Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी भरधाव एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोदवड तालुक्यातील मनुर गावातील तिघे युवक जागीच ठार झाले. हा अपघात १३ सोमवार रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वरणगावजवळील सुसरी शिवारात घडला. या अपघाताने बोदवड तालुक्यातील मनेर बु.॥ गावात मोठी शोककळा पसरली आहे. सचिन राजेंद्र शेळके (२६), भागवत प्रल्हाद शेळके (४३) व जितेंद्र कैलास चावरे (३२, तिघे रा.मनुर बु.॥, ता.बोदवड) अशी मयतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनुर बु.॥ येथील तरुणाचा वरणगावजवळील पिंपळगाव येथे सोमवारी विवाह असल्याने वर्‍हाडी जमले होते तर मनुर गावातील तिघे भावकीतील तरुणही लग्नस्थळी आले होते व लग्नाला दुपारी अवकाश असल्याने वरणगावातील नागेश्वर मंदिरावर दर्शनासाठी जातो म्हणून सचिन…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथूनच जवळ असलेल्या चिंचखेडा खुर्द येथे १२ रविवार रोजी दोन महिलांनी घराला आग लागल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, कपाटासह गाधी, कुलर व संसारोपयोगी वस्तू जळाल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गावातील दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील चिंचखेडा येथे रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पद्मिनी नारायण पाटील यांच्या घराला आग लागली तर पाटील यांनी केलेल्या आरोपानुसार संशयित उषा निवृत्ती मेनकार (कोळी), सिंधूबाई सुपडू मेनकार यांनी आपल्या घराला आग लावल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी रंग पंचमीच्या दिवशी शुभम नारायण पाटील यांनी वनविभागाला माहिती…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रामदास आठवले हे पराभूत झाले होते. असे असताना त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभेचे वेध लागले असून पुन्हा लोकसभा लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. ते म्हणाले, मी शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभूत झालो. मात्र मला पुन्हा लोकसभा लढवण्याची इच्छा आहे. तसेच भाजपच्या नेत्यांनी विश्वास दाखवला तर मी शिर्डी लोकसभा लढणार असून मतदारसंघाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करेन,असेही आठवले म्हणाले. यामुळे…

Read More

राज्यासह देशाला वेड लावणारी जोडी म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर. ‘सैराट’ या चित्रपटातून या दोन्ही कलाकारांनी मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटातून ही जोडी अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. ‘सैराट’नंतर ‘झुंड’ या चित्रपटातही ही जोडी एकत्र दिसली होती. रिंकू आणि आकाश यांच्यात चांगली मैत्री असून बरेच ही जोडी आपल्या मैत्रीवर भाष्य करत असते. परंतु, यावेळी आकाशने रिंकूच्या फोटोवर केलेल्या कमेंटमुळे अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आहेत. रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असून वरचेवर चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात बऱ्याचदा ती तिच्या फोटोशूटमधील काही निवडक फोटोही चाहत्यांसोबत शेअर करते. यात अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर…

Read More

राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चिन्हे दिसू लागली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तिवेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला असून मुख्य सचिवांनी तोडग्यासाठी सोमवारी बोलाविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलाविली, तरच पदाधिकारी बैठकीस जातील, असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कर्मचारी संघटनांच्या ताठर भूमिकेमुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला, तरच तोडगा निघू शकतो. अन्यथा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील अल्पवयीन मुलीस एकाने लग्नाचे आमिष देत तिला गरोदर करीत त्यानंतर गर्भपात केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका परिसरातील १८ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. या तरुणीला दि १ मे २०२१ पासून ते आजपर्यत लग्नाचे आमिष दाखवून संशयित आरोपीच्या राहत्या घरात तिच्यासोबत चुकीचे कृत्य केले त्यानंतर या अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने संशयित आरोपीच्या आईसह दोन जणांनी मिळून तिचा गर्भपात करण्यासाठी तिला काही फळे व पेय पिऊ घातल्याने गर्भपात झाला तर अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष देत लग्नाची तारीख ठरवून लग्नास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक 11 मार्च 2023 रोजी राज्यस्तरीय iNOVA- 2023 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये आयटी क्वीज व पावर पॉइंट प्रेझेंटेशन या स्पर्धा पदवी व पदव्युत्तर गटातून घेण्यात आल्या . राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयातील माजी विद्यार्थी अझरुद्दीन शेख रिजनल मॅनेजर क्विक हिल्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेख यांनी अँटीव्हायरस व सेक्युरिटी या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी अँटीव्हायरस चे महत्व तसेच क्विक हिल्स मधील विविध सेक्युरिटी आणि क्विक हिल्स चे विविध प्रॉडक्ट आणि फीचर्स यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  येथून जवळ असलेल्या कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या एका ठिकाणी एका अनोळखी महिलेचे हाडे मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चाळीसगाव व ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव जवळील कन्नड घाटाच्या पायथ्याशी अंदाजे २०० मिटर अंतरावर बोढरे शिवारात झाडाझुडपात एका अनोळखी महिलेचे फक्त हाडे आढळून आल्याने चाळीसगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वनपाल दीपक किसन जाधव यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दि १२ मार्च २०२३ रोजीपासून दोन ते तीन महिन्यापूर्वी अनोळखी आरोपीने काही तरी अनोळखी कारणाने महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे प्रेत गोणपाटमध्ये टाकून…

Read More

भारतात सेलिब्रिटींची जेवढी चर्चा होती तेवढी चर्चा कदाचितच इतर कोणाची होत असेल. बॉलिवूडचे कलाकार नेहमीच लोकांसाठी चर्चेचा विषय ठरले आहेत. कलाकारांचे चाहते ही तसेच.आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी ते काहीही करायला तयार असतात. पण बॉलिवूडच्या या जगात असे अनेक कलाकार आहेत ज्यांचा मृत्यू अजूनही रहस्य राहिलेले आहे. त्यांचा मृत्यूचं कारण अजूनही पुढे येऊ शकलेलं नाही. अशीच एक बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री म्हणजे प्रिया राजवंश. जिची मुंबईत हत्या करण्यात आली होती. बॉलीवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्रीने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. पण पुढे तिची जुहूच्या बंगल्यात हत्या झाली. 2000 साली जुहू येथे गूढ परिस्थितीत तिचा मृतदेह आढळला होता. जिने आपल्या अभिनयाने आणि…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  तालुक्याला लागून मध्यप्रदेशची सीमा असून तेथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि अंमली पदार्थ हे इकडे येत असल्याचा आरोप आधीपासूनच करण्यात येत आहे. पोलिसांनी यावर अनेकदा कारवाई केली असली तरी देखील हा धंदा दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. आज मुक्ताईनगर शहरात गुटख्याने भरलेला ट्रक पकडण्यात आला आहे. या ट्रकमध्ये पूर्णपणे गुटखा भरलेला असून याची किंमत लाखोंमध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जप्त करण्यात आलेला ट्रक हा मुक्ताईनगर पोलीस स्थानकात जमा करण्यात आला असून फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. तर याठिकाणी आ.एखनाथराव खडसे यांनी…

Read More