रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल जळगाव प्रतिनिधी | शहरातील गणेशवाडी येथील एकाच्या हातातील 24 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुण गिरधर धांडे वय ७४ रा. संचित रणछोड नगर जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३१ जानेवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शहरातील गणेशवाडी येथे अरुण धांडे हे कामानिमित्त आले होते. त्यावेळी घरी परतत असताना अनोळखी व्यक्ती दुचाकीवर येऊन त्यांच्या जवळ थांबला. त्यानंतर त्यांच्या हातातील “सोन्याची अंगठी ही खूप सुंदर आहे, मला पण अशी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज राजेंद्र पाटील शिवाजी नगरातील रहिवाशी रमेश राजन्न लोंकलकर (वय-४५) रा. शिवाजी नगर याचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव शिरसोली दरम्यान शुक्रवारी 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश लोंकलकर हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. बळीराम पेठेतील वैभव रेडीमेड कापड दुकानात ते कामाला आहेत. शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता कामावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. दरम्यान दुपारी जळगाव शिरसोली रेल्वे मार्गावर मोहाडी गावानजीक शिरसोली रेल्वे डाऊन मार्गावर खांब क्र. ४११ (५-७) जवळ त्यांना रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील सिंधी कॉलनी येथील कापड व्यावसायिकाने कर्जबाजारीतून राहत्या घरात घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेशकुमार मिठूमल मताना (वय ५०) रा. सिंधी कॉलनी असे मयत कापड व्यावसायिकाचे नाव आहे. एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेशकुमार मताना हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. फुले मार्केट परिसरात कपडे विकून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री कुटुंबियासोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आली. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत…
अमळनेर प्रतिनिधी । भर रस्त्यावर नागरीकांना आडवून बेदम मारहाण करून बळजबरीने लुटमार करणारा आणि स्वत:ला दाऊद समजणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अमळनेर पोलीसांनी सापळा रचून अटक केली. एवढेच नाही तर त्याची हातात बेड्या ठोकून गावातून धिंड काढण्यात आली. गुन्हेगारांची दहशत संपविण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर पावले उचलले असल्याने गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. शुभम उफ शिवम उर्फ दाऊ मनोज देशमुख हा स्वत:ला दाऊद समजतो. अमळनेर शहरातील व्यापाऱ्यांकडून व नागरीकांकडून बळजबरीने पैसे घेवून जनतेच्या मनात दहशतीचे वातावरण पसरवत असल्याने त्याच्यासह त्याच्या साथीदाराची दहशत संपविण्यासाठी अमळनेर चौक ते छत्रपती शाहू महाराज चौक दरम्यान पायी धिंड काढण्यात आली. नागरीकांमधील दहशत कमी व्हावी यासाठी त्यांची गावातून धिंड…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सभासद मोहिम अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी यांनी किमान १०० हून अधिक सभासद नोंद करावी असे आवाहन सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. जयदेव गायकवाड यांच्या आदेशान्वये सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रत्येक १०० सभासन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सभासद नोंदणीसाठी घरापर्यंत पोहचा असे आवाहन सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी केले आहे.
नऊ महिन्याचं बाळ पोटात असतांना दिला पेपर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद बाविस्कर यांच्या दोन्ही मुलींनी डीएडच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दोघींनी चांगल्या गुणांनी उतीर्ण होत आपआपल्या विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. नांद्रा येथील विनोद आप्पा बाविस्कर यांना दोन मुली व एक मुलगा आहे. विनोद बाविस्कर यांच्या मोठ्या मुलींने म्हणजेच दिपाली बाविस्कर हिने जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विदयालयात डी.एडला प्रवेश घेतला होता तर, लहान मुलगी रुपाली बाविस्कर हिने म्हसावद येथील शिक्षण शास्त्र विद्यालयात डी.एडला प्रवेश घेतला होता. दोघी बहिनींनी प्रथम वर्षाच्या परीक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले होते.…
सलग सातव्या गुरुवारी पंचवीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने 175 जणांना धुसर दृष्टीपासून मुक्त करून नव्या प्रकाशवाटा दाखवल्या.रुग्णालयातर्फे जानेवारी महिन्यापासून ना नफा ना तोटा तत्वावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविले जात असून, दर गुरुवारी रुग्णांवर अत्यल्प दरात मोतीबिंदू व फेको (बिना टाक्याची) शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. या गुरुवारी देखील 25 रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यापैकी 75 टक्के रुग्णांनी फेको शस्त्रक्रियेला पसंती दिल्याचे दिसून आले. रुग्णालयात शस्त्रक्रियांचा हा सातवा आठवडाही हाउसफुल ठरला. गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता देवकर रुग्णालयाने ना नफा ना तोटा तत्वावर…
जळगाव प्रतिनिधी । जळगावात रिक्षात बसलेल्या प्रवाशी वृध्दाला लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. मोसिन खान उर्फ शेमड्या नूरखान पठाण वय-२८, शाहरुख शेख रफीक वय-२० दोघ रा. पिंप्राळा हुडको, समाधान सुमेरसिंग पाटील वय-३३ रा. खंडेराव नगर अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. शहरातील तांबापुर परिसरातील शेख जलील शेख ईब्राहीम (वय-७२) हे धुळे जाण्यासाठी आकाशवाणी चौकात वाहनाची वाट पाहत थांबले होते. यावेळी आलेल्या एका रिक्षात शेख जलील बसले. यावेळी रिक्षात पुर्वीच बसलेल्या तीन जणांनी शेख जलील यांच्या खिशातील १५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेत त्यांना रस्त्यात उतरवून दिले. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । तालुक्यातील बांभोरी शिवारातील एका टपरीत घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर करून काळाबाजार करणाऱ्या एकावर पाळधी पोलीसांनी छापा टाकून ५२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पाळधी ठाण्यात एकावर करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात असलेल्या खुबचंद पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या एका पत्र्याच्या टपरीत घरगुती गॅसचा रिक्षासाठी काळ्याबाजारात विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पाळधी दुरक्षेत्र पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने गुरूवारी ३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता छापा टाकून घरगुती गॅसचे १७ सिलेंडर, इलेक्ट्रीक मोटार, वजन काटा असा एकुण ५२ हजार ५००…
धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री खु येथून जवळच असलेल्या बोरखेडा येथील तरूणाचा विहिरीत तोल जावून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर माहिती अशी की, बोरखेडा येथील रहिवासी असलेले निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडा येथील सेवानिवृत्त शिक्षक के. पी. पाटील यांचा एकुलता एक मुलगा शुभम कांतीलाल पाटील (वय-२८) हा ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात पाहणी करण्यासाठी गेला होता . तो नेहमीच आपल्या शेतात पीक पाहणीसाठी फेरफटका मारायला जात असे. परंतु दुपारी ४ वाजेपर्यंत मुलगा घरी न आल्याने घरच्या मंडळीनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी शुभम हा विहिरीत पडल्याचे निदर्शनास…

