Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : दिव्यांग व्यक्तींना शासन निर्णयानुसार अंत्योदय योजनेच्या लाभ मिळावा अशी मागणी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तर्फे करण्यात आली. धरणगाव तालुक्यातील चोरगाव ,कवठळ, पथराड या गावातील दिव्यांग बांधव एकत्र येऊन तहसीलदार नितीन कुमार देवरे व पुरवठा निरीक्षक झोपे यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णय नुसार 31 डिसेंबर 2021 प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना पिवळे कार्ड देऊन अंत्योदय योजनेच्या यादी मध्ये समावेश करण्यात यावा, तसेच संबंधित दिव्यांग व्यक्ती यांना दरमहा 35 किलो अन्नधान्य रेशन दुकानावर देण्यात यावे, तसेच दिव्यांग बांधवांना संजय निराधार योजनेचा लाभ मिळावा ,असे विविध समस्या चे निवेदन राष्ट्रीय अपंग विकास महासंघ तर्फे तहसीलदार कार्यालयात देण्यात आले. राष्ट्रीय…

Read More

‘माणूस मारल्याने विचार मरत नाही’ – लक्ष्मण पाटील धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड स्कुल येथे गांधीजींचा स्मृतिदिन व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. शिक्षिका भारती तिवारी यांनी ‘दे दी हमें आजादी, बिना खडग बिना ढाल…’ या गितातून गांधींजींना अभिवादन केले. शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी ३० जानेवारी चे ऐतिहासिक महत्व सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्मृतिदिन तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण करण्याऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या उद्देशाने…

Read More

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील एका १६ वर्षीय मुकबधीर मुलीवर गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून गर्भवती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आली आहे. यात एकाला अटक केली असून इतर फरार आहे. पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारी मुकबधिर १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी ही मुकबधिर असल्याचा गैरफायदा घेत गावातील दिपक नाना भिल आणि लखन उर्फ अंकुश बुध भिल यांच्यासह इतर काही मुलांनी तिला गेल्या सात महिन्यांपासून शेतात घेवून जावून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील पुनगाव रोडवर दुचाकीचा कट लागल्याने २३ वर्षीय तरूणाचा चाकू भोसकून खून झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणात पाचोरा पोलीसांनी पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील पुनगाव रोड रस्त्यावरील बुऱ्हानी इंग्लिश मेडियम स्कूलच्या आवारात रविवारी ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी कट लागल्याने भूषण नाना शेवरे (वय – २३) रा. दुर्गा नगर, पाचोरा या तरूणावर लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयूर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहूल उर्फ मॉडी पाटील, चेतन उर्फ स्टायलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील आणि पवन पाटील (पूर्ण…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हुतात्मा दिनानिमित्त रविवारी ३० जानेवारी रोजी सकाळी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सकाळी १०.५९ वाजता महानगरपालिकेचा भोंगा वाजताच सर्व सावधान स्थितीत एका जागी उभे राहिले. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उप अधिष्ठाता डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. अरुण कसोटे, डॉ. वैभव सोनार, डॉ. बाळासाहेब सुरोसे, डॉ. एन.डी.महाजन, सुनीता इंगोले, संदीप बागुल विलास वंजारी, अजय जाधव, तेजस वाघ, अभिषेक पाटील आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी यांनी केले.

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चाळीसगाव येथील भोसर येथे मारहाणी प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने चौघांना दिलेली तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुंबे यांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी रद्द करून चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे. सविस्तर हकीकत अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भोसर येथील लखन रावसाहेब जगताप, आनंद परमेश्वर जगताप, गणेश भगवान जगताप आणि रावसाहेब धना जगताप या चौघांनी २६ मार्च २०११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर शौचालयासाठी खड्डा खणत असतांना त्यांना शेजारी राहणारे एकनाथ मालजी पाटील व त्यांची मुले नरेंद्र एकनाथ पाटील, संदीप एकनाथ पाटील व प्रमिलाबाई यांनी विरोधात केला. यावेळी लखन जगताप,…

Read More

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बेकादेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर एमआयडीसी पोलीसांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता छापा टाकून १ हजार २५० रूपये किंमतीची दारू हस्तगत केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना रविवारी ३० जानेवारी रोज दुपारी मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोहेकॉ गफार तडवी, पोकॉ शांताराम पाटील, महिला पोलीस आलका माळी, पोकॉ. सिध्देश्वर लटपटे यांनी दुपारी १ वाजता कुसुंबा येथे छापा टाकला. यात…

Read More

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील : स्थानिय सुवर्णमहोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगांव येथे अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन. कोळी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक जे.एस.पवार यांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील पर्यवेक्षक जे.एस.पवार , एस.एन.कोळी , हेमंत माळी , व्ही.टी.माळी, पी.डी.पाटील, अशोक पाटील तसेच शिक्षक बंधु – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Read More

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन आणि हुतात्म्यांना आदरांजली लक्ष्मण पाटील प्रतिनिधी : येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. तत्पुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास मान्यवरांनी माल्यार्पण केले. तद्नंतर गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी अभिवादनपर मनोगतातून व्यक्त केले की, गांधीजींनी दिलेल्या अहिंसेचा संदेश नक्कीच प्रेरणात्मक आहे. देशासाठी गांधीजींनी अतुलनीय कामगिरी केल्याने त्यांना व त्यांच्या कार्याला कधीही विसरता येणार नाही. असे श्री .वाघ म्हणाले. याप्रसंगी नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे,…

Read More

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील जवानाच्या बँक खात्यातून अज्ञात भामट्याने ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्याचे सांगून १४ हजार रूपयांचा ऑनलाईन चूना लावल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, रोहित राजाराम पाटील (वय-२९) रा. शिरसोली ता. जि. जळगाव हे इंडोतिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स मध्ये नोकरीला आहे. रोहीत पाटील हे २८ जानेवारी रोजी शिरसोली येथे घरी असतांना एका अनोळखी नंबरवरून त्यांना एक मॅसेज आला. मॅसेजनुसार त्यांनी एक ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. आणि त्यात डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, आधार कार्ड आणि पासबुकचे फोटो अपडेट केले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीवाचून बँक खात्यातून १३ हजार…

Read More