Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था  सिडकोत एकतर्फी प्रेमातून घरात घुसून कुटूंबियांना जातीवाचक शिवीगाळ करीत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयितास गजाआड केले आहे. विशाल सुभाष शेलार (२८ रा. एकता चौक,राणेनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अधिनियम (अ‍ॅट्रोसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आणि पीडिता एकाच भागातील रहिवासी असून शेलार गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. एकतर्फी प्रेमातून त्याने गुरूवारी (दि.९) दुपारच्या सुमारास मुलीचे घर गाठून तिच्याकडे प्रेमाची मागणी केली होती. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे संतप्त युवकाने दुस-या दिवशीही तिचे घर गाठत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीत बंडखोर उमेदवार संजय पवार विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यावर संजय पवार विजयी झाले आहे. संजय पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे उमेदवारी मागितली होती. पण नंतर त्यांनी बंडखोरी केली. निवडणुकीवेळी शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गटाच्या एका सदस्याने त्यांना पाठिंबा दिल्याने संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील शिंदे गट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील शेतकरीची बँक म्हणून नावाजलेली असलेली जिल्हा बॅकेत आज अध्यक्षपदासाठी निवडणूक होती. जिल्हा बॅकेत अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रविंद्र भैय्या पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनीही आयत्यावेळी अध्यक्षपदासाठी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशात सर्वत्र लग्नाचे सिझन सुरु असून गेल्या दोन दिव्साआधीच राज्य सरकारचा अर्थसंकल्प देखील जाहीर झाला आहे. यात अनेक वस्तूच्या किमती कमी तर अधिक देखील झाल्या आहे. त्यातच ग्राहकांची झुंबड लागलेली असते ते म्हणजे सोनं खरेदी करण्यासाठी. येत्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या खरेदीत लक्षणीय वाढ होईल त्यातून लोकं ही सोन्याकडे गुंतवणूकच्या दृष्टीनंही खरेदी करताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सोन्याच्या किंमतीमध्येही लक्षणीय वाढ झालेल्या दिसणार आहे. त्यातून लवकरच हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडव्यालाही सुरूवात होईल. त्यासाठीही अनेकांची लगबग ऐव्हानाच सुरू झाली असेल. सणा-सुदीला आणि लग्नसराईच्या या काळात आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ पाहायला दिसून येते आहे. तेव्हा चला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात नुकताच मनसेचा वर्धापन मोठ्या उत्साहात झाला यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानत राज्यातील सत्ताधारीपासून ते थेट विरोधकांना लक्ष केले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली होती. या टीकेला उत्तर लागलीच ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी दिले आहे. सत्ताधारी केंद्रातील भाजपला सुनावत मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी थेट हल्ला चढवला. याचदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत टीका केली. राज ठाकरे यांनी राजकारणात दिवस तेच राहत नाहीत ते बदलत असतात असं सांगत त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही खोचकपणे टीका केली आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीका करताना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा आज पहाटेच ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या चार ते पाच अधिकाऱ्यांनी कागलमधील हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळाप्रकरणी मुश्रीफ यांच्या घराची ईडीकडून झाडाझडती घेतली जात आहे. कोलकात्यातील बोगस कंपन्यांमधून 158 कोटी रुपये या कारखान्यात ट्रान्स्फर झाले होते, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हा पैसा आला कुठून? ही कंपनी आहे कुठे? हा मनी लॉन्ड्रिंगचा पैसा आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होती. तसेच, या प्रकरणी मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही सोमय्या यांनी केली होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आता किरीट सोमय्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. सोमय्यांनी हसन मुश्रीफांविरोधातील न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याच्या चौकशीचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. https://twitter.com/barandbench/status/1634093285697282048?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1634093285697282048%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=about%3Asrcdoc भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील फसवणूक केल्याप्रकरणाची न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत कशी मिळवली याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश या प्रकरणी चौकशी करतील. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने मुश्रीफ यांना पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत 24 एप्रिल 2023 पर्यंत सक्तीच्या कारवाईपासून संरक्षणही दिले आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका नामाकीत हॉस्पिटलमध्ये महिला सुरक्षा रक्षकाचा सुपरवायझरकडून विनयभंग करून मानिसक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एका नामाकीत हॉस्पिटलमध्ये महिला सुरक्षा रक्षका रक्षक म्हणून शहरातील एका भागात राहणारी ३१ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एकाच हॉस्पिटलमध्ये सुपरवायझर म्हणून खालीद अहमद बुऱ्हानोद्दीन काझी हा नोकरीला आहे. दोन दिवसांपासून खालीद हा महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. महिला दिनाच्या दिवशी ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पिडीत महिला ही नेहमीप्रमाणे कामावर आली. हजेरी लावण्यासाठी थम मशीनजवळ आली असतांना खालीद याने तिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राष्ट्रवादी काॅग्रेसच्या परिषदेतील गटनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीच्या प्रतोतपदी अनिकेत तटकरेंची निवड करण्यात आली.राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना याबाबतचे पत्रही देण्यात आले होते. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव असल्याने त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आले आहे. एकनाथराव खडसेंच्या माध्यमातून जळगावमध्ये राष्ट्रवादीला अधिक बळ मिळेल आणि आगामी निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असे पक्षाचे राजकीय गणित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले. त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने मोठी जबाबदारी दिली आहे.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  सोशल मीडियावर लग्नासंबंधीत नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी नवीन जोडपं स्वत: शेअर करतात. तस काही व्हिडीओ हे कुटुंबीय देखील शेअर करतात. हे व्हिडीओ लग्नातील मजेदार क्षणांचे असतात. तर काही व्हिडीओ हे नवरा-बायकोच्या ग्रँड एन्ट्रीचे असतात. पण सध्या लग्नासंबंधीत एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. खरंतर आपलं लग्न ठरल्यापासून एक मुलगी आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहू लागते. तिच्यासाठी ही नवीन सुरुवात असते. नवीन लोक, नवीन गोष्टी या सगळ्यात ती दंग असते. पण विचार करा की एका मुलीचं स्वप्न तिच्या लग्नादिवशीच तुटलं तर? त्या मुलीला कळालं की…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  प्रत्येक महिला नेहमीच नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रसती व्हावी असा विचार असतो पण काही वेळेस अशी संधीच येत नाही कि आपण हॉस्पिटलमध्ये जावे लागेल अशीच एक घटना घडल्याने अवघ्या राज्याच्या रेल्वे विभागात या घटनेचे चर्चा होत आहे. त्याच्या मागचं कारण सुद्धा तितकेच खास आहे. नुकतेच एका नवजात बाळाचे नामकरण झालं आहे. त्याचं झालं असं, की मुंबईहून नेहमीप्रमाणे सेवाग्राम एक्सप्रेस धावू लागली होती. नाशिक स्टेशन जसं जसं जवळ येऊ लागलं तसं तसं एका महिलेला प्रसूतीकळा येऊ लागल्या. महिलेसोबत असलेल्या महिला तशा घोळका करूनच बसलेल्या होत्या, मात्र प्रसूती कळा सुरू होताच त्यांनी महिलेला रिंगण केले. ही संपूर्ण लगबग जनरल डब्यात सुरू…

Read More