जळगाव : प्रतिनिधी शहरातील आसोदा रोडवर असलेल्या एका मंदीराजवळून एकाची मालवाहू चारचाकी वाहन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुना ममुराबाद रोड परिसरातील चौघुले प्लॉट येथील रहिवासी मिलींद शशिकांत दलाल (वय-३६) हा तरूण टेंट हाऊसचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे सामान वाहतूक करण्यासाठी (एमएच ०४ जीएफ ९०१२) क्रमांकाचे चारचाकी वाहन आहे. २७ जुलै रात्री ११ वाजता ते २९ जुलै सकाळी ९ वाजेच्या दरम्यान जळगाव-आसोदा रोडवरील मुंजोबार मंदीराजवळ चारचाकी वाहन पार्कींग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहन चोरून नेल्याचे समोर आले. मिलींद…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जिजाऊ नगर येथील प्रकाश खैरनार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने मिळून एकूण ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविलयाची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ३१ जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सावखेडा शिवारातील जिजाऊ नगरातील रहिवासी प्रकाश खैरनार यांच्या सासूंचे २९ जुलै रोजी रात्री निधन झाले. त्यामुळे खैरनार कुटुंबीय रात्री ११ वाजता मालेगाव येथे गेले. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते. ३० रोजी सकाळी शेजारील महिलेला खैरनार यांच्या घराचे कुलूप तुटलेले…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दिनांक 30 जुलै रोजी च्या सुमारास अनोळखी इसमाने काहीतरी कारणाने कायदेशीर रखवालीतून फुस लावत पळवून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात अनोळखी समाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या खेडी खुर्द फाट्याजवळ जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई करीत एक अर्धा ब्रास वाळूचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून कानळदा रस्त्यावर असलेल्या खेडी खुर्द फाट्याजवळील कमान जवळील रोडवर दिनांक ३१ जुलै रोजी जळगाव तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज राजू पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी या परिसरात पाहणी केली असता त्यांना १ हजार ५०० रुपये किमतीची अर्धा ब्रास गौण खनिज वाळू अवैध ट्रॅक्टरच्या मदतीने सुरू होती त्यांनी सदर ट्रॅक्टर अवैध गौण खनिज वाळू चोरटी असल्याचा उद्देशाने मिळून आल्याने त्यांनी लागलीच कारवाई…
जळगाव शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या बळीराम पेठेतील एका ३४ वर्षीय तरूण दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दिनेश वसंत वाणी या तरुणावर चॉपरने वार करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना २९ जुलै रोजी ओम मंगल कार्यालयाजवळ घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दिनेश वाणी या तरुणाच्या मित्रांमध्ये दारूसाठी पैसे मागण्यावरून वाद हा वाद आला. सोडविण्यासाठी दिनेश वाणी यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर या रागातून एका मित्राने दिनेश वाणीकडे दारू पिण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी करीत शिविगाळ केली. त्यानंतर ठार मारण्याची धमकी देत चॉपरने…
जळगाव : प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील खडके येथील कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच या बालगृहातील बाल लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला ३ ऑगस्ट पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खडके येथील बालगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणी बालगृहाचे काळजीवाहक गणेश पंडीत, अधीक्षिका अरुणा पंडीत आणि संस्थेचे सचिव भिवाजी दिपचंद पाटील यांचे विरुध्द २६ जुलै २०२३ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा महिला व बाल विकास…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन महिन्यापासून राज्यातील सर्वात महत्वाचा मानला जाणारा मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोमवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या पुलावर भीषण दुर्घटना घडली असून रात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अंधार असल्याने नेमके किती जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत हे समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. एका खासगी कंपनीने या कामाचे कंत्राट घेतले आहे. सोमवारी रात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. पुलावरील गर्डर जोडणारे क्रेन साधारण १०० फुटांवरून खाली कोसळले. त्यात १०…
अकोला : वृत्तसंस्था अकोला जिल्ह्यातील महान या गावातील पती-पत्नीचा कुलरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुलरमधील विजेच्या प्रवाहाच्या जोरदार झटक्यामुळे दोघांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. प्रभाकर बापूराव जानोरकार व निर्मलाबाई प्रभाकर जानोरकार असे यामध्ये मृत पावलेल्या दुर्दैवी पती – पत्नीची नावे आहेत. हे दोघेही अकोला जिल्ह्यातील महान गावातील रहिवाशी होते. जानोरकार यांच्या घरातील कुलरमध्ये आलेल्या वीज प्रवाहामुळे दोघांचा दुर्दैवी अंत झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दोघांचेही…
मुंबई : वृत्तसंस्था पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला…
जळगाव : प्रतिनिधी समाजात मोठे होत असताना संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात आई वडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार हे समाजाच्या उपयोगी आणावेत असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केले. ते शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. संजय सावंत पुढे म्हणाले की सध्याचं युग हे स्पर्धेचे युग असून यापुढे स्पर्धेत टिकून राहण्याची खूप मोठी कसरत विद्यार्थ्यांना करावी लागणार असून स्पर्धे सोबत आई वडिलांचे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे असून ते समाजाच्या उपयोगी कसे पडतील याचा विचार सगळ्यांनी…

