जळगाव : प्रतिनिधी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या उस्मान शहा इब्राहीम शहा (वय ५५, रा. न्यू ख्वॉजानगर पिंप्राळा हुडको) यांच्यासह त्यांना मुलगा व मुलीला तिघांनी लोखंडी पाईने मारहाण करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ मार्च रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील न्यू ख्वॉजानगरात उस्मान शहा इब्राहीम शहा हे वास्तव्यास आहे. दि. २९ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीचे संशयित आरिफ नादर शेख याच्याच्या मुलासोबत भांडण सुरु होते. उस्मान शहा व त्यांचा मुलगा हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता तिघांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण मारहाण करण्यास सुरुवात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली. या दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करीत लोखंडी पाईने गंभीर जखमी केले. ही घटना दि. २९ मार्च रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. दोन्ही कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील न्यू ख्वॉजानगरात उस्मान शहा इब्राहीम शहा हे वास्तव्यास आहे. दि. २९ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलीचे संशयित आरिफ नादर शेख याच्याच्या मुलासोबत भांडण सुरु होते. उस्मान शहा व त्यांचा मुलगा हे त्यांना समजविण्यासाठी गेले असता तिघांनी शिवीगाळ करीत त्यांना मारहाण मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत…
आजचे राशिभविष्य दि.१ एप्रिल २०२६ मेष राशी आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुम्ही तुमचे भविष्य सुधारण्यासाठी नवीन पावले उचलाल. तुमची आर्थिक परिस्थिती अनुकूल राहील. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल. तुम्हाला काहीतरी मोठे करण्याची कल्पना सुचेल. तुम्हाला विश्वासू लोकांकडून वेळेवर सल्ला आणि मदत मिळेल. वृषभ राशी आज तुम्हाला तुमच्या नोकरीबाबत चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या लेखकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. मनासारखं घडेल, सृजनशील क्षेत्रातील लोकांना लिहिण्यासाठी नवीन कथा मिळू शकतात. आज तुमच्या करिअरला एक नवीन दिशा मिळेल. तुम्हाला सहकाऱ्यांकडून मदत मिळू शकते. तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने तुम्ही यश मिळवू शकता. आज गणपतीला…
पुणे | वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून पुणे, नाशिक, धुळे, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून बळीराजावर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. हातातोंडाशी आलेली पिके या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केली असून, फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारांच्या तडाख्यामुळे शेतजमिनी पांढऱ्या पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यावरील हे संकट अद्याप टळलेले नसून पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह…
मुंबई | वृत्तसंस्था राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पक्ष ताब्यात घेण्याचे काही नेते प्रयत्न करत असल्याचा आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी जोरदार पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत. सूरज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दावा केला की, रोहित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी आणि पक्षातील नेत्यांची बदनामी करण्यासाठी एका एजन्सीला तब्बल ५ कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याची माहिती त्यांना मिळाली आहे. या माध्यमातून पक्षात गोंधळ निर्माण करण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. चव्हाण पुढे म्हणाले की,…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तीने स्वतःच्या सख्ख्या भावाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली असून, ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने बनावट व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, संबंधित भावाने विविध वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्स एकत्र करून एडिटिंगच्या माध्यमातून एक दिशाभूल करणारा व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमुळे तक्रारदाराची गोपनीयता भंग झाली असून, समाजात बदनामी करण्याचा हेतू होता, असेही तिने स्पष्ट केले आहे. या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेले हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. या संदर्भात मुंबईतील कफ परेड…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गॅस सिलिंडरसाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वडेट्टीवार म्हणाले की, इंधनाच्या तुटवड्यामुळे हायवेवरील अनेक हॉटेल्स बंद पडली असून शहरांमध्येही व्यवसाय ठप्प झाला आहे. काँग्रेस कार्यालयाबाहेरील हॉटेल्सही ओस पडल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या गंभीर परिस्थितीतही सत्ताधारी केवळ “बनवाबनवी” करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी त्यांनी भाजपवर उपरोधिक टीका करत म्हटले की, “सध्याची इंधन टंचाईही कदाचित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांच्यामुळेच झाली असेल,”…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील मघडा गावातील शीतला माता मंदिरात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. गर्दीत दबल्यामुळे ८ महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एका पुरुषाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मंदिरात मंगळवारी शीतला अष्टमीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी होती. स्थानिकांच्या मते, गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नव्हती. दर्शनाच्या घाईत लोक एकमेकांना ढकलत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. दुर्घटनेत मृत पावलेल्या ६ लोकांची ओळख पटली आहे. यात रीता देवी (५०), कांती देवी (५०), आशा देवी (६५), देवंती देवी (३५), अनुष्का देवी (४०) आणि रेखा देवी (४५) यांचा समावेश आहे.…
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी (e-KYC) करण्याची अंतिम मुदत आज, ३१ मार्च रोजी संपत असून पात्र लाभार्थी महिलांसाठी ही शेवटची संधी ठरणार आहे. या मुदतीत ई-केवायसीतील त्रुटी दुरुस्त न केल्यास संबंधित महिलांचा या योजनेतील लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याने राज्यभरातील महिला वर्गात मोठी धावपळ सुरू आहे. महायुती सरकारने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचा राजकीयदृष्ट्याही मोठा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला होता. दरम्यान, योजना सुरू झाल्यानंतर बोगस लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात…
चोपडा : प्रतिनिधी सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी पायी गडावर जात असताना तालुक्यातील चौगाव येथील परेश धर्मा पवार (वय १७) याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातील भेंडी गावात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे चौगाव परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,तालुक्यातील चौगाव येथील २५ ते ३० भाविक २६ तारखेपासून पायी पदयात्रेतून वणी सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी निघाले होते. यात परेश धर्मा पवार हाहि पायी पदयात्रेत सहभागी होता. गडावर जात असतांना २९ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कळवण तालुक्यातील भेंडी येथे परेश पवार हा भंडाऱ्यात गेला होता. त्या ठिकाणी मंडपाच्या लोखंडी पाईपला त्याचा अचानक स्पर्श झाल्याने त्यास विजेचा जबर धक्का बसला, यात त्याचा…

