Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरातील एकाला ४९ हजारांचा ऑनलाईन गंडा
    अमळनेर

    अमळनेरातील एकाला ४९ हजारांचा ऑनलाईन गंडा

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 10, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर प्रतिनिधी । नाशिक येथे जण्यासाठी कॅब बुकिंगच्या नावाखाली एकाला ४९ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

    याबाबत माहिती अशी की, धनराज शंकर पाटील (वय-५०) रा. पवन चौक, देशमुख गल्ली, अमळनेर यांना ८ फेब्रुवारी रोजी नाशिक येथे जायचे असल्याने त्यांनी गुगलवरून एका वेबसाईटवर चौकशी केली असता त्यांना एका अनोळखी नंबरवरून माहिती पुरवण्यात आले. त्यान एका अनोळखी नंबरवरून फोन आला की, ‘तुमची बुकींग होऊन जाईल’ त्यानंतर थोड्या वेळातच त्यांना मोबाईलवर व्हाट्सअपवर एक लिंक आली. त्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाइन १०० रुपये टाकून बुकिंग करण्यासंदर्भात सांगण्यात आले. त्यानुसार धनराज पाटील यांनी २ वेळा लिंकवर क्लिक करून ओपन करण्याचा प्रयत्न केला पैश्यांचा व्यवहार झाला नाही. त्यानंतर त्यांनी एक वेळेस प्रयत्न केला असता त्यांच्या अकाउंटमधून १०० रुपये कमी झाले. सायंकाळी ‘ट्रॅव्हल गुरु’ नावाची एपीके फाईल व्हाट्सअपवर पाठवले आणि ॲप डाऊनलोड करून सर्व ऑप्शन चालू करा, असे सांगितले. त्यानुसार पाटील यांनी सर्व ऑप्शन Allow केले.  काही मिनिटातच त्यांच्या बँक खात्यातून ४९ हजार रुपये ऑनलाईन कमी झालेल्याचा मॅसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल सारखा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल अहिरे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    कायद्याचा सौदा महागात; लाचखोर पोलिस नाईक पोलिस कोठडीत !

    April 15, 2026

    मेहरुण तलाव ट्रॅकवर तरुणावर चॉपरने हल्ला

    April 15, 2026

    वाळूच्या डंपरची धडक : उपचारादरम्यान वृद्ध ठार !

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.