जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून चारचाकीसह दुचाकी सुसाट चोरल्या जात आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणाहून दुचाकीसह चारचाकी चोरीस जात असले तरी पोलीस प्रशासनाकडून कुठलेही कठोर पावले उचलले जात नाही. शहरातील एका परिसरातून चारचाकी चोरीस गेली होती. या प्रकारणी एमआयडीसी पोलिसांनी नुकतेच धारावी येथील एका चोरट्यास अटक केली आहे. शहरातील अयोध्या नगरातील बबनराव थोरवे यांची कार लांबविणाऱ्या अब्दुल रहेमान शहाबुद्दीन शेख (३७, रा.धारावी झोपडपट्टी, मुंबई) या चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी नागपूर येथून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली कार हस्तगत केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.बबनराव थोरवे यांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता घरासमोर त्यांच्या…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल मध्ये बंपर भरती निघाली आहे. टेक्निकल आणि ट्रेड्समन अशी ही पदे आहेत. पुरुष आणि महिला उमेदवारांच्या ९००० हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी फॉर्मही सुटले असून २७ मार्चपासून अर्ज करता येणार आहेत. यासाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. CRPF Constable Recruitment 2023 ही भरती पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगढ़ सेक्टरसाठी होणार आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. रिक्त जागा तपशील कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) च्या एकूण पदांची संख्या – 9212 पुरुष – 9105 रिक्त जागा महिला – 107…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता इयत्ता 10 वी बोर्डाचे पेपर देण्यासाठी जात असतांना संशयित आरोपी तरुण हा 1 मार्चपासून सतत पाठलाग करत होता तर 15 मार्च बुधवार रोजी त्याने पीडीतेला मी तुझ्यावर प्रेम करतो. तू का करत नाही, असे म्हणत, तू मला ध्यानात ठेव, मी तुला बघून घेईल, अशी धमकी देवून वर्गातून निघून गेला. एव्हढेच नव्हे तर संशयित आरोपीने हात धरुन प्रेम करण्यासाठी बळजबरी करुन पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तहसील कार्यालयात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एसबीच्या पथकाने नायब तहसीलदार यांच्यासह एका कोतवालावर लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मिळालेली माहिती अशी कि, धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे नामक इसमाने तक्रारदार यास वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी ३० हजाराची लाच मागितली होती ती तडजोडअंती २५ हजार रुपय निश्चित झाली होती पण तक्रारदाराने जळगाव येथील एसीबीकडे याची तक्रार केली होती. या प्रकरणी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी यांच्या पथकासह लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदार…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात महिलांसोबत गैरवर्तन केल्याच्या बातम्यांनी लोक हैराण झाले आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्ही थक्क व्हाल. डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका करोडपतीने महिला प्रवाशाकडे अशी विचित्र मागणी केली, जी ऐकून ती थक्क झाली. लक्षाधीश व्यक्तीने महिलेला सांगितले की काही तरी करण्यासाठी तो तिला 80 लाख रुपये देण्यास तयार आहे. जाणून घेऊया काय आहे प्रकरण? आश्चर्याची गोष्ट म्हणजे करोडपतीने स्वतः ट्विट करून लोकांना याची माहिती दिली. स्टीव्ह किर्श यांनी @stkirsch हँडलवरून ट्विट केले, ‘मी सध्या डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाइटवर आहे. माझ्या शेजारी एक महिला बसली आहे, जी एका फार्मा कंपनीत काम…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३३ वर्षीय महिलेचा एकाने महिलेच्या पतीसह दिराला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ३३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि १५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी अनवर युसुफ पठाण (वय ३३) याने ३३ वर्षीय महिलेचा पाठलाग करीत अश्लील हातवारे करीत असल्याने महिलेच्या पतीने संशयित आरोपीस बोलण्यास गेला असता त्याला देखील मारहाण करीत महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण देखील केली तर याठिकाणी महिलेचा दीर हा आला असता त्याला देखील संशयित…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील जि. प. विश्रामगृहमागे गणेश कॉलनी परिसरात घर मालक घरात झोपलेले असतांना घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम दागिन्यासह घरातील ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १४ रोजी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार जि. प. विश्रामगृहमागे गणेश कॉलनी परिसरात शीतल दीपक पवार हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.१५ रोजी पहाटे ३ वाजता झोपेतून पाणी प्यायला उठली असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. म्हणून घरातील कपाट बघितले असता त्यातील २० हजार रुपये रोख, २५ हजार किमतीचे १ तोळ्याची सोन्याची पोत, ६ हजार किमतीचे २ ग्रॅम सोन्याचे कानातले, अडीच हजार रुपयांचे दोन मोबाईल असा एकूण ५३ हजार…
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची रस्त्याने जात असताना अश्लील हावभाव करून छेड काढल्याप्रकरणी येथील दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, पारोळा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. या अल्पवयीन मुलीस तिच्याच गावातील दोघांनी गेल्या दोन महिन्यांपासून वेळोवेळी अश्लील संभाषण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी पारोळा पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे करीत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. याने अनेक नागरिकांना शासकीय कार्यालयात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यावर आता प्रहारचे नेते आ.बच्चू कडू यांनी याबाबत मोठ वक्तव्य केले आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा करत कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मंगळवारी विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदनही केले. मात्र, या संपावरुन आता सोशल मीडियातही चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यात, संपाच्या समर्थनार्थ असलेल्या कर्मचाऱ्यांकडून आमदार-खासदारांच्या पगारांचा मुद्दा पुढे आणला जातोय. त्यावरुन, आता आमदारबच्चू कडू यांनी स्पष्टपणे आपली भूमिका…
पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. तरुणाकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त करण्यात आले आहे. महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अन्सारीविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात…

