Author: editor desk

बोदवड : प्रतिनिधी एकाच दिवसात दोन आत्महत्येच्या घटना तालुक्यात घडल्या. पहिल्या घटनेत मनूर खुर्द येथील विवाहित महिलेने विष प्राशन करून तर दुसऱ्या घटनेत चिखली बुद्रुक येथील तरुणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. वर बुडून ट त त तालुक्यातील मनूर खुर्द येथील विवाहिता कल्पना योगेश हडपे हिने २५ रोजी राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन केले. मिळालेल्या माहितीनुसार, शेतातून पती घरी आल्यानंतर तिच्या तोंडाला फेस आलेला त्याने पाहिला व लगेचच भुसावळ येथे उपचारासाठी हलविले. २६ रोजी या महिलेचा मृत्यू झाला. पश्चात पती योगेश तसेच सोहम व दुर्गेश अशी दोन लहान मुले आहेत. दुसऱ्या घटनेत चिखली बुद्रुक येथील योगेश मधुकर पाटील (३५) या…

Read More

मेष राशी अचानक लांबचा प्रवास किंवा परदेश दौरा होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाद वाढू शकतात. धार्मिक कार्यात भक्ती कमी होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागेल. नोकरदार लोकांच्या अडचणी वाढू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा संघर्ष असेल. अभ्यासात रस कमी वाटेल. मुलांकडून सामान्य चिंतेची शक्यता राहील. व्यवसायात वडिलांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला वाईट वाटेल. वृषभ राशी जवळच्या मित्राची भेट होईल. बौद्धिक क्षमता वाढेल. देव ब्राह्मणांवर श्रद्धा वाढेल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील. घरगुती जीवनात अवास्तव मतभेद निर्माण होऊ शकतात. कोणत्याही महत्त्वाच्या कामात उशीर झाल्यामुळे दुःख होईल. राजकारणात महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात नवीन भागीदार लाभदायक ठरतील. तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत असतांना नुकतेच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा सोमवारी दुपारी कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत डिसेंबर महिन्यात या पुतळ्याचे लोकार्पण केले होते. त्यानंतर अवघ्या 8 महिन्यांतच हा पुतळा पडल्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा एकूण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले की, शाळांमध्ये सीसीटीव्हींप्रमाणेच सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणदेखील बसवले जाऊ जाऊ शकते. हे पॅनिक बटण दाबल्यानंतर पोलिसांनी लगेच गैरप्रकाराची माहिती कळेल. “…शाळांमध्ये जसे सीसीटीव्ही आहेत; तसे महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणची व्यवस्था केली जाऊ शकते… हे पॅनिक बटण वसतिगृहातही बसवता येऊ शकते. हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे.” असे केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. “मुंबई विभागीय उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने बदलापूर घटनेचा तपास केला. विविध विभागातील लोकांचा या तपास कामात सहभाग राहिला. कोणत्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायचे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या आठवड्यात बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकलींचे लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील अक्षय शिंदे नामक स्वच्छता कर्मचाऱ्याला अटक केली होती. त्याला कोर्टाने 24 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला सोमवारी पुन्हा कल्याण येथील न्यायमूर्ती व्ही ए पत्रावळे यांच्या न्यायदालनात उभे करण्यात आले. तिथे पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली. पण कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळत आरोपीला 14 दिवसांची म्हणजे 9 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राज्यातील बदलापूर शहरात २ अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला कोर्टाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जून्या भांडणाच्या कारणावरुन दुचाकीने जात असलेल्या फैजान राजू पटेल (वय २४, रा. राजमालती नगर) या तरुणला दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील मोबाईल जमीनीवर आपटून नुकसान केले, आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना दि. २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सुरत रेल्वे गेटजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अदलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामालती नगरात फैजान राजू पटेल (वय २४) हा तरुण वास्तव्यास आहे. त्याच परिसरातील सिद्धार्थ माणिक वानखेडे व त्याच्यासोबत असलेल्या एका जणासोबत यापुर्वी त्यांच्यात वाद होवून एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. याच भांडणाच्या कारणावरुन दि. २४ रोजी रात्रीच्या सुमारास फैजान…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गणवेशात असलेले पोलिस दुपारपासून हॉटेलमध्ये दारु रिचवत असतांना त्यांच्यात वाद झाला. बाहेर येताच दारुच्या नशेत तर्रर्रर्र असलेल्या कर्मचारी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर कार पार्कीगमधून बाहेर काढत असतांना तेथील दुचाकींना धक्का दिला, त्यानंतर भरधाव वेगाने जात असतांना काही अंतरावर एका सायकलस्वार मुलाला धडक देत पसार झाले. सुदैवाने सायकलस्वार मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही, ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास भास्कर मार्केटसमोरील एका हॉटेलसमोर घडली. चक्क गणवेशावर असलेल्या पोलिसांमध्येच हाणामारी सुरु असल्याने रस्त्याने जाणाऱ्यांची रस्त्यावर थांबून होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी गणवेशावर जॅकेट घालून त्याठिकाणी आले.…

Read More

भडगाव  : प्रतिनिधी गिरड येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते त्या शिबिरात गिरड येथील 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले व त्या रक्तदान कार्यक्रमासाठी जळगाव येथील न्याट टेस्टिंग यंत्रणा असलेले एकमेव रक्तकेंद्र इंडीयन रेडक्रॉस सोसायटी ची टीम आदरणीय डॉ श्री शंकरलाल सोनवणे, सुनीता वाघ मॅडम (Lab Technician), ज्योत्स्ना बोरसे मॅडम (PRO), कामरान शेख (Assistant), अन्वर खान (ड्राइवर) हे जळगाव येथून आपल्या गावातील रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते. तसेच आयोजक श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र व गिरड विकास मंच यांच्या संयुक्त विद्यामानाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाला भडगाव येथील मा.संचालिका नगरपालिका भडगाव, विद्यमान संचालिका शेतकरी खरीदी विक्री संघ भडगाव सौ…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिवाजी नारायण पाटील (६०) यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास धुळे-पारोळा महामार्गावर फागणे गावानजीक अन्वर नाला पुलावर ही घटना घडली. शिवाजी पाटील हे धुळे येथे मुलीकडे गेले होते. रविवारी सकाळी सावदे येथे गावी जाण्यासाठी निघाले. वाटेत पाऊस सुरु झाला म्हणून त्यांनी पत्नी छायाबाई यांना पारोळा बसमध्ये बसवले व ते आपल्या दुचाकीने निघाले असताना हा अपघात घडला. शिवाजी पाटील यांच्या पत्नी छायाबाई गावाच्या पोलिस पाटील आहेत. घटनेनंतर त्यांना पारोळा येथे घेण्यास गेले. पती शिवाजी पाटील यांनी काळजीपोटी पत्नीला बसमध्ये बसवले. म्हणून त्या बचावल्या. ०१५-१६ वर्षापूर्वी फागणेनजीक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अविनाश सुरेश देवरे (२७, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (२४ ऑगस्ट) रात्री ११ वाजता भादली रेल्वे स्थानकाजवळ उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश देवरे हा तरुण औद्योगिक वसाहत परिसरातील एका कंपनीत कामाला होता. शनिवारी भादली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व मृतदेहाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविला. अविनाश हा घरातील कर्ता व्यक्ती होता, मयताच्या पश्चात आईवडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे

Read More