Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते उपचारासाठी होम क्वारंटाईन झाले आहे. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांनी दिवसभर आराम केला. आज गुरूवारी २७ जानेवारी रोजी सकाळी कोरोना चाचणी केली. डॉ. पुढे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ते पुढील काही दिवस होम क्वारंटाईन झाले आहे. त्यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: काळजी घ्यावी व कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममुराबाद रोडवर एका तरूणाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला आहे. सदरील तरूण उस्मानियॉ पार्क येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तालुकापोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेख गफ्फार शेख जब्बार (वय-३५) रा. उस्मानियॉ पार्क असे मयताचे नाव आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शेख गफ्फार हे बांधकामाचे सेंटींग काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आईवडील, पत्नी, भाऊ व दोन मुलांसह शहरातील उस्मानिया पार्क येथे वास्तव्याला आहे. बुधवारी २६ जानेवारी रोजी सायंकाळी काम आटोपून घरी निघाले होते. परंतू ते रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कोठेही आढळून आले नाही. गुरूवारी २७ जानेवारी रोजी…

Read More

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीवर दोन जणांनी शेतात बळजबरी अत्याचार केल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या नातेवाईक व कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील संशयित आरोपी प्रदीप चंद्रकांत धनगर आणि मयुर अनिल धनगर यांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा…

Read More

जामनेर प्रतिनिधी । शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गॅस कटरने कापून सुमारे १२ लाख ७८ हजारांची रोकड लांबविली आहे.चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या आयडीबीआय बँक एटीएम रात्रीच्यावेळी चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडले. बुधवार २६ जानेवारी रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास हे एटीएम फोडले आहे. अवघ्या १५ मिनीटात एटीएम मधील पैसे चोरून नेले. ही माहिती मिळताच पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. सदर घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सदर या बँकेच्या एटीएम…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील । शहरातील ज्योती देवी अन्नपुर्ण भंडार या सेवाभावी योजनेतून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ता भुकेल्यांसाठी खिचडीचे वाटप करण्यात आले. यासाठी बयस परिवाराने पुढाकार घेतला आहे. अधिक माहिती अशी की, धरणगाव येथे मुन्नादेवी आणि मंगलादेवी मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित ज्योती देवी अन्नपूर्ण भंडारच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सेवाशुल्क रुपये ५ मध्ये एक खिचडीची डिश मिळेल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष धरणगावचे सुपुत्र आयकर आयुक्त विशाल मकवाने हे होते. याप्रसंगी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.डी.आर. पाटील, काँग्रेसचे सचिव डी.जी. पाटील, राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, धरणगाव तहसीलदार नितीनकुमार देवरे, पोलीस निरीक्षक शेळके, जी जीनींगचे…

Read More

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी करण्यात आले. सविस्तर माहिती अशी की, देशात ७३ व्या भारतीय प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम साजरी करण्याचे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील यांच्याहस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज वणखडे, सुनिल पाटील, प्रभारी ग्रामसेवक जयश्री पाटील अंगणवाडी सेविका, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्‍य आणि ग्रामस्थ…

Read More

बाल शौर्य पुरस्कार विजेत्या चिमुकलचे पालकमंत्र्यांनी केले कौतुक लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगावच्या शिवांगी काळे हिने प्रसंगावधान राखल्यामुळे तिची आई आणि बहिणीचे प्राण वाचले असून यामुळे तिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या माध्यमातून शिवानीने जिल्ह्याचे नाव जगभरात उंचावल्याचे कौतुकोदगार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी काढले. शिवानीच्या घरी जाऊन सन्मान केल्यानंतर बोलतांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तिच्या धैर्याचे, शौर्याचे आणि प्रसंगावधानाचे तोंड भरून कौतुक केले. तर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवांगीसह राज्यातील बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांचा विशेष सत्कार करावा असा प्रस्ताव आपण मांडणार असल्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी याप्रसंगी दिली. जळगाव येथील शिवांगी काळे या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकललीला…

Read More

नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीय तटरक्षक दलात ८० जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये (आयसीजी) एकूण ८० जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरु झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार इंजिन ड्रायव्हर, सारंग लास्कर, स्टोरअर कीपर, सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, फायरमन, फिटर, स्प्रे पेंटर, मेकॅनिकल, एमटीएस आणि लेबर, शीट मेटल वर्कर आणि इलेक्ट्रिकल फिटर या पदांसाठी भरती होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. अश्या राहणार जागा इंजिन…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात ४८९ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. तर ३४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४८ हजार ७१८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४२ हजार ५६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहर-८३, जळगाव ग्रामीण- २८, भुसावळ-८२, अमळनेर-७५, चोपडा-६५, पाचोरा-२०, भडगाव-१५, धरणगाव-०, यावल-६, एरंडोल-२०, जामनेर-५१, रावेर-१, पारोळा-०, चाळीसगाव-२९, मुक्ताईनगर-१, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यातीन २ असे एकुण ४८९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ५६९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत…

Read More

जळगाव प्रतिनिधी । शहरातील दत्त कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री बंद घरातून सोने व चांदीच्या दागिन्यांसह एकुण १ लाख ९१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, सविता यतीन पाटील (वय-३०) रा. सुनंदीन पार्क, दत्त कॉलनी, जळगाव ह्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवारी २२ जानेवारी महिला व तिचे कुटुंबिय कामानिमित घर बंद करून बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून घरच्या वरच्या मजल्यावर जावून दरवाजाची आतील कडी आरशात पाहून उघडली. घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, १५ हजाराची रोकड असा एकुण १ लाख ९१ हजाराचा मुद्देमाल…

Read More