जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील अदित्य फार्म आणि डी-मार्ट सुपर शॉपी यांना महापालिकेने सोमवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी प्रत्येकी ५० हजार रूपयांचा दंडाच्या नोटीसा महापालिकेने बजावल्या आहे. याबाबत माहिती अशी की, उपायुक्त शाम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापलिकेच्या पथकाने २६ जानेवारी रोजी शिरसोली रोडवरील डी-मार्ट मॉलची पाहणी केली यावेळी शंभर पेक्षा जास्त ग्राहक एकाच वेळी आढळून आलेत. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन,चेहऱ्यावर मास्क,ग्राहक व दुकानातील स्टॉफ यांचे लसीकरणव इतर अटी शर्तीचे पालन न केल्याचे आढळून आले. आदित्य फार्म येथे २७ जानेवारी रोजी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभात ५० नागरिकांना परवानगी असतांना या समारंभात २०० नागरिक सहभागी…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
पारोळा प्रतिनिधी । शहरातील लोकसंख्या पाहता नवीन पाण्याच्या टाकी, जलशुध्दीकरण आणि पाण्याची साठवणूकसाठी राज्य शासनाने २७ ऑक्टोबर रोजी नवीन जलकुंभासाठी निधी मंजूर केला आहे. या जलकुंभाची कामे तातडीने पुर्ण करून पारोळेकरांची तहान भागवा अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने यांनी संबंधित विभागाला केले आहे. पारोळा नगरीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शासनाकडे नवीन जलकुंभ बनविण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ ऑक्टोबर रोजी शहरासाठी नवीन जलकुंभ उभारणे व फिल्ट्रेशन प्लांटची क्षमता वाढविणेबाबत कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर केला. पारोळा शहरासाठी लागणारे पिण्याचे पाणी तामसवाडी धरणातून जलवाहिनी द्वारे पारोळा शहराला पुरविले जाते धरणात पाण्याचा…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सांगली जिल्ह्यातील मिरजेत अवैधरित्या रक्तचंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पोलीसांनी पकडला आहे. यात तब्बल अडीच कोटी रुपये किंमतीचे रक्तचंदन असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. वाहन चालक यासीन इनायतउल्ला खान (वय ४५, रा. अद्रिकरणहळी, बेंगलोर, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. कर्नाटकातून आणलेले रक्तचंदन पुढे कोणाला पोहोचवले जाणार होते, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. सध्या देशभर गाजत असलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय गाजत असतानाच हा प्रकार उघडकीस आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्तचंदनाची अवैध वाहतूक करणारे…
कलकत्ता वृत्तसंस्था । देशात एकीकडे मुलगी झाली म्हणून आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. पण दुसरी कडे मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ केला जातो. पश्चिम बंगालमध्ये याही पलिकडे घटना घडून क्रुरतेचा कळस गाठला आहे. मुलाला जन्म न दिल्यामुळे नवऱ्यानेच पत्नीच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घातल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. यावर प्रायव्हेट पार्ट्समध्ये लोखंडी रॉड खुपसून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पत्नीने केला आहे. पूर्व वर्धमानमधील कालना पोलीस स्टेशन हद्दीतील बागनापारा येथील बिजारा भागातील आहे. एका महिलेसोबत घरगुती हिंसाचाराची अंगावर काटे आणणारी घटना समोर आली आहे. मुलगा न झाल्यामुळे पतीने पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवल्याचा आरोप आहे. महिलेला गंभीर जखमी…
प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : दिव्यांग व्यक्तींना शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या लाभ मिळावा अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तर्फे करण्यात आली. धरणगाव तालुक्यातील चोरगाव ,कवठळ, पथराड या गावातील दिव्यांग बांधव एकत्र येऊन तहसीलदार नितीन कुमार देवरे व पुरवठा निरीक्षक झोपे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णय नुसार 31 डिसेंबर 2021 प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना पिवळे कार्ड देऊन अंत्योदय योजनेच्या यादी मध्ये समावेश करण्यात यावा, तसेच संबंधित दिव्यांग व्यक्ती यांना दरमहा 35 किलो अन्नधान्य रेशन दुकानावर देण्यात यावे, तसेच दिव्यांग बांधवांना संजय निराधार योजनेचा लाभ मिळावा ,असे विविध समस्या चे निवेदन राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तर्फे तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. राष्ट्रीय…
‘माणूस मारल्याने विचार मरत नाही’ – लक्ष्मण पाटील धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड स्कुल येथे गांधीजींचा स्मृतिदिन व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिक्षिका भारती तिवारी यांनी ‘दे दी हमें आजादी, बिना खडग बिना ढाल…’ या गितातून गांधींजींना अभिवादन केले. शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी ३० जानेवारी चे ऐतिहासिक महत्व सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करण्याऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या उद्देशाने…
अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका १६ वर्षीय मुकबधीर मुलीवर गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आली आहे. यात एकाला अटक केली असून इतर फरार आहे. पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी मुकबधिर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही मुकबधिर असल्याचा गैरफायदा घेत गावातील दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर काही मुलांनी तिला गेल्या सात महिन्यांपासून शेतात घेवून जावून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला…
पाचोरा प्रतिनिधी । शहरातील पुनगाव रोडवर दुचाकीचा कट लागल्याने २३ वर्षीय तरूणाचा चाकू भोसकून खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणात पाचोरा पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील पुनगाव रोड रस्त्यावरील बुऱ्हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात रविवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी कट लागल्याने भूषण नाना शेवरे (वय – २३) रा. दुर्गा नगर, पाचोरा या तरूणावर लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण…
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हुतात्मा दिनानिमित्त रविवारी ३० जानेवारी रोजी सकाळी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सकाळी १०.५९ वाजता महानगरपालिकेचा भोंगा वाजताच सर्व सावधान स्थितीत एका जागी उभे राहिले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उप अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. वैभव सोनार, डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. एन.डी.महाजन, सुनीता इंगोले, संदीप बागुल विलास वंजारी, अजय जाधव, तेजस वाघ, अभिषेक पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी केले.
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चाळीसगाव येथील भोसर येथे मारहाणी प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने चौघांना दिलेली तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुंबे यांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी रद्द करून चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. सविस्तर हकीकत अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भोसर येथील लखन रावसाहेब जगताप, आनंद परमेश्वर जगताप, गणेश भगवान जगताप आणि रावसाहेब धना जगताप या चौघांनी २६ मार्च २०११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर शौचालयासाठी खड्डा खणत असतांना त्यांना शेजारी राहणारे एकनाथ मालजी पाटील व त्यांची मुले नरेंद्र एकनाथ पाटील, संदीप एकनाथ पाटील व प्रमिलाबाई यांनी विरोधात केला. यावेळी लखन जगताप,…

