाधित रूग्ण आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४० हजार २५४ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात सध्या ४७३…
प्रतिनिधी प्रविण पाटील । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात नवीन बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याहस्ते रविवार ९ जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांच्याहस्ते कोनशिलाचेही अनावरण करण्यात आले. जळगाव शहरातील सर्वात मोठी पोलीस स्टेशन म्हणजे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नाव समोर येते. याठिकाणी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या संकल्पनातून बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम करण्यात आले. याचा उपयोग पोलिस कर्मचारी वर्गाला बंदोबस्त काळात मुक्काम कामी , पोलिस कर्मचारी बैठक, पोलिस पाटील बांधवांची बैठक या सभागृहाचा उपयोग होणार आहे. या सभागृहाचे रविवारी ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील चित्रा चौकात बाजारात आलेल्या शेतकऱ्यांची दुचाकी चोरून नेलचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात माहिती अशी की, प्रदीप शामराव देशमुख (वय-६१) रा. हरी ओम नगर, जुना कानळदारोड, शिवाजी नगर हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. शेती काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीटी २११९) क्रमांकाची दुचाकी आहे. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास प्रदीप देशमुख हे चौत्रा चौकात दुचाकीने कामानिमित्त आले. चौकातील विशाल ईलेक्ट्रिक दुकानासमोर पार्किंग करून लावली होती. अवघ्या १० मिनीटात अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी पार्किंगच्या ठिकाणाहून…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज। पुणे शहरातील कोथरूड पोलीस ठाण्याचे ७० जणांचे पथक आज जळगावात दाखल झाले आहे. मविप्रचे अॅड. विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या आता अडचणी वाढण्याच्या शक्यता वर्तविण्यात आले आहे. ७० जणांचे एकुण पाच पथकाची निर्मिती केली असून कसून चौकशी सुरू आहेत. आज जळगाव शहरातील निलेश रणजित भोईट, तानाजी केशवराव भोईटे, महेंद्र वसंत भोईट, प्रा. एल.पी. देशमुख आणि प्रमोद काळे अश्या पाच जणांच्या घरी पोलीसांनी धाडी टाकून सकाळपासून चौकशी सुरू आहेत. दरम्यान मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल…
जामनेर प्रतिनिधी | ”ईडीच्या धाकाने एकनाथ खडसे हे चार वेळा कोरोना बाधीत झाले.अपंगाचे खोटे प्रमाणपत्र काय काढले,त्या प्रकरणी दिव्यांग बांधवांनी त्या विरूध्द आंदोलने केली.आता ते मोक्काच्या धाकाने आपल्याला कोरोना झाल्याचे म्हणत असले तर त्यांना खरोखर ठाण्याच्या उपचाराची गरज आहे”,असा पलटवार माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसे यांच्यावर केला आहे. तर ”राज्यात तुमचेच सरकार असून याच सरकारने दिलेली चाचणी खोटी आहे हे त्यांनी सिध्द करावी, अथवा याबाबत तक्रार करावी” असे खुले चॅलेंज देखील त्यांनी केले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपाचे नेते आ. गिरीश महाजन यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आल्यानंतर मोक्काच्या धाकाने त्यांना कोरोना झाला असावा असा संशय व्यक्त केल्याने…
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपुजन ; सर्वांगीण विकासाची दिली ग्वाही लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक या दोन्ही गावांची पाणी समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी २१ कोटी रूपयांची पाणी पुरवठा मंजूर करण्यात आली असून याचे लवकरच भूमिपुजन करण्यात येणार असल्याची माहिती आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. पाळधी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण करतांना ना. पाटील यांनी पाळधी गावासोबत असणारे आपले ऋणानुबंध व्यक्त करत विकासकामांच्या माध्यमातून यामधून उतराई होण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केले. दरम्यान, आज पालकमंत्र्यांचे आज मोटारसायकल रॅलीद्वारे भव्य स्वागत करण्यात आले. तर मोटारसायकलवर स्वार होऊनच त्यांनी विविध विकासकामांच्या भूमिपुजनाला हजेरी लावली. याच कार्यक्रमात त्यांचा मनसेचे जिल्हाध्यक्ष…
मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याच चित्र आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.नवीन नियमावली नुसार राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदानं, उद्याने, चित्रपट गृहे, केशकर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे मुंबई लोकल प्रवासासाठी कुठलेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. रात्री 11 ते सकाळी 5 कर्फ्यूमैदानं, उद्यानं पर्यटन स्थळ बंदशाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार. सलून आणि खासगी कार्यलय 50 टक्के क्षमतेनं सुरुपूर्ण लसीकरण झालेल्यांना सार्वजनिक बसनं…
जळगाव प्रतिनिधी । आईस्क्रीमची ऑर्डर घेण्याच्या कारणावरून दुकानदार व सेल्समन यांच्यात तुफान हाणामारी झाली. यात एकमेकांना मारहाण करून दुकानाचे नुकसान केले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्परविरोधात गुन्हे दाखल केले आहे. सविस्तर माहिती अशी की, उमेश शांतीलाल कुमावत (वय-३७) रा. रायसोनी नगर जळगाव हे अरुण आईस्क्रीमवर कामाला आहेत. शुक्रवार ७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या दुकानावर हँटसन ग्रो कपंनीचा सेल्स ऑफीसर असल्याचे सांगत त्याने लवकर आईस्क्रीमची आर्डर द्या असे म्हणत वादाला सुरवात झाली. वादाचे पर्यावसन हाणामारीत होवुन दोघांनी एकमेकांला मारहाण करत जिवेठार मारण्याच्या धमकी दिली. या वादात दुकानातील संगणकाचे नुकसान झाले. दोघांनी परस्पर विरुद्ध तक्रार दिल्यावरुन जळगाव शहर पोलिसात वेगवेगळे…

