Author: editor desk

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  औरंगाबाद शहराचे महिनाभरापूर्वी नामांतराचा मुद्दा तापलेले असतांना रामनवमीच्या पार्श्वभूमी किराडपुऱ्यातील राम मंदिरात तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. काही क्षणातच परिसरात दंगल पेटली. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला केला. त्यांची वाहने दगडफेक करुन फोडली. या हल्ल्यात २ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हा हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता.  गुरुवारी साजरा होणाऱ्या रामनवमीनिमित्त शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मिश्र वस्तीत असलेल्या किराडपुऱ्यातील राम मंदिरात देखील जय्यत तयारी सुरू होती. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तरुणांचा एक गट मंदिराच्या दिशेने जात होता. येथेच…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील भजे गल्लीमध्ये दारू पिऊन वाद घालणाऱ्या तरुणांना काही दिवसांपूर्वी जिल्हापेठ पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेले होते. याचा राग मनात ठेवून त्या तरुणांनी मित्रांसोबत जेवण्यासाठी हॉटेलात आलेल्या गणेश मधुकर पाटील (३८) या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चॉपरने वार केल्याची घटना हॉटेल रिगल पॅलेसमध्ये मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एक संशयित अद्याप फरार आहे. मिळालेली माहिती अशी कि, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस गणेश पाटील मंगळवारी रात्री त्यांचे मित्र मयूर गवळी व सीताराम पुरोहित यांच्यासोबत जेवणासाठी हॉटेल रिगल येथे गेले होते. समोरील टेबलावर बसलेले…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  पाळधी येथे मंगळवारी रात्री झालेल्या दोन गटातील दगडफेकी नंतर रात्रीच पोलिसांनी धरपकड सुरू केली होती त्या नुसार ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यातील १६ जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस कोठडी मिळालेल्या संशयितांना एरंडोल आणि धरणगाव पोलीसात ठेवण्यात आले आहे. गावात दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.बुधवारी गाव पुर्णपणे बंद होते. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून तणाव पूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री वणी गडावर जाणारी दिंडी प्रार्थना स्थळावरून जात असताना काही लोकांनीं दिंडीवर दगडफेक केली. यामुळे पळापळ झाली. गावात…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका हॉटेल परिसरातून एकाची दुचाकी लंपास झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील वराड खु येथील विनोद गुलाब पिंजारी (वय ३६) हे आपल्या परिवारासह रहायला आहे. दि १२ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुसळी फाट्यावर असलेली हॉटेल अर्जुन या परिसरातून तरुणाची दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.डब्ल्यू.९४८६ हि २० हजार रुपये किमतीची अनोळखी इसमाने चोरून नेली आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अरुण निकुंभ हे करीत आहेत.

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील पिंपळकोठा बु गावा जवळील हॉटेल नॅशनल पंजाब समोर टँकर व टेलर यांच्या झालेल्या समोरांवरील अपघातात एक ठार झाला असून औषधाने भरलेला टेलर ला आग लागली. मिळालेली माहिती अशी कि,  २८ मार्च रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हॉटेल नॅशनल पंजाब जवळ जळगाव कडून धुळ्याकडे जाणाऱ्या टेलर क्रमांक एन एल ०१ क्यू ७१५१ वरील चालकाचे टेलर वरील नियंत्रण सुटल्याने त्याने धुळ्या कडून येणाऱ्या टँकर क्रमांक एम एच ३४ बीजी ९८३७ ला समाोरून जोरदार धडक दिल्याने ती रोडच्या डाव्या साईडला जाऊन खाली उतरली व टेलरचे केबिनमध्ये आग लागल्याने केबिनसह मागील बाजूने पेट घेतला . टेलर क्रमांक एन एल झिरो…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला, धार्मिक भावना दुखावणे, दरोड्याचा प्रयत्न, आर्म अ‍ॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तांबापूरातील रिजावन उर्फ काल्या गयासोद्दीन शेख (वय-22) व रामेश्वर कॉलनीतील रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय-21) या दोघ सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढल्यानंतर त्यांची अमरावती व नागपुर कारागृहात रवागनी करण्यात आली आहे. जळगाव शहरासह धुळे जिल्हा, चोपडा तालुक्यात दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, गंभीर दुखापत, सरकारी नोकरांवर हल्ला तसेच घरफोडी, हद्दपार आदेशाचे उल्लंघन आणि बेकायदेशी हत्यार सोबत ठेवणे असे वेगवेगळेे 21 गंभीर गुन्हे रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख याच्यावर तर रितेश…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातून नातेवाईक महिलेसोबत बाहेर गावी जाताना ५४ वर्षीय महिलेची बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाची दीड लाखांची सोन्याची पोत लांबविल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील संभाजी नगर परिसरात कल्पना अशोक महाजन (वय-54) महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार दि. 27 मार्च रोजी दुपारी एक वाजता त्यांचे नातेवाईक कलावती सुरेश महाजन रा. रामानंदनगर यांच्यासोबत रिंगणगाव येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आल्या. रिंगणगाव येथे जाण्यासाठी त्या रवंजा बसमध्ये बसल्या. यावेळी बसमध्ये मोठी गर्दी होती. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जवळून बस जात असताना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आतापर्यंत एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत, यामध्ये प्रेमवेडे आशिक टोकाचा निर्णय घेत ज्या मुलीसोबत आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहिलीच तिच्यासोबतच त्यांनी घात केला आहे. अशातच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एक ट्यूशन टीचरच विद्यार्थीनीच्या प्रेमात पडला होता. सलग 4 वर्षे शिक्षक संबंधित विद्यार्थिनीला प्रपोज करत होता मात्र तिने कायम नकार दिला. शेवटी त्याने जे केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आरोपी शिक्षक विद्यार्थीनीला शिकवायचा. काही दिवसानंतर त्याचं शिकवता शिकवता माझंविद्यार्थीनीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने अनेकदा तिच्यासमोर प्रेम व्यक्त केलं होतं. परंतु प्रत्येक वेळी तिने त्याला नकार दिला. सारखा सारखा तिचा नकार ऐकून तो रागावतो. त्यानंतर…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. बापट यांना बुधवारी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होेते. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचा पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे . टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एका ७ वर्षाच्या मतीमंद अल्पवयीन मुलीस दि २८ रोजी घराच्या बाहेरून पळवून नेल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अशोक किराणा परिसरातील एका नगरात परिवारासह ७ वर्षीय अल्पवयीन मुलगी रहायला आहे. दि २८ रोजी हि अल्पवयीन मतीमंद मुलगी घराच्या अंगणात खेळत असतांना कुणी तरी इसमाने तिला काही तरी आमिष देत पळवून नेल्याची घटना काही वेळाने उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने थेट एमआयडीसी पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन हे करीत आहे.

Read More