Author: editor desk

चाळीसगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील पिंपरखेड गावात दि.२७ रोजी मंगळवारी गौण खनिजाचे डंपर अचानक मागे आल्यानंतर त्याखाली वडिलांचा दबून मृत्यू झाला तर सुदैवाने पित्याने मुलाला बाजूला ढकलल्याने मुलगा बचावला. यात दादाभाऊ जयसिंग गायगवाड (वय ५०) असे मयत पिता तर सागर गायकवाड (१९) असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ते धुळे मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून पिंपरखेड धरण परीसरातून मुरूम नेला जात आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या धरण सुमारास पिंपरखेड धरण परीसरातून डंपर (एम.एच.20 ई.जी. 6512) हा उभा असताना या डंपरच्या पाठीमागून दुचाकीने दादाभाऊ गायकवाड हे मासेमारी करून घराकडे जात होते. डंपर चालकाने अचानक डंपर मागे घेतल्याने डंपर मागे असलेल्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारने औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर म्हणून करण्यात आले आहे. या नामांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अंतिम न्यायनिवाडा होईपर्यंत राज्य सरकार बदललेली नावे वापरणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर राज्य सरकारने न्यायालयाला औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर म्हणून वापरणार नसल्याची ग्वाही दिली. राज्य सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते. मात्र या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याची सुनावणी अद्याप पूर्ण झाली नसून निर्णय होईपर्यंत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  प्रत्येकाचे लग्न हे आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असतो. त्यामुळे प्रत्येक जण हा दिवस कसा साजरा होणार याकडे मोठे लक्ष देवून असतो. लग्न झाल्यावर प्रत्येकजण मुलाची वाट पाहत असतो, पण वधूने 24 तासांच्या आत मुलाला जन्म दिला. गेल्या काही काळात मुलीने फसवणुक केलेल्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. मोठ्या थाटामाटात मिरवणूक निघाली. बारात्यांनी जोरदार नाचले. वधूच्या घरी भव्य स्वागत करण्यात आले. लग्नाच्या फेऱ्या, कन्यादान आणि मग निरोप समारंभ आला. आता नववधू पूर्ण विधी करून नवऱ्याच्या घरी पोहोचली होती. घरात विधी सुरू झाले, नववधूच्या स्वागताचे विधी. नातेवाईक, पाहुणे सर्वांनी वधूला भेटवस्तू देण्यास सुरुवात केली.…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातून राहत्या घरासमोरून अनोळखी इसमाने ५० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संजय नगर परिसरातील रहिवासी अनिल चावदास माळी(वय ४३) हे दि. २० रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर दुचाकी एम.एच.१९.डीडी.३७९९ क्रमांकाची लावलेली असतांना रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाने हि दुचाकी चोरून नेल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अनिल माळी यांनी धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोना.प्रमोद पाटील हे करीत आहेत.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात २८ वर्षीय तरुण पिस्तुल घेत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मानराज पार्कजवळ दि. २८ रोजी संशयित आरोपी नितीन शंकर फुलमाळी (वय २८) हा तरुण बेकायदेशीररित्या शस्त्र परवाना नसताना दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी असतांना त्याला पोलीस नाईक अविनाश देवरे यांनी ताब्यात घेतले असता त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची पिस्तुल, १ हजार रुपये किमतीचे २ जिवंत राऊंड मिळून आले. या प्रकरणी रामानंद पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  अनेक जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावत पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं दिसुन आलं आहे. तर काही ठिकाणी झाडे उन्मळुन पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यामुळे दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाला असुन वीज कोसळण्याच्या झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान,…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तरडे येथे प्रती पंढरपूर श्री विठ्ठल रुख्मिणी यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असून दि.२९ रोजी गुरुवारी आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळेस दिंडी सोहळ्याचे स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दिंड्या स्पर्धा सकाळी ९.३० वाजेपासून १०.३० पर्यत होणार असून यात प्रथम बक्षीस ५०१, द्वितीय ३०१, तृतीय २०१, चतुर्थ १०१ असे आहे. यानंतर सर्व भाविकांना फराळाची व्यवस्था केलेली आहे. तरी भाविकांना याचा लाभ घ्यावा. हा कार्यक्रम तरडे येथील श्री विठ्ठल रुखामाई मंदिर, तानसेन महाराज मठ या ठिकाणी होत असून अनमोल सहकार्य तानसेन महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केली आहे.

Read More

बीड : वृत्तसंस्था  राज्याला हादरवून टाकणारी मोठी घटना पुन्हा एकदा घडली आहे. जालन्यात कारचा भीषण अपघातानंतर आग लागून यात महिलेचा मृत्यू झाला. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेवून परत येत असताना हा अपघात झाला. मंठा लोणार रस्त्यावर गाडी उभा असताना पीक अपने मागून धडक दिली. यानंतर कारला आग लागली आणि यात महिला होरपळून ठार झाली. यावेळी पती कारच्या बाहेर असल्याने ते अपघातातून बचावले. कारमध्ये जळून पतीसमोर पत्नीचा‎ मृत्यू झाल्याची घटना २४ जून रोजी ‎ सकाळी ५ ‎घडली होती. पतीने दिलेली माहिती व ‎ ‎ घटना पहिल्यापासूनच संशयास्पद‎ होती. दरम्यान, मृत विवाहितेच्या‎ भावाने दिलेल्या फिर्यादीवरून‎ पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.…

Read More

पंढरपूर : वृत्तसंस्था  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल – रुक्मिणीची विधीवत महापूजा देखील करण्यात आली असून परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक ही पूजा केली. यावेळी गत अनेक वर्षांपासून नियमितपणे वारी करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला. आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली. विठ्ठलाची महापूजेनंतर मुख्यमंत्री आपले कुटुंब व मानाचे वारकरी काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. तिथे त्यांनी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक करून त्यांचीही पूजा केली. भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल हे अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी नेहमीच मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात करण्यात येते या संदर्भात वारंवार कारवाई होऊनही तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही.आज वाहनातून तब्बल १८ लाख रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असल्यामुळे मुक्ताईनगर येथून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी होत असते. अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला असता, बऱ्याचदा या प्रकारे गुटख्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जप्त करण्यात आले आहे. आज सकाळी अशाच प्रकारची कारवाई मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चेक पोस्टजवळ करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातून एम.एच.१९ बी.एम.२३८४ या क्रमांकाच्या महेंद्रा बोलेरो पीकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी आणला…

Read More