Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शहीद जवानांच्या वारसदारांना मिळणार सैन्यात नोकरी !
    राज्य

    शहीद जवानांच्या वारसदारांना मिळणार सैन्यात नोकरी !

    editor deskBy editor deskDecember 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशाचे संरक्षण करीत असताना शहीद झालेल्या जवानाच्या परिवारातील बहीण आणि मुलींनाही आता अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी मिळू शकणार आहे. लष्करात सुरू असलेल्या सुधारणांच्या कामात हा पुढाकार घेतला जात आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या शिफारशीनंतर सरकार यावर गांभीर्यानं विचार करत आहे. समितीनं अशी नियुक्ती लिंगभेद न करता करण्याची शिफारस केली होती. त्यात म्हटलंय, शहीद जवानाचा मुलगा, भाऊ अथवा मुलगी आणि बहिणीला अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी दिली जावी, असं नमूद केलंय.

    सध्याच्या नियमांनुसार, ‘जेसीओ (JCO) किंवा कोणत्याही दर्जाचा जवान युद्धात मारला गेला तर लष्कर त्याच्या एका मुलाला ताबडतोब सैन्यात नियुक्त करतं. पण, कन्येची नियुक्ती करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध नाहीये. जर शहीद जवान अविवाहित असेल, तर त्याच्या भावाला ही संधी दिली जाते, पण बहिणीला पर्याय नाही.’

    याशिवाय, जर शहीद जवान विवाहित असेल. परंतु, त्याला मूल नसेल किंवा मुलगा नसेल, तो अल्पवयीन असेल तर त्याच्या सख्या भावाला ही संधी दिली जाते. परंतु, त्यानं शहिदाच्या विधवा पत्नीशी लग्न करावं अशी अट आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीनं या मुद्द्यावर बराच विचार केल्यानंतर नुकताच आपला अहवाल सरकारला सादर केलाय. सध्याच्या नियमांमुळं या योजनेचा लाभ सर्व शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळत नाही. नौदलानं समितीला सांगितलं की, 2014 पासून शहिदांच्या नातेवाईकांना 35 नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. 2016 पासून हवाई दलानं एकूण 30 नियुक्त्या दिल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडं कोणतीही आकडेवारी नसल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं. यावर समितीनं आश्चर्य व्यक्त केलंय. ही शिफारस महत्त्वाची आहे. खरं तर हे नियम खूप जुने आहेत. तेव्हा सैन्यात महिलांची भरती होत नव्हती. आज तिन्ही सैन्यात महिला सैनिक आहेत, त्यामुळं या शिफारशीचा गांभीर्यानं विचार केला जात आहे. लष्करात महिला सैनिकांची लष्करी पोलीस म्हणून भरती केली जात आहे. दुसरीकडं हवाई आणि नौदलातील महिला जवानांसाठी यावर्षीपासूनच प्रवेश खुला करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धार्मिक यात्रेवरून परतताना काळाचा घाला : जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

    April 18, 2026

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.