चाळीसगाव : प्रतिनिधी शेतात जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना २३ रोजी सायंकाळी खडकी रस्त्यावर घडली. धडक देणारा कारचालक कार सोडून पळून गेला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला कारचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील गजाननवाडी, शास्त्रीनगर येथील गोपाल पुंडलिक कुंभार यांचे खडकी बुक शिवारात शेत आहे. दि. २३ रोजी सायंकाळी चार वाजता गोपाल कुंभार हे पुतण्या राहुल राजू कुंभार (वय २४) याच्यासह एमएच १९ बीए ३६६५ या टचालीने चाळीसगावकडून खडकीकटे शेतात जात असताना रुद्र हनुमान मंदिराजवळ दुचाकीच्या मागून येणाऱ्या एमएच. १२…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भारतीय सैन्य दलात स्पोर्टस् कोट्यातून चालक म्हणून भरती करून देतो, असे आमिष दाखवित एका तरुणाची ६ लाख १० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील अर्जुन सोपान गवळी (वय.२३) हा युवक अनेक दिवसांपासून खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत आहे. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या ओळखीचे संतोष रमेश वराडे (वय ५०, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांनी अर्जुनला सैन्यात लावून द्या असे सांगितले, तसेच यासाठी पैसे भरावे लागतात, तुम्ही पैसे दिले तर अर्जुनला स्पोर्टस् कोट्यातून सैन्यात चालक म्हणून नोकरी मिळू शकते…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अक्सानगर परिसरात कत्तलीसाठी आणलेल्या ४० गुरांना सोडविले तर दुसऱ्या घटनेत चोरीची १५ गुरे वाहनात कोंबून कत्तलीसाठी आणताना तीन वाहने पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत. दोन्ही घटनेत एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी एकूण ५५ गुरांचा कत्तलीचा डाव उधळून लावला असून याप्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण परिसारातील मास्टर कॉलनी, पिरजादे वाडा, अक्सा नगर, मेहरूण या भागात रविवारी २५ जून रोजी सकाळी १० वाजता चोरीची जनावरे कोंबून त्यांची कत्तलीसाठी तीन पीकअप व्हॅन मधून वाहतूक करून मास्टर कॉलनीकडे जात असताना एमआयडीसी पोलीसांनी पकडले. यात १५ गुरांची निर्दयतेने कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ओडिशातील बालासोर तीन गाड्यांची धडक झाल्यानंतर तब्बल 22 दिवसांतील हा दुसरा रेल्वे अपघात पश्चिम बंगालच्या बांकुरा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन मालगाड्यांमध्ये झालेल्या धडकेत १२ डबे रुळावरून घसरले. मात्र यामध्ये जीवित व वित्तहानी फारशी झाली नाही. या धडकेच्या जोरदार आवाजाने ओंडा रेल्वे स्थानकाच्या आसपासचे लोक जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीच मालगाडीच्या लोको पायलटला सुखरूप बाहेर काढले. रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातामुळे ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्याने आद्रा-खड़गपूर सेक्शनमधील रेल्वे वाहतूक सुमारे दोन तास प्रभावित झाली होती. घटनास्थळी पोहोचलेले दक्षिण पूर्व रेल्वेचे विभागीय सुरक्षा अधिकारी दिवाकर माझी यांनी पत्रकारांना सांगितले-…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील औद्योगिक वसाहत पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या म्हसावद पोलिस चौकीच्या हद्दीत दिनांक २४ जुनच्या मध्यरात्री चोरट्यांनी एकाच दिवशी चार गावातुन चार मोटारसायकलींची चोरी करून सर्व परिसरात खळबळ उडवून दिली आहे. या परिसरातील जळके येथील बसस्थानक परिसरातील कृष्णा ज्वेलर्स दिनांक १२ जुनरोजी चोरट्यांनी फोडून तिजोरीसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ताजी असुन या गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध लागलेला नाही तोच चोरट्यांनी एकाच रात्री विटनेर येथील विटनेर वराड रस्त्यावर गोकुळ पुंडलिक धोबी (सुर्यवंशी) यांच्या घरासमोरुन त्यांच्या मालकीची हीरो मोटार कंपनीची HF DELUXE गाडी क्रमांक MH 19 DH 7253 ही चोरी गेली आहे विटनेर पासून २ किलोमीटरच्या अंतरावर जळके येथील…
कोल्हापूर : वृत्तसंस्था येथील अर्जुन उद्योग समूहाचे प्रमुख, तरुण उद्योजक संतोष वसंत शिंदे (वय ४६, रा.गांधीनगर) यांनी पत्नी तेजस्विनी (३६) व गुलगा अर्जुन (१४) याला विष पाजले आणि स्वतः विष पिऊन चाकूने त्यांचा व आपला गळा चिरून घेत बेडरूममध्ये आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. गडहिंग्लजमधीलच माजी नगरसेविकेने शिंदे यांच्याविरुद्ध एप्रिलमध्ये बेळगाव पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना अटक झाली होती. जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न ते करीत होते. परंतु मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळेच त्यांनी हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी होती. प्रतिकूल परिस्थितीत शाखेची पदवी घेतलेल्या संतोष यांनी दहा वर्षांपूर्वी हसूरचंपू येथे अर्जुन रिफायनरी नावाने…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बांभोरी प्र. चा. गावातील आशिष प्रकाश शिरसाळे (२२) या तरुणाचा गिरणा नदीपात्रात निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान घडली. या हत्येमुळे धरणगाव तालुका हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा रात्री जेवणानंतर शौचास बाहेर जातो, असे सांगून घराबाहेर पडला; परंतु खूप वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. गिरणा नदीपात्रात त्याचा क्रूर पद्धतीने खून झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक हृषीकेश रावले, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, सहायक पोलिस निरीक्षक…
जळगाव : प्रतिनिधी येथील शिवशक्ती कॉलनीत दुकान बंद करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीची सोनपोत हिसकावून दोघे दुचाकीस्वार पसार झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली. यासंदर्भात तालुका पोलिसात शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी रोड परिसरातील शिवशक्ती कॉलनीतील रहिवासी रंजना पंढरीनाथ पाटील (वय ५६) या महिलेचे याच परिसरात किराणा दुकान आहे. गुरुवारी रात्री ९ वाजता ते दुकान बंद करण्यासाठी शटर ओढत होत्या. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोनपोत हिसकावली आणि दुचाकीवरून दोघेही पसार झाले. घटनास्थळी डीवायएसपी संदीप गावीत यांनी भेट दिली. दरम्यान, शुक्रवारी रात्री अज्ञात दोघा दुचाकीस्वार…
जळगाव : प्रतिनिधी समतानगरात असलेल्या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जात असतानाच पोलिसांनी त्यांना रोखले आणि एक जण ताब्यात घेतल्याची माहिती देत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्याने मोर्चेकरी माघारी परतले. १९८२ मध्ये स्थापन केलेल्या या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी सहा वाजता समोर आला. त्यानंतर या भागातील शेकडो समाजबांधव एकवटले. ही घटना कळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत, रामानंद पोलिस स्टेशनच्या निरीक्षक शिल्पा पाटील यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी धडकला. पोलिसांनी शांततेचे आवाहन केले. मात्र जमावाने आरोपीला अटक करून त्याच्यातर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यासाठी आग्रह…
जळगाव : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असतांना त्यांच्या पत्नी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील श्री ओंकारेश्वर मंदिरामध्ये जसोदाबेन मोदी शनिवारी सकाळी ९ वाजता पूजा-अर्चा केली. नित्यनियमाप्रमाणे मंदिरातील तुळशी, वडाला जल अर्पण करून त्यानंतर स्वतः जल प्राशन केले. अभिषेक व आरतीनिमित्त त्या तासभर मंदिरात थांबून होत्या. त्यांच्यासोबत बहीण, भाऊ, पोलिस सुरक्षा रक्षक व एक पायलट व्हॅन होती. जसोदाबेन मोदी या कुटुंबातील काही सदस्य व अन्य नागरिकांसह जगन्नाथ पुरी येथे जात आहेत. दररोज सकाळी तुळशी, वडाला जल अर्पण केल्याशिवाय जल किंवा अन्न ग्रहण करीत नाहीत, अशी माहिती देण्यात आली. मंदिर संस्थानच्या वतीने जुगलकिशोर जोशी, आशा जोशी यांनी त्यांचे…

