मुक्ताईनगर : प्रतिनिधी भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालकासह इतर ५ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील सचिन रंगनाथ गवई (वय-४०) हे रिक्षाचालक असून १४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते रिक्षाने बोदवड फाट्याच्या पुढे जात होते. त्यावेळी समोरून येणारे विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर भरधाव वेगाने येऊन रिक्षा क्रमांक (एमएच १९ सीएफ ७७३) ला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षाचालक सचिन गवई यासह सिद्धांत सचिन गवई, राजू बळीराम इंगळे, योगेश कैलास हिरोडे आणि भीमराव भिकाजी हिरोळे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातील जगवानी नगरात राहणाऱ्या वृद्धाच्या उघड्या घरातून मध्यरात्री ८० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, एमआयडीसी परिसरातील जगवानीनगरात निवृत्ती नथू पाटील (वय ८०)हे राहत असून त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ४ एप्रिल सायंकाळी ५ वाजता ते ८ एप्रिल दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील लाकडी कपाटातून ८० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. हि रोकड मलकापूर तालुक्यातील हिवरा येथील एका महिलेने चोरून नेल्याचा संशय निवृत्ती पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता निवृत्ती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्या सोशल मिडीयाच्या माद्यमातून वेगवेगळ्या राज्यासह जगभरात कुठल्याही व्यक्तीशी बोलणे अगदी सोपे झाले आहे पण काही लोक याचा चुकीचा वापर करीत गुन्हेगारी क्षेत्रात पाय रोवत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा बबेरू कोतवाली गावात राहणाऱ्या एका प्रोढ वयीन व्यक्तीने डेटींग अॅपच्या मदतीने राजस्थानातील एका महिलेशी मैत्री केली. या महिलेला आधीच्या पतीपासून एक अल्पवयीन मुलगी होती. फोनवरील मैत्रीनंतर ही महिला त्याच्यासोबत बांदा येथे एकत्र एक वर्षांपासून राहू लागली. त्यानंतर या प्रोढ व्यक्ती सोबत ही महिला पत्नी सारखी राहू लागली. आणि तिच्या मुलीला त्याने आपली मुलगी मानण्याचे नाटक केले. या महिलेने वारंवार मुंबईला जाण्याचा हट्ट त्याच्याकडे लावला.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था छत्तीसगडच्या बालोद जिल्ह्यात तब्बल २० वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी खोदकाम करून मानवी अवशेष बाहेर काढले आहेत. एक व्यक्ती पोलिसांकडे आला आणि त्याने २००३ मध्ये एका मित्राची हत्या केली होती, त्याची आत्मा मला सतावतेय असा दावा केला तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी खोदकाम केले तेव्हा तिथे मानवी अवशेष आढळले. त्यानंतर आता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी टीकम कोलियार आणि छवेश्वर गोयल यांच्यात मैत्री होती. हे दोघेही त्याकाळी १८ वर्षाचे होते. टीकमचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. जी आज त्याची पत्नी आहे. प्रेयसी अश्विनी कोलियार हिच्यावर मित्र छवेश्वर…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव पोलिसांकडून कोंबींग ऑपरेशन दरम्यान खुनाच्या गुन्हातील आरोपी असलेल्या भोदुबाबास अटक करण्यात आली. सदर आरोपीने खूनाची कबुली दिली असून त्याला चाळीसगाव पोलिसांकडून जायखेडा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आलेले आल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वृत्त असे की, दिनांक १९/०४/२०२३ ते दिनांक २०/०४/२०२३ दरम्यान पोलीस अधिक्षक सो. जळगांव यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक, रमेश चोपडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस निरिक्षक संदीप पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोना.राहुल सोनवणे, भूषण पाटील, पोकॉ. विजय पाटील,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्या झाल्याने हादरलं आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्यामुळं ट्रकला भीषण आग लागली. त्यातील पाच जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाला. पूंछ जिल्ह्यात भीमबर गली ते संगिओतकडं दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, लष्करानं युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केलंय. याचदरम्यान, भारतीय लष्करानं शहीद जवानांची नावं जाहीर केली आहेत. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये हवालदार मनदीप सिंग, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई हरकृष्ण सिंग आणि शिपाई सेवक सिंग यांचा समावेश आहे. हे सैनिक राष्ट्रीय रायफल युनिटमध्ये तैनात होते आणि दहशतवादविरोधी…
जळगाव : प्रतिनिधी बी टू सी स्मार्ट एक्सप्रेस कुरिअर सर्व्हीस कंपनीच्या लिंकवर फॉर्म भरायला सांगत स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्या तरुणीला 1 लाख 24 हजारात गंडविल्याची घटना शहरातील जुन्या एमआयडीसीतील परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने ऑनलाइन साडी बुक केली होती पण ती घरी पोहचली नसल्याने फॉर्म भरल्यानंतर तिची फसवणूक झाली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जूनी एमआयडीसी परिसरातील एम.एस.ई. बी कॉलनीत स्वाती तायडे ही तरूणी वास्व्यास असून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. दि. 1 एप्रिल रोजी तिने ऑनलाइन साडी बुक केली होती. ऑनलाईन बुक केलेली साडी दि. 3 एप्रिल रोजी तरुणीला बी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकारणात गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार सातत्याने चर्चेत आलेले आहे. ते नॉट रिचेबल झाल्यापासून सत्ताधारीसह विरोधकांचे धाबे दणाणले होते. पण ज्यावेळी अजित पवार माध्यमासमोर आल्यानंतर सर्व काही उलगडले. तेव्हा पक्ष फुटीच्या चर्चानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सर्व आमदारांना फोन करत विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यात कुठेतरी राजकारणात वेगवान हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याचा चर्चानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत स्पष्टीकरण दिले होते की, जीव गेला तरी शेवटपर्यत राष्ट्रवादीसोबत राहिन. मात्र, दि.१९ एप्रिल रोजी सकाळपासून अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ…
मुंबई : वृत्तसंस्था आराध्या ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनेकदा आराध्या आई ऐश्वर्यासोबत प्रवास करताना दिसते. आई आणि मुलगी दररोज विमानतळावर एकत्र स्पॉट होतात. ऐश्वर्या तसेच अभिताभ बच्चन देखील आराध्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिनेता अभिषेक बच्चन तसेच ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आराध्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी तताडीने सुनावणी होणार आहे. विनाकारण पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत आराध्याने कोर्टात धाव घेतली आहे. 11 वर्षांची आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत असते. आराध्या तिचे आजोबा अमिताभ यांच्यासह…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आ.संजय सावकारे यांची सोशल मिडीयातून बदनामी केल्याप्रकरणी शहरातील एका राजकीय पदाधिकार्यांचा कार्यकर्ता असलेल्या बबलू खान विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तारकेश्वर प्रकाश राणे (वय ३५) यांनी मंगळवारी बाजारपेठ पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, संशयित बबलू खाने याने त्याच्या फेसबुक पेजवरून टक्केवारीबाबत आमदारांविषयी अपशब्द वापरले. आमदारांबाबतचा हा मजकूर फेसबुकवर टॅग करीत आमदारांची राज्यासह शहरात बदनामी केली. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी भादंवि 500 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.

