• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुतणीचे अघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार !

editor desk by editor desk
February 1, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
पुतणीचे अघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

भाऊबंद्कीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. ग्वाल्हेरमध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पुतणीवर लैगिंक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीचे अंघोळ करताना आरोपीने अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले.

त्यानंतर आरोपींनी या विद्यार्थिनीला या व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी काकाने मुलगी घरी आल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीने मुरार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या मुलीचा काका सोनू जाटव काही महिन्यांपूर्वी ग्वाल्हेरमध्ये राहायला आला होता. त्या काकाने अल्पवयीन अंघोळ करताना तिचा अश्लील फोटो व्हिडीओ बनवला होता. त्यानंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्रास देत होता. आरोपी गेल्या महिन्यात भाचीला लाल टिपरा येथील संकुलात बोलावले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी तिचा सतत छळ करत होता. आरोपीची हिंमत इतकी वाढली होती की आरोपी मुलीच्या घरी येऊन सतत बलात्कार करत होता. ‘अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार, आरोपी इतका क्रूर होता की तो अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत बलात्कार करत होता. आरोपी हा नात्याने मुलीचा काका होता, त्यामुळेच त्याच्या येण्या-जाण्याबाबत घरच्यांनाही शंका आली नाही. आरोपी काका आपल्यासोबत नशेच्या गोळ्या आणायचा आणि चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून त्या मुलीच्या आई-वडिलांना आणि भावाला द्यायचा. मुलीचे आई-वडिल गाढ झोपेत असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. अखेर वैतागून अल्पवयीन मुलीने सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. 14 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून मुरार पोलिसांनी आरोपी काका सोनू जाटवविरुद्ध एफआयआर नोंदवला. मुरार पोलिसांनी आरोपी सोनूविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच मुरार पोलिसांनी कारवाई करत आरोपी काका सोनूला लाल टिपरा परिसरातून अटक केली. आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे.

Previous Post

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मनरेगा कर्मचारीचे आंदोलन !

Next Post

दिनेश चव्हाण ७ हजार मतांनी विजयी ; अजूनही मतमोजणी सुरू

Next Post

दिनेश चव्हाण ७ हजार मतांनी विजयी ; अजूनही मतमोजणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !
राजकारण

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर घणाघात !

May 21, 2025
छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार
क्राईम

छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश : २७ नक्षलवाद्यांना केले ठार

May 21, 2025
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
कृषी

महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

May 21, 2025
शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !
राजकारण

शरद पवार हे लवकरच भाजपमय होणार !

May 21, 2025
चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

चमगाव शिवारात शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

May 21, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरून चोरट्यांनी पर्स लांबविली !

May 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group