Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीच जनहिताचे तब्बल २० निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईकरांना यामध्ये खूशखबर मिळाली आहे. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही. याशिवाय शेतकरी आणि वयोवृद्धांसाठीदेखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेण्यात आले यावर एक नजर टाकूया. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही. (नगरविकास विभाग) राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार. (कौशल्य विकास विभाग) ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार. (सामाजिक न्याय विभाग) राज्यातील सर्व…

Read More

धुळे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पण मसाल्याचा मोठा साथ शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून कोट्यवधींचा गुटखा जप्त करत आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. जवळपास वीस लाखांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दोघाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा गुटखा व पानसुपारी सुपारी शिरपूर पोलिसांनी जप्त केली आहे. यात पहिल्या कारवाईत इंदोरकडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनातून गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. जवळपास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला एक दिलाने साथ दिल्यामुळे आणि कर्तव्यासाठी त्यांनी दिलेली समर्पणाची भावना हेच माझ्या जळगाव पोलीस दलाच्या यशाचे गमक असल्याचे प्रतिपादन मावळते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दि.४ रोजी जळगावात केले. मावळते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना निरोप देण्यात येऊन त्यांची सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित निरोप समारंभात बोलताना एम राजकुमार म्हणाले की जिल्ह्यात एम पी डी एफ सारख्या ५६ कारवाया झाल्यावर दंगली सारख्या प्रसंगांना वेळीस नियंत्रणात आणता आले असे मनोगत एम राजकुमार यांनी व्यक्त करून जळगाव जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले त्यांची सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली…

Read More

वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात प्रेमियुगुलांच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातून आली आहे. पारडी गावातील घटना कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या सुन्न झालंय. कारण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलाने काही दिवसांपूर्वी पलायन केलं होतं. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पारडी येथील रहिवासी हर्षल बाबा वाघाडे (२२) याने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला २२ जानेवारीला फुस लावून पळवून नेलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी एक दिवस सर्वत्र शोध घेतला.…

Read More

यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यात आर्यन जयेश चव्हाण (वय १०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आर्यन हा त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते. शनिवारी (३ फेब्रुवारी) शाळा सुटल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी शेतशिवारात गेला. त्याठिकाणी काही तरुणांनी क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी मोठा सिमेंटचा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कथित हेरगिरी करणाऱ्या रशियाची राजधानी मॉस्कोस्थित भारतीय दूतावासातील एका कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सतेंद्र सिवाल अशी कर्मचाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. संरक्षण, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य ठिकाणांशी संबंधित गोपनीय माहिती पाकला पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांसोबत काम केले जात असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इलेक्ट्रॉनिक व प्रत्यक्ष पाळत ठेवत करण्यात आलेल्या तपासात सतेंद्र सिवाल हा आयएसआय संचालकाच्या नेटवर्कसोबत भारतविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे आढळले. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य ठिकाणाच्या धोरणात्मक कारवाया व अन्य महत्त्वपूर्ण माहिती तो पाकला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील आहुजा नगर परिसरात एक ६४ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी विजय विठ्ठल बेहरे हे कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडलेले यांना रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आहुजनगर परिसरात विजय बेहेरे हे सेवानिवृत्त कर्मचारी वास्तव्यास होते. शनिवारी ते घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले. आज सकाळच्या सुमारास असोदा रेल्वेगेट परिसरात त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, हरीश शिंपी, विलास शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक शहरासह ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली, तरुणी पळवून नेल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच जळगाव शहरातील रामानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला त्याच परिसरातील एका मुलीने फूस लावून पळवून नेले. ही घटना ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पळवून नेणाऱ्या तरुणीविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणीने सोबत घेत किराणा दुकानावर जाऊन येतो, असे सांगून सोबत नेले; परंतु ती घरी न परतल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पळवून नेणाऱ्या त्यावरून तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था भारतीय अन्न महामंडळाचा हाताळणी व वाहतुकीचा ठेका बंद करावा या कारणावरून एकास मारहाण करून मोबाइल फोडल्याच्या आरोपावरून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सहा जणांविरुद्ध नंदुरबार तालुका – पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. – शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, – दुसऱ्या गटातर्फेदेखील फिर्याद दाखल करण्याचे – काम उशिरापर्यंत सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यावसायिक दिनेश संजय चौधरी (३०, रा. धुळे) यांना ठेक्याच्या वादातून भारतीय अन्न महामंडळाच्या चौपाळे शिवारातील गोडाऊनजवळ गाठून सात जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मोबाइलमध्ये शूटिंग केल्याने ते नष्ट करण्यासाठी मोबाइल फोडला. त्यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी (५२), विक्रांत दिलीप मोरे (४४),…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रेमी युगलाने किरकोळ वादातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २० ) या तरूणीवर प्रेम होते. या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाह करणार होते. शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. दरम्यान, काजलच्या…

Read More