Author: editor desk

 धरणगाव : प्रतिनिधी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे प्रचारार्थ मशाल पेटवून गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान गावातील घरोघरी जावून मतदार राजांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत उपस्थित मतदार बंधू भगिनींना मशाल निशाणी समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ युवासेना जिल्हा प्रमुख व मा लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी उपजिल्हा प्रमुख ऍड शरद माळी संघटक राजेंद्र ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख जयदीप पाटील, राष्ट्रवादी तालुका प्रमुख धनराज माळी सर कॉग्रेस चे तालुका प्रमुख व्ही डी पाटील शहर प्रमुख भागवत चौधरी, युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी प्रेरणा एक्स्प्रेसमध्ये एकाच दिवशी दोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यात एका महिलेच्या पर्समधून २ लाख २५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत तर दुसऱ्या घटनेत महागडा मोबाइल फोन चोरीला गेला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अजय आसुदानी, रा. नागपूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते त्यांच्या आईसोबत बडोदा ते नागपूर असा प्रवास करत होते. त्यात त्यांच्या आईजवळ असलेला पर्स चोरीला गेला आहे. त्यात २ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोने आणि हिऱ्याचे नेकलेस होते. सोबत २० हजार रोख आणि मोबाईल देखील होता. या प्रकरणी पोना. कराळे हे तपास करत आहेत तर दुसऱ्या घटनेत ध्रुवी जयकुमार…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात शेतीच्या कामासाठी आलेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईक असलेल्या महिलेने फूस लावून पळवून नेले. त्या महिलेने तिच्या नातेवाईक तरुणासोबत घेत दुचाकीवरून पळवून नेले, तसेच तिला दहा दिवस डांबून ठेवले. यावेळी त्या तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करून ही घटना कोणास सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाळधी पोलिसांनी अनिल शिकाऱ्या ऊर्फ कालूसिंग पावरा (२३, वाकपाडा, ता. शिरपूर) याला अटक केली तर मीनाबाई सुकलाल बारेला ही महिला फरार आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाविरोधात बाललैंगिक अत्याचारविरोधात…

Read More

विजय पाटील : लाईव्ह महाराष्ट्र न्युज रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील हे प्रबळ दावेदार होते तसेच त्यांच्याविषयी सहानुभूती देखील मोठी होती निवडून येण्याची दाट शक्यता होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही बाजारू लोकांमुळे रवींद्र पाटील यांचा घात झाला. फैजपूर व मुक्ताईनगर हे केंद्रबिंदू प्रामुख्याने आहे. रवींद्र पाटील यांना उमेदवारी मिळाली तर आपला बाजार भरणार नाही या माईंड गेम ने फैजपूर येथील अनवरणे व चोपड्यातील बाबाने चाल खेडली. फैजपुर च्या अनवरच्या जोडीला रावेरचा काँग्रेसचा लोकप्रतिनिधी जॉईन झाला. श्रीराम ही मालदार पार्टी असल्यामुळे मलिदास खाण्यासाठी सर्व मुंगळे एकत्र झाले. त्यात मुक्ताईनगरचे मागे राहिली नाही, रवींद्र…

Read More

मेष आज खूप काळजीपूर्वक विचार करून कामात पुढे जा. कोणत्याही बाहेरील व्यक्तीचा सल्ला घेऊ नका, अन्यथा तुम्हाला ते पूर्ण करण्यात अडचणी येतील. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कामाचा वेग कायम राहील. महिला मित्रांसोबत सावधगिरी बाळगा. मोठ्या ध्येयावर टिकून राहणे तुमच्यासाठी चांगले राहील. जर मूल त्याच्या कामात हलगर्जीपणा करत असेल तर त्याला नंतर अभ्यासात अडचणी येऊ शकतात. तुमच्या व्यवसायाशी संबंधित बाबींमध्ये कोणालाही भागीदार बनवू नका, अन्यथा तो तुमची फसवणूक करू शकतो. वृषभ आज वेगवान वाहने वापरताना काळजी घ्या. भावाची तब्येत बिघडू शकते. कुटुंबातील सदस्यांना दिलेली आश्वासने तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकाल. तुमचे मूल तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. प्रेम जीवन जगणारे लोक…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहिली, तर पहिले निष्क्रिय मुख्यमंत्री, राज्याचे नापसंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, असा घणाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या वक्तव्यावर रविवारी माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. बावनकुळे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना पुत्रप्रेम आहे. त्यांना आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यांना हे माहीत आहे की, आता आयुष्यभर आपल्या घरातले कोणीही मंत्री होऊ शकत नाही. त्यांनी चोरून मुख्यमंत्रीपद घेतले आणि शिवसैनिकांना सोडून स्वतःच्या मुलाला मंत्री केले. त्याऐवजी एका शिवसैनिकाला मोठे करता आले असते. पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले असेल, तर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घर खर्चासाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने विवाहितेला शिवीगाळ करीत लोखंडी सळई डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील गुरुनानक नगरात घडली. याप्रकरणी संशयित पतीसह सासूविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, दि. २० एप्रिल रोजी सकाळी विवाहितेचा पती कुणाल हा कामावरून घरी आला असताना विवाहितेने पतीकडे घरखर्चासाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्याास नकार देत घरातील लोखंडी सळईने विवाहितेच्या डोक्यावर वार करीत गंभीर जखमी केले. यामध्ये विवाहिता गंभीर जखमी झाल्या असून, परिसरातील महिलांनी त्यांचे भांडण सोडविले. त्यानंतर विवाहितेला तत्काळ उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आमोदा बु.च्या ग्रामदैवत आदिशक्ती एकविरा मातेचा यात्रोत्सवाला सुरूवात झाली असून सोमवारी (दि. २२) महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी यात्रोत्सवात सहभागी होवून आई एकविरा मातेचे दर्शन घेतले व विजयासाठी साकडे घातले. पहाटे ४ वाजता गावातून काढण्यात आलेल्या मातेच्या पालखी मिरवणुकीत देखील करणदादा पाटील, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी सहभागी होत ठेका धरला. पालखी आदिशक्ती एकविरा मातेच्या मंदिरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी करणदादा पाटील यांच्याहस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका उपसंघटक शरद पाटील, सरपंच विजय सुर्यवंशी, उपसरपंच सुनंदा सुर्यवंशी, माजी सरपंच विकास सुर्यवंशी, बंडू सुर्यवंशी, छगन सुर्यवंशी, मनोहर पाटील (जामोद), मंदिराचे…

Read More

जळगाव  : विजय पाटील देशाचे नेते शरद चंद्र पवार यांचे मानसपुत्र म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील यांना लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असताना त्यांची उमेदवारी कट करण्यासाठी फार मोठे राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी हे षड्यंत्र उघडकीस आणलं परंतु त्यांचे बंड हे म्यान झाले आहे. परंतु निष्ठावंत रवींद्र भैयांना बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काही संबंध नसलेले श्रीरामाला ही उमेदवारी दिली गेली यामुळे बोदवड मुक्ताईनगर तालुक्यात असंतोष पसरला आहे. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी रवींद्र भैय्यांसाठी सुरुवातीला मेहनत घेतली त्यानंतर काही बाजारू लोकांना श्रीराम गवसला आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था समाजमाध्यमात (सोशल मीडिया) झालेल्या ओळखीतून विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी कुणाल नंदकुमार गलांडे (वय २७, रा. नाना पेठ), त्याचे मित्र आतिष, समीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, याबाबत एका २६ वर्षीय विवाहित तरुणीने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी कुणाल याच्याशी तरुणीची जुलै २०२२ मध्ये समाजमाध्यमातून ओळख झाली होती. पीडित विवाहितेला मुलगा आहे. कुणालने तिच्याशी संपर्क वाढविला. तिला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर कुणाल आणि त्याचा मित्र आतिषने तरुणीला नाशिक परिसरात फिरायला नेले. तेथे धमकावून कुणाल आणि त्याचा मित्र आतिषने…

Read More