अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एकाने कुरियरने तलवार मागविल्याप्रकरणी गांधलीपुरा भागातील पिता पुत्राला पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. शहरात एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील, रवींद्र पाटील, दीपक माळी, सिद्धांत शिसोदे याना दुपारी दोन वाजेच्या सुमारास अर्बन बँकेच्या जवळ नाकाबंदी लावली. दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी स्टेशन रोड कडून मोटरसायकल क्रमांक एम एच १५ जी क्यू ५९०४ वर अदनान सादिक खाटीक (वय १९) रा.मिलन चिकन, लक्ष्मी टॉकीज मागे गांधलीपुरा हा पांढऱ्या गोणीत झाकून तलवार आणताना आढळून आला. त्याला विचारपूस केली असता अदनान याने वडील सादिक सुपडू खाटीक (वय…
Author: editor desk
फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहितेचा मध्यरात्रीच्या सुमारास एकाने विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी एका विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात विवाहित आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दिनांक १९ रोजी विवाहिता आपल्या परिवारासह गच्चीवर झोपलेले असताना या ठिकाणी पहाटे चार वाजेच्या सुमारास एक इसम येऊन गच्चीवर झोपलेल्या विवाहितेसोबत चुकीचे कृत्य करीत विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न झाल्या प्रकरणी विवाहितेने फैजपूर पोलीस स्थानकात धाव घेत एक इसमा विरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोहेकॉ.गोकुळ तायडे हे करीत आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा अॅनिमल हा सिनेमा लवकरच येणार आहे. या सिनेमात रश्मिका रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार रश्मिका मंदानाची 80 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये फसवणूक करणारी दुसरी-तिसरी कुणीही व्यक्ती नसून हे तिच्या अगदी जवळची व्यक्ती आहे. ही व्यक्ती तिची मॅनेजर आहे. रश्मिकाला याविषयी कळताच तिने मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून मॅनेजर रश्मिकाचं काम पाहत आहे. ती रश्मिकाच्या मागे लपूनछपून पैशांची चोरी करत होती. हे समजताच रश्मिकाला मोठा धक्का बसला आहे. मात्र तिला हे प्रकरण प्रकाशझोतात आणायचं नसल्याने ती शांत आहे. रश्मिका मंदाना सध्या रणबीर कपूरसोबत तिचा…
एरंडोल : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील परिवारातील काही वादाने पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना सोमवारी १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघड झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरातील शहरातील गांधीपुरा वखारीजवळील भागात १९ जून सोमवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पती व पत्नीमध्ये वाद होत हा वाद इतक्या टोकाला गेला कि पतीने थेट पत्नीला मारहाण करीत असतांना डोक्यात फरशी मारून तिचा खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत २७ वर्षीय विवाहिता हर्षल किरण मराठेचा मृत्यू झाला तर संशयित आरोपी पती किरण महादू मराठे (३५) यास एरंडोल पोलिसांनी…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भोकरनजीक गांजाची दुचाकीद्वारे होणारी तस्करी रोखत यंत्रणेने तब्बल सात लाखांचा गांजा जप्त केल्याने तस्कर हादरले आहेत. रविवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास ही कारवाई आयजींच्या विशेष पथकासह जळगाव तालुका पोलिसांच्या पथकाने केली. या प्रकरणी संशयित मुन्ना सतीलाल पावरा (32, रा.मालापूर, पो.विरवाडे, ता.चोपडा) याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर सापळा रचणयात आला. रविवारी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास भोकर गावाजवळील धरणगाव रस्त्यावर संशयित मुन्ना पावरा हा दुचाकी (एम.एच.19 टी.2130) वरून 65.540 किलोग्रॅम गांजा वाहून नेत असताना यंत्रणेने त्यास पकडले. सहा लाख 60 हजार रुपये किंमतीचा 65 किलो गांजा व 40 हजारांची…
बीड : वृत्तसंस्था राज्यात गेल्या आठवड्यापासून आषाढी वारीला सुरुवात झाली असून अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. वारीमध्ये दुचाकी घुसल्याने चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसल्यानं अपघात झाला. या घटनेत चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. गावकऱ्यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी उपचाराबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच त्यांनी स्वत: जखमी महिला वारकऱ्यांवर उपचार केले. या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. साबळे यांनी…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यापासून अनेक अल्पवयीन मुलीसह महिलांना पळवून नेल्याची घटना पोलिसात नोंद असतांना देखील आज पुन्हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून दोन अल्पवयीन मुले व एक मुलीला पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना यावल शहरातून दि. १८ रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून ६ वर्षीय मुलास काही तरी फूस लावून अनोळखी इसमाने पळवून नेले असून या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार अनोळखी इसमाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे हे करीत आहेत. दुसरी घटना यावल तालुक्यातील एका…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरातील २० वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह रहिवासास आहे. दि.१७ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास तरुणी आपल्या घरासमोर उभी असतांना एकाने त्याठिकाणी येत तरुणीसोबत चुकीचे कृत्य केल्यामुळे तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली या प्रकरणी तरुणीने भुसावळ शहर पोलिसात धाव घेत एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास एपीआय मोरे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील जलतरण तलावात सुट्टीचा दिवस असल्याने मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सलमान शकील बागवान (वय २४) या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जोशीपेेठेतील बागवान वाड्यात सलमान बागवान फळ विक्रीचा व्यवसाय करत होता. रविवारी फळ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने तो दुपाची 4 वाजेच्या सुमारास मित्रांसोबत जलतरण तलावात पोहायला गेला होता. यठिकाणी पोहत असताना त्याला जलतरण तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सलमान बुडत असल्याचे काही मित्रांच्या लक्षात आले. जलतरण तलावातील सुरक्षा…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एकाच गावातील दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात दोन १७ वर्षीय अल्पवयीन मुली शेजारी शेजारी राहतात. गावातील संशयित तुषार अलाउद्दीन तडवी याने या दोन्ही मुलींना काहीतरी फूस लावून अपहरण करून पळवून नेल्याचा आरोप आहे. पीडित मुलींच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या कुठेही मिळून आल्या नाही. अखेर शनिवार, 17 जून रोजी रात्री 10 वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस…

