Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

धुळे प्रतिनिधी । मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वर झालेल्या विचित्र अपघातात केमिकलची वाहतूक करणाऱ्या टँकरला ट्रकने मागून ठोकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात स्फोट झाल्याने संपूर्ण टँकरने पेट घेतला. या अपघातात टँकर चालकाचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर गावाजवळ मंगळवारी १ फेब्रुवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुमारास मध्यप्रदेशकडून शिरपूरच्या दिशेने केमिकलने भरलेला टँकर जात होता. यावेळी भरधाव टँकरने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत टँकर रस्त्यावरच उलटताच टँकरचा स्फोट झाला. टँकरला भीषण आग लागल्यामुळे आगीचे लोळ बाहेर येत होते. या दुर्घटनेत टँकर जळून खाक झाले आहे. टँकरचा चालक टँकरमध्ये अडकल्याने या…

Read More

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा मुंबई वृत्तसंस्था । गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आता महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात समझोता झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवा यांनी सांगितले की, राज्यपालांनी सही केली आहे. लॉ सेक्रेटरी यांना त्यांच्याकडे पाठवले होते. भुजबळांनीही त्यांची भेट घेतली. त्यांनाही वेळ दिली.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमाक १२ मधील रोटरी भवन मायादेवी नगर येथे कचरा मुक्त कॉलनी या उपक्रमांतर्गत जळगाव शहर नगरपालिकेच्यावतीने नागरीकांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांच्या निर्देशानुसार परिसरातील २८ कॉलनी कचरामुक्त घोषित करण्यात आल्यात. त्या अनुषंगाने कार्यक्रमात नागरीकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जयश्री महाजन महापौर, नगरसेविका ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव विनोद बियाणी, उपायुक्त शाम गोसावी, रोटरी वेस्टचे पदाधिकारी शहर समन्वयक महेंद्र पवार, आरोग्य निरीक्षक उल्हास इंगळे, प्रमुख केतन हातागळे व मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : येथील कानळदा रोडवरील रहिवासी तथा धनाजी नाना चौधरी संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी जितेंद्र बाबूलाल धनगर हा समाजकार्य या विषयामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. या बद्दल त्याचे अभिनंदन केले जात आहे. जितेंद्र धनगर हा मूळ चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवासी आहे. पहिल्याच प्रयत्नात तो सेट परीक्षा उत्तीर्ण झाला आहे समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक वृंदासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी. एस.कट्यारे, शिक्षक बी.यु. जाधव, प्रशांत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तर आई-वडील, पत्नी, इंद्रजीत धनगर, चेतन चौधरी यांचे सहकार्य लाभले. त्याच्या यशाबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, महाराष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी डॉ. प्रदीप जोशी, डॉ. अनिल…

Read More

चोपडा शहर पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल चोपडा प्रतिनिधी । चोपडा शहरातील बसस्थानकाजवळ पाच जणांनी टॅक्सी अडवून चालकाला बेदम मारहाण करून खिश्यातील ६ हजार ३०० रुपये जबरी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आलाय. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारुन शेख कमरुद्दोन शेख (वय-५२) रा. के.जी.एन कॉलनी, चोपडा हे टॅक्सी चालक आहे. टॅक्सी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते चोपडा शहरातील बसस्थानकाकडून घरी जाण्यासाठी टॅक्सी क्रमांक (एमएच १९ वाय ०९२९)ने जात असताना त्यांना भैय्या पाटील, टाकल्या गवळी (पुर्ण नाव माहित नाही) आणि सोबत असलेले अनोळखी तीन…

Read More

सिंधुदुर्ग वृत्तसंस्था । भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपुर्व जामीन सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात नितेश राणे जिल्हा न्यायालयात दाद मागणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला होता. यावेळी सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करावा, असे निर्देश दिले होते. यासाठी कोर्टाने नितेश राणे यांना १० दिवसांची मुदत दिली होती. नितेश राणे यांच्या जामिनाबाबत झालेल्या कालच्या सुनावणीत सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले, ‘सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार,…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील भवानीपेठेत राहणाऱ्या तरूणाची मोबाईल ॲप्लीकेशनच्या माध्यमातून ८४ हजार ८८९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस निवृत्ती कासार (वय-२८) रा. भवानी पेठ जळगाव हा आई, वडील, पत्नीसह वास्तव्याला आहे. भांड्याचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २८ जानेवारी रोजी ईलेक्ट्रिक बिल भरण्यासाठी त्यांनी फोन-पे वरून त्यांच्या क्रेडीट कार्डवरून ऑनलाईन ५ हजार रूपये पेमेंट केले. परंतू क्रेडीट कार्डवर पैसे आले नाही नाही म्हणून २९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता तेजसने क्रेडीट कार्ड कस्टमर केअरला फोन लावला. पैश्यांबाबत त्यांनी विचारणा केली. त्यानंतर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील निमखेडी परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणाला पार्ट टाईम नोकरीचे आमिष दाखवत ऑनलाईन पध्दतीने १ लाख ४८ हजार ५७३ रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. . याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, रोहन गजानन पाटील (वय-१९) रा. कल्याणी नगर, निमखेडी परिसर जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता त्याला एका अनोळखी मोबाईल नंबरच्या टेलीग्रॉम ॲपवर सुरेंद्र नावाच्या व्यक्तीने पार्ट टाईम नोकरी लावण्याचे सांगितले. त्यानुसार जॉबची ऑर्डस पास करून देतो असे सांगून ऑनलाईन पध्दतीने पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार रोहनने फोन-पे च्या माध्यमातून एकुण…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । शहरातील जळगाव-औरंगाबाद रोडवरील अमरनाथ हॉटेलात वेश्या व्यवसाय चालवित असल्याचा प्रकार सोमवारी ३१ जानेवारी रेाजी सायंकाळी उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती अशी की, जळगाव औरंगाबाद महामार्गावर असलेल्या अमरनाथ हॉटेलमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राहुल रगडे, आशा पांचाळ, सुनिल पाटील, किरण धमके, चंद्रकांत चिकटे, संतोष जाधव, रविंद्र सुरळकर, रविंद्र कारंकाळ, मिलींद पाटील यांनी सोमवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील बिजासनी जिनींगच्या मागे रेल्वेच्या धक्क्याने ४० वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील महात्मा फुले नगर नागलवाडी रोड परिसरातील रोहिदास आधार माळी (वय 40) यांचा आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मालक गाडीच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आली आहे. हा अपघात धरणगाव चावलखेडा डाऊन लाईनवर बिजासनी जिनिंगच्या मागे घडला. घटनेची माहिती मिळाताच धरणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास…

Read More