नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक नागरिकांना ‘गदर’ चित्रपटाची आठवण करून देणारी स्टोरी सध्या देशात घडू लागली असल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. पण पोलीस यंत्रणा ज्या प्रकारे तपास करीत आहे. त्याप्रमाणे हि स्टोरी कुठलीही लव्ह स्टोरी असल्याचे कुठलेही संकेत देत नाही. हि स्टोरी सीमा हैदर भारत आली कशी व का आली यासाठी एटीएसने तिची चौकशी केली असून सीमासोबत तिचा पती सचिन आणि सासरे नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या चौकशीमध्ये सीमाबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. कारण काही तशी कारणे त्यातील सर्वात मुख्य म्हणजे सीमाच्या ओळखपत्रावर तिचं वय हे 21 दाखवण्यात आलं होतं मात्र तिने वय 27 सांगितलं…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आगामी निवडणुकांच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी शहरातील शिवतीर्थ मैदान परिसरात महा सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे शिंदे गटाची शिवसेना आहे घरात आणि दारात जावे यासाठी सर्वाधिक युवकांना जोडण्याचा काम शिंदे गट शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातून एकूण एक लाख शिवसैनिकांची नवीन नोंदणी करण्यात येणार या नोंदणीची सुरुवात जळगाव शहरातून करण्यात आली असल्याचा दावा जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे शिवसेनेतून शिंदे गट निर्माण झाल्यानंतर शिंदे गटाची स्वतंत्र कार्य करणे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच स्थानिक…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या तीन दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड जिल्ह्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती झालेल्या ठिकाणी तळ ठोकून असतांना थेट शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने राज्यतील विरोधकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत देखील कुजबुज सुरु झाली आहे. दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत. दुपारी 4 वाजता एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. परंतु या भेटीगाठीमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, राज्यात रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या तिढ्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात पावसाचा मोठा हाहाकार असतांना रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. या मुलांचं पालकत्व शिंदे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या आज इर्शाळवाडी येथे जाऊन या मुलांचं पालकत्व स्वीकारण्याची माहिती दिली. नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण निर्वासित झाले आहेत. तसेच दुर्घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अजून ८६ जण अडकल्याची माहिती मिळत आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन इर्शाळवाडीतील मुलांची…
मुंबई : वृत्तसंस्था देशात बदलत्या हवामानामुळे राज्यातील पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने कोकणात पावसाचाह कहर सुरु असून यात रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील अनके परिवार जमिनीखाली अडकले असून गेल्या तीन दिवसापासून येथे शोधकार्य सुरु आहे. या ठिकाणी आज ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेट देणार असल्याची बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील नुकसानग्रस्त परिसराची ते पाहणी करतील. तसेच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यावेळी त्यांच्यासोबत असतील. या आधी आमदार आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर बचाव कार्य अजूनही सुरू आहे. येथील मृतांची संख्या आता 22 झाली असून अजूनही 102 नागरिकांचा शोध लागलेला नाही. शिवसेना…
मुंबई : वृत्तसंस्था देशात पावसाचा कहर सुरु असतांना राज्यातील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत मोठ्या दुर्घटनेचा आज तिसरा दिवस असून आज तिसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणी शोधकार्य व मदतकार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मातीचे ढिगारे उपसले जात आहेत. आजही एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी दाखल झाल्या असून या जवानांनी तात्काळ ढिगारे उपसण्या सुरुवात केली आहे. मात्र, इर्शाळगड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. या दुर्घटनेतील मृत आणि जखमींचे कुटुंबीय आणि शेजारच्या गावातील नातेवाईक गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून आहेत. हे कुटुंबीय आणि नातेवाईकही आपल्या आप्तेष्टांचा शोध घेत आहेत. कोण भावाचा शोध घेतंय, तर कोण वडिलांचा…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील एका हॉटेल मालकाने वेटरच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून खून केला. ही घटना तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आली आहे. सुरत रुग्णालयातील पंचनामा आणि आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर हा गुन्ह्याची उकल झाली. पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (वय ३५) रा. माळीवाडा याला ताब्यात घेतले. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र चौधरी याची अमळनेर परिसरातच साई व रूपाली हॉटेल आहे. दगडू पाटील हा तेथे वेटर होता. दगडू गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून येथे काम…
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ शहरातील बाजार पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना षडयंत्र अॅन्टीकरप्शनच्या खोट्या गुन्हयामध्ये अडकवुन अटक करविले प्रकरणी निपक्षपणे चौकशी होवुन न्याय मिळणेबाबत आज काही समाजसेवकांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे कि, वरील विषयास अनुसरुन आम्ही खालील सही करणार भुसावळ शहरातील सामान्य नागरीक नम्रपणे निवेदन करतो की, पोलीस निरीक्षक श्री राहुल बाबासाहेब गायकवाड हे गेल्या दिड वर्षापासुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. त्यांचे कार्यकाळामध्ये त्यांनी भुसावळ शहरातील अनेक गुन्हेगारांवर मोक्का, एम. पी.डी.ए सारख्या कायद्याखाली कठोर कारवाया करुन गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवलेले होते. त्यांच्या प्रभावी व आक्रमक कार्यशैलीमुळे…
जळगाव : प्रतिनिधी शहरानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून नियमितपणे चोरटी वाळूची वाहतूक सुरु असल्याच्या घटना तालुका पोलिसांच्या कानावर आले असतांना त्यांनी वाहतूक सुरु असतांना एका ट्रॅक्टर पकडून चालकाविरोधात तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून नजीक असलेल्या गिरणा नदी पात्रातून दिनांक २० जुलै रोजीच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून एक ब्रास अवैध वाळूची वाहतूक करीत असताना एक ट्रॅक्टर निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालय समोरून जात असताना पोलीस पथकाने कारवाई करीत सुमारे ३ हजार रुपये किमतीची अवैध वाळू तर २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जनार्दन शांताराम सूर्यवंशी रा.भिकमचंद नगर, पिंप्राळा रोड जळगाव यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारचे विधानसभेत अधिवेशन सुरु असून यात सत्ताधारी व विरोधाकामध्ये जोरदार सामना पाहायला मिळत असून आज शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली आहे. खातेवाटपावरून यांच्यात खडाजंगी झाली. या दोघांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुर्चीवरुन उठून शांत केले. आदित्य ठाकरे म्हणाले, सभागृह सुरू होण्यापूर्वी मंत्र्यांचा खातेवाटप होतो. यामुळे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवरील भार कमी होतो. प्रत्येक दिवशी खातेवाटप होतो. एखाद्या मंत्र्यांला उत्तर देता आले नाही तर टाईमपास होतो. आम्ही सगळे आमच्या मतदारसंघातून येतो. महाराष्ट्रात आम्ही आवाज देतो. यावर विधानसभा अध्यक्ष म्हणाले, अधिवेशनापूर्ती जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे दिली…

