जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीन कानळदा रोड या ठिकाणी रिक्षा पलटी झाली असून सुदेवाने या रिक्षा कुठलेही प्रवासी नसून केवळ रिक्षाचालक होता त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील सचिन जयस्वाल हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करतात. दि. २५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घरी जेवणासाठी जात असतांना नवीन कानळदा रोड परिसरातील लक्ष्मी नगराच्या पुढे जात असतांना अचानक दोन ते तीन कुत्रे मध्ये आल्याने त्या कुत्र्यांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता. त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. घटनास्थळी ५ ते १० मिनिटे कुणालाही लक्षात आले नाही पण काहीना समजताच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यानी त्यांना…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदेंच्या ४० आमदारांना मोठा दिलासा मिळाल्याची बातमी समोर आली आहे. शिवसेनेत सुरु असलेल्या सत्तासंघर्षात अजून तिढा वाढलेला असून आता हे प्रकरण विधीमंडळाच्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून 14 दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. मात्र, शिवसेनेच्या 40 आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं यासाठीची ठाकरे गटाची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून अनेकदा स्मरण पत्र ही देण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले…
भडगाव : प्रतिनिधी राज्यात पावसाचा सुरु असतांना अनेक ठिकाणी सामाजिक संस्था असो वा राजकीय नेते मंडळी पर्यावरणसाठी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली असून भडगाव तालुक्यातील जुवार्डी या गावात देखील मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. भडगाव तालुक्यातील जुवार्डी या गावातील रहिवासी तसेच चांदसर बु. येथील तलाठी दत्तात्रय पाटील यांनी केले त्यांची मुलगी प्राजक्ता हिच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगांव बस डेपो मध्ये वृक्षारोपण केले आहे. या वेळेस त्यांनी जांभुळ, वड, चिंच, आंबा, बेल निंब अश्या पर्यावरण पूरक झाडांचे ते दरवर्षी वृक्षारोपण करतात. या वृक्षारोपणसाठी चाळीसगाव आगारचे व्यवस्थापक, सह अन्य अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर गेल्या अनेक दिवसापासून अपघाताची मालिका सुरु असतांना राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. बसमध्ये 55 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये २० विद्यार्थी असल्याची माहिती देखील मिळत आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे. ही बस मलकापूरहून बुलढाण्याकडे निघाली होती. एसटी बस क्रमांक ८३७५ या बसचा जॉईंचर निसटला होता. बस मागे जात होती.…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक या गावात एका २३ वर्षीय विवाहिता आपल्या आई-वडिलासोबत वास्तव्यास आहे. दिनांक २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील एक संशयित्ताने विवाहितेच्या आई-वडिलांच्या घराजवळ येऊन विवाहितेला मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्याप्रकरणी विवाहितेच्या आई-वडिलांनी त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने आई-वडिलांना शिवीगाळ करीत मारण्यासाठी अंगावर जाऊन आल्याने व तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिल्याने विवाहितेने पहुर पोलीस स्थानकात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात सहा महिन्यापूर्वीच शनिपेठ पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी वर्णी लागलेल्या शंकर शेळके यांच्या धमाकेदार कामगिरीमुळे त्यांची नियुक्ती अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी नियुक्तीचे आदेश नुकतेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी काढले आहेत. जळगाव जिल्ह्यात पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी अकोला जिह्यात बदली झाली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांचे अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. आज दुपारी ११ वाजेनंतर ते पदभार स्वीकारणार आहेत. पो.नि. शंकर शेळके यांनी आपल्या कारकिर्दीला धरणगाव पोलीस स्थानकापासून सुरुवात केली होती. याठिकाणी त्यांनी पाळधी येथे व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावली होती. या गुन्ह्यातील मास्टरमाईंड पोलीस…
मुंबई: वृत्तसंस्था पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी राज्य सरकारच्या बोगस कारभाराचे पिसे काढत भोंगळ कारभारावर चांगलेच ताशेरे ओढून मध्यान्ह भोजन योजनेत किती भ्रष्टाचार होत आहे हे सभागृहापुढे मांडले. तसेच या सर्वांची चौकशी करून त्याचा अहवाल सभागृहापुढे सरकार ठेवणार का? असे प्रश्न खडसेंनी सभागृहापुढे उपस्थित केला आहे. पावसाळी अधिवेशनात सोमवारी एकनाथ खडसे बोलतांना म्हणाले की, राज्याची १४ कोटी लोकसंख्या असून या जनतेपैकी सव्वा चार कोटी लोक हे मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेत आहे ही शासनाची आकडेवारीवरून आहे. यावरून महाराष्ट्राची दरिद्री किती आहे हे आपल्या कळते, असा खोचक टोला लागवला. तसेच दिल्लीतील नवीन संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा बांधायला ३…
नाशिक : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नुकतेच उत्तर महाराष्ट्राचा दौरा आटोपून मुंबईच्या दिशेने निघाले असतांना नाशिक जवळील एका टोल नाक्यावर त्यांचा ताफा थांबवल्याने संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं वावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत 15 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. यातील 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तोडफोडीमध्ये जवळपास पाच लाखांचं नुकसान झाल्याचा दावा समृद्धी टोल प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला आहे. अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील मणिपूर येथे घडलेल्या घटनेचे आता राज्यात देखील पडसाद उमटू लागले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आता राज्यातील साताऱ्यात फलटणमधील कुरवली खुर्द या गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात मायलेकीला संपूर्ण गावासमोर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघींचे कपडेही फाटले. त्या दोघींना फरफटत नेल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे. मुलांच्या भांडणातून हा प्रकार घडला आहे. कुरवली खुर्द या ठिकाणी काल सायंकाळी ही मारहाणीची घटना घडली. यावेळी दोघींना फरफटत नेण्यात आलं यामध्ये त्या दोघींचेही कपडे फाटले. संबंधित महिला विधवा असून तिची मुलगी 16 वर्षांची आहे. घटनेनंतर मायलेकींची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. यानंतर फलटण पोलिसांनी…
भुसावळ : प्रतिनिधी जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या महिलेला अटक करण्यासाठी नंदुरबार गुन्हे शाखेच्या पथक भुसावळ येथे आले होते. या संशयित महिला आरोपीला अटक करत असताना इराणी महिलांनी हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन महिलांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात चेन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात भुसावळातील एका महिलेचा सहभाग होता. या संशयित महिलेला अटक करण्यासाठी नंदुरबार गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी भुसावळात आले. स्थानिक बाजारपेठ पोलिसांची मदत घेत नंदुरबार पोलिस पथक सायंकाळी पापा नगरात गेले. संशयित महिलेस ताब्यात घेताच या महिले कपडे फाडत आरडा-ओरड केली. जमाव एकत्र आला आणि गुन्हे…

