मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. या प्रकरणी सध्या केवळ प्राथमिक अहवाल समोर आला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण यावर सविस्तर भाष्य करू, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे. अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी विविध सादरीकरणांच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या तपासातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी लहान भावासोबत झालेल्या भांडणावरुन अभिषेक बच्चन बागडे (वय २५, रा. मच्छीबाजार, सुप्रिम कॉलनी) याच्यावर पूनम साळुंखे याने कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीतील नवनाथ चौकात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीतील मच्छी बाजारात राहणारे रिक्षा चालक अभिषेक बागडे यांचा लहान भाऊ सोमेन बागडे यांच्यासोबत भांडण झाले. याच भांडणाच्या कारणावरुन शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संशयित पुनम साळुंखे आणि शिवा जाधव यांनी अभिषेक बागडे यांच्यासह त्यांची आई व बहिणीला शिवीगाळ करीत मारहाण केली. या भांडणात पुनम साळुंखे याने त्याच्या हातातील धारदार कोयता अभिषेकच्या…
जळगाव : प्रतिनिधी तीन महिन्यांपुर्वी मुलाचे निधन झाल्यामुळे नैराश्यात असलेल्या प्रभाकर लक्ष्मणराव देशमुख (वय ६७, रा. खोटेनगर) यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दि. ६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटे नगरात प्रभाकर देशमुख हे पत्नीसह वास्तव्यास होते. तीन महिन्यांपुर्वी त्यांच्या मुलाचे आकस्मीक निधन झाल्याने देशमुख हे नैराश्यात होते. तसेच ते काही दिवसांपासून आजारी देखील होते. त्यामुळे कंटाळलेल्या प्रभाकर देशमुख यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना सकाळच्या सुमारास त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन…
जळगाव : प्रतिनिधी दुकानावरील कामगाराला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली पाण्याची टाकीची सफाई करण्यासाठी पाठविले. साफसफाई करतांना पाय घसरुन पडल्याने विठ्ठल ढोमण चौधरी (वय ४२, रा. पिंप्री, ता. धरणगाव) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नयनतारा गेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या मनोहर व्हिला बंगल्यात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील विठ्ठल चौधरी हे शहरातील एका नामांकीत कापड दुकानात कामाला होते. दि. ६ रोजी दुकान मालकाने त्यांना नयनतारा रेस्ट हाऊस शेजारी असलेला मनोहर व्हिला या बंगल्याची साफसफाई करण्यासाठी पाठविले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाणी टाकीची साफसफाई करत असतांना विठ्ठल चौधरी…
जळगाव : प्रतिनिधी मध्य प्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तूल आणून त्याची विक्री करणाऱ्या सातजणांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतुसे हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे उपस्थित होते. जळगावातील यश रामदास नन्नवरे (२७) हा गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी अनिल वाघ यांना मिळाली. त्यांच्या पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेत एक गावठी कट्टा हस्तगत केला. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने तो कट्टा केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव, ता. भुसावळ) याच्याकडून घेतल्याचे सांगितले…
आजचे राशिभविष्य दि.८ मार्च २०२६ मेष राशी कोणतेही काम करताना मन शांत ठेवा. यामुळे तुमचे काम सोपे होईल. आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल. आज तुम्ही मोठे आर्थिक निर्णय काळजीपूर्वक विचारात घ्यावेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह जगप्रसिद्ध धार्मिक स्थळाला भेट द्याल. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्हाला न्यायालयीन प्रकरणांमध्ये आराम मिळेल. वृषभ राशी आज तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, अन्यथा तुमचे काम अपूर्ण राहू शकते. घरातील कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस यशाचा असेल. स्पर्धा परीक्षेशी संबंधित चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. मिथुन राशी आज तुम्हाला…
मुंबई : वृत्तसंस्था मध्यपूर्वेत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात वाढत असलेल्या लष्करी संघर्षामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संघर्षामुळे निरपराध नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून मानवतेवर मोठे संकट ओढवू शकते, अशी चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. गेल्या आठवडाभरात मध्यपूर्वेत तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तेहरा येथे झालेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला…
नांदेड : वृत्तसंस्था नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तसेच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव आकांशा मुंजाजी गायकवाड (रा. वाजेगाव) असून ती हडको येथील पद्मश्री श्यामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात बीएचएमएस द्वितीय वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयालगत असलेल्या जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असणाऱ्या खासगी वसतिगृहात वास्तव्यास होती. शुक्रवारी दुपारी तिने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. माहितीनुसार, आकांशाच्या वसतिगृहाची 8-10 महिन्यांची फी बाकी होती,…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, राज्य सरकारच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ पीक कर्ज देण्याचा अधिकार असलेल्या कोणत्याही बँकेकडून घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या कर्जमाफीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेचा नायनाट झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी याआधी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. मात्र काही माध्यमांत आणि राजकीय वर्तुळांमध्ये, ही कर्जमाफी कुठल्या बँकेकडून घेतलेल्या कर्जावर लागू होणार नाही याबाबत वेगवेगळे दावे होऊ लागले होते. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, “मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा…
मुंबई : वृत्तसंस्था केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केली असून नव्या दरानुसार १४.२ किलोचा घरगुती सिलिंडर दिल्लीत आता ९१३ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी हा सिलिंडर ८५३ रुपयांना मिळत होता. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही ११५ रुपयांची वाढ करण्यात आली असून तो आता १८८३ रुपयांना मिळणार आहे. वाढीव दर ७ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर दबाव निर्माण झाला आहे. यामुळे देशात गॅस तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करत देशातील…

