मुंबई : वृत्तसंस्था श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे विदर्भ दौऱ्यावर असताना दोन शहरांमध्ये केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी व काँग्रेसने राज्यभर आंदोलन केले होते तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती यानंतर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली असल्याने त्यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भ दौऱ्यावर असलेले श्री शिव प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी दोन शहरात केलेल्या वेगवेगळ्या बेताल वक्तव्याबाबत दोन दिवसापासून राष्ट्रवादी व काँग्रेसने राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठे आंदोलन केले आहे त्यानंतर माजी मुख्यमंत्री यांनी विधिमंडळात याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांच्या कराड…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरातील भाजीपाला विक्रेत्या तरुणावर शुल्लक कारणाने धारदार वस्तूने वार करीत जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील लक्ष्मी नगरातील रहिवासी व भाजी पाला विक्री करून आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करणारा ३० वर्षीय तरूण शुभम पुंडलिक महाजन याला दि.२८ जुलै रोजी रात्री ललित उमाकांत दीक्षित व त्याचे साथीदार यांनी त्याच्या घराजवळ बोलाविले. किरकोळ कारणावरून त्यांच्या वाद घातला. यात एकाने मागील बाजूने उजव्या मांडीवर धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केले व पसार झाले. ही…
मुंबई : वृत्तसंस्था आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले असतांना राष्ट्रवादीसह कॉंग्रसने जोरदार हल्लाबोल करीत आंदोलने केली होती. त्यानंतर गुन्हा देखील दाखल झाला होता पण राष्ट्रवादी व कॉंग्रेस त्यांना अटक होण्यासाठी तीव्र होत नाना पटोले यांनी देखील प्रश्न विचारला असता त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘संभाजी भिडे यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा मी निषेध करतो. ते देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वांतत्र्याच्या इतिहासामध्ये एक महानायक म्हणून पाहिलं जात. अशा महानायकाबाबत बोलताना पुर्णपणे अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे.’, असं फडणवीस म्हणालेत. ‘अशा प्रकारचे वक्तव्य भिडे यांनी…
राज्यातील महामार्गावर नियमित होत असलेल्या अपघातांमध्ये आता राज्याच्या पोलिसांच्या देखील चार चाकी जीपला धडक झाल्याची बातमी समोर आली आहे हा अपघात यवतमाळ जिल्ह्यात झाल्याचे समोर आले आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कोसळणी या गावात जवळील घाटात हा भीषण अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला असून महामार्गावर पोलीस एक ट्रक थांबवून त्यांची कागदपत्रे चेक करीत असताना भरधाव आयशर ट्रकने भरधाव वेगात येत पोलिसांच्या चार चाकी जीपला जबरदस्त धडक देत एक कर्मचारीसह त्यांच्याजवळ उभा असलेल्या आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी पोलिसांच्या चार चाकी जीपला चा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन जखमी झाले आहे. या अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गावठी पिस्तुलचा धाक दाखविण्याचे घटना उघडकीस येत असतांना जळगाव शहरात शनिवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पुन्हा गोळीबार झाल्याची चर्चा जोर धरीत होती पण हि चर्चा शहर पोलिसात ८ ते ९ वाजेपर्यत चालली अन थांबली. जळगाव जिल्हा दूध संघामध्ये शनिवारी संध्याकाळी पदाधिकाऱ्याने दूध संघाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर पिस्तूल रोखल्याची चर्चा शनिवारी रात्री सुरू झाली. मात्र या विषयी पोलिसांनी नकार दिला. रात्री उशिरापर्यंत याला दुजोरा मिळू शकला नाही. या विषयी शहर पोलिस ठाण्यातदेखील पोलिस अधिकारी, कर्मचारी हजर झाले. सोबतच माध्यम प्रतिनिधीदेखील तेथे पोहचले. पोलिसांनी या अधिकाऱ्याकडे विचारणा केली, मात्र तसा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगितले.…
धरणगाव : प्रतिनिधी एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी व पीडित मुलीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले. संशयिताला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. ३० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. समाधान दंगल पाटील (२५) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. धरणगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. समाधान पाटील याने दि. ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता पीडित मुलीला फूस लावून दुचाकीने पळवून नेले. त्यानंतर चोपडा येथून लक्झरीने सुरत येथे गेले. तिथे नातेवाइकांकडे १० ते १२ दिवस राहिल्यानंतर समाधान पाटील याने मुलीला लक्झरीने शिर्डी…
भडगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील एका गावात १२ वर्षाच्या मुलाचा मृतदेह तर जवळचा वडिलांचा देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळजनक घटना सकाळी उघडकीस आली आहे. हि घटना भडगाव तालुक्यातील शिवणी या गावात घडली आहे. यात संजय साहेबराव चव्हाण (४८) आणि कौशिक संजय चव्हाण (१२) अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत. पिता-पुत्राच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हे निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तर जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांचा मुलगा कौशिक हा बंगळीवर मृतावस्थेत आढळून आला. हा प्रकार कळताच ग्रामस्थ व नातेवाइकांनी त्यांना भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पिता- पुत्रांना मृत घोषित केले. याबाबत भडगाव पोलिसात…
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. जर तुम्ही व्यापारी असाल तर काळजीपूर्वक व्यवहार करा. तुम्ही भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर आजच तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून पैशांचा सर्व हिशेब घ्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. आज तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल खूप अस्वस्थ असणार आहे. तुमच्या मानसिकतेमुळे आज तुमचा स्वभावही चिडचिडा होईल. आरोग्याची काळजी घ्या. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवू शकते, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुटुंबियांना थोडा वेळ द्या. मोठ्यांचा आदर करा, त्यांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा जाऊ शकतो. आज कुटुंबात किंवा शेजारच्या कोणत्याही वादात…
अमळनेर : प्रातिनिधी अमळनेर शहरातील मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून १८ हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन लंपास भामट्याने गर्दीचा फायदा घेत लांबवली. ही घटना मंगळवार, 25 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात नारायण खोडके व जयश्री खोडके हे दाम्पत्य 25 रोजी मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आले असता मंदिरातील गर्दीचा फायदा घेत चोरट्याने 10 ग्राम वजनाची सोन्याची चैन लांबवली. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येत असलेले शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना आता अमरावतीत केलेले वक्तव्य चांगलेच भोवणार असल्याचे चिन्ह दिसून लागली असून त्यांच्यावर या प्रकरणी राजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपित्याबद्दल निंदाजनक विधाने केल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे गुरुजी यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाकडून याबाबत शुक्रवारी तक्रार नोंदवण्यात आली होती. महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी…

