जळगाव : प्रतिनिधी
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु झाली असतांना जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गावातील तरुण शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करू लागले आहे. नुकतेच जळगाव ग्रामीण मतदार संघातील कंडारी येथील शेकडो तरुण शिवसेनेत दाखल झाले आहे.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख दिपक भदाने, युवा सेना विभाग प्रमुख किशोर पाटील, किरण एकनाथ भिल, मनोज गुलाब भिल, गणेश एकनाथ भिल, मनोहर भिल, मोहन वामन भिल, सुनील गुलाबी भिल, साकिब संजू पटेल, राहुल भराडी, सावन भिल, गोकुळ भिल, अमोल मोरे, समाधान मोरे, मंगल मोरे, विनोद मोरे, किशोर भिल, अर्जुन भिल, सावन मोरे, भिकन भिल रोहित भिल सुनील भिल अजित पटेल सागर मोरे, समाधान भिल, सोमनाथ भिल, राहुल मोरे, रितिक भिल यांच्यासह अनेक तरुण यावेळी उपस्थिती होते.