Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जळके येथील प्रगतिशील शेतकरी कै.महारु (नाना)लक्ष्मण पाटील यांचे आज दिनांक २८ ऑगस्ट बुधवारी दुपारी ११:३०वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखत निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं,सुना,मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९ वाजता राहत्या घरुन जळके येथुन निघणार आहे.ते प्रमोद महारु पाटील व गोपाल महारु पाटील यांचे वडील होते.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या मालिका सुरु असतांना आज दि.२८ ऑगस्ट रोजी शहरातून पाळधीकडे जाणाऱ्या महामार्गानजीकच्या मानराज पार्क ते गुजराल पेट्रोलपंपादरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीवरील दोन महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात एक वर्षांचा मुलगा जखमी झाला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटेनगर परिसरातून मानराज पार्ककडे येणाऱ्या उड्डाणपुलाच्या उतरतीवरून दोन्ही महिला ह्या एक वर्षाच्या मुलाला सोबत घेवून दुचाकी क्रमांक (एमएच १८ एएस ५३७९ )ने जात असतांना त्यावेळी दुचाकीच्या मागे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी भागातील जी-सेक्टरमध्ये सागर हॉटेल व लॉजिंग येथे सुरू असलेला कुंटणखान्यावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता केली असून या प्रकरणी रात्री अकरा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये असलेले सागर हॉटेल व लॉज येथे बेकायदेशीर पध्दतीने कुंटणखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता छापा टाकला. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते व भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचा ठाकरे गट व भाजप नेते नारायण राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्यात धक्काबुक्की झाली. नारायण राणे यांनी मविआच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारण्याची उघड धमकी दिली. यामुळे येथीली स्थिती चांगलीच चिघळली होती. भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र नीलेश राणेही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपूर्वी आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्या अडचणीत सापडल्या होत्या. वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांची बीडवरून छत्रपती संभाजीनगरला बदली झाली होती. दरम्यान, त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्या प्रकरणी नवटके यांच्याविरोधात पुणे बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएस भाग्यश्री नवटके पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळे आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी नवटके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बीएचआर या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी आता मालवण मधील समुद्र किणारी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चांगलीच आक्रमक झाली असून आम्ही सरकार विरोधात रविवार आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील हुतात्मा स्मारकापासून तर गेट वे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही जाणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येत आहे. दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचार वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढत आहे. मालवण मध्ये जे घडले तसे आज पर्यंत महाराष्ट्रात कधीही घडले नव्हते. शिवछत्रपतींचा पुतळा समुद्रामध्ये कोसळला आहे. त्यामुळे…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या असतांना नुकतेच आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील त्याच बदलापूर मध्ये पोलिसांनी मंगळवारी एका 55 वर्षीय व्यक्तीला आपल्या 16 वर्षीय मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुलीची आई जेव्हा कामादरम्यान रात्रीच्या शिफ्टला जात होती, तेव्हा आरोपी मुलीला टार्गेट करत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर मधीलच एका पित्याने आपल्याच मुलीवर अत्याचार केल्याच्या या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने अल्पवयीन मुलीला याबाबत कोणाला सांगू नकोस, अशी धमकी देऊन मुलीला मारहाण देखील…

Read More

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरात दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असतांना कोसळणार्‍या पावसाच्या सरी, गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी डीजेवरील ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी’, ‘तुझी घागर उताणी रे गोपाळा’ या गाण्यांवर तरुणाईचा जल्लोष, अशा उत्साही वातावरणात मंगळवारी दहीहंडीचा सोहळा मुंबईसह राज्याभरात साजरा झाला. दरम्यान, मुंबईत दहीहंडी कार्यक्रमाला गालबोट लागले. थर लावताना २०६ गोविंदा जखमी झाले; तर वर्ध्यात दोन कार्यकर्त्यांचा शॉक लागून मृत्यू झाला. सुरज बावणे (वय 27) आणि सेजल बावणे (13) अशी मृतांची नावे आहेत. कल्याणमध्ये स्वागत कमानीचा भाग कोसळला. मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यात जय जवान पथकाने विश्वविक्रमाला गवसणी घालण्याचा चंग बांधून ताकदीने थर रचायला घेतले. थरावर थर सुरू…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड येथील शेतात गेलेल्या येथील बालू बाबूराव भिल (६०) या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. बालू भिल हे सकाळी साडेआठ वाजता असता गेले होते. यानंतर त्यांची पत्नी सुनंदाबाई या डबा घेऊन शेतात शेतात पोहोचल्या असता बालू भिल हे विहिरीजवळ पडलेले आढळले. हे दृश्य पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. हा आवाज ऐकून जवळच असलेले विकास पाटील हे घटनास्थळी धावत आले. गावातून कपील पाटील यांचे वाहन बोलावून बालू यांना धरणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. बालू हे पाणी भरण्यासाठी शेतात गेले होते. तेथे बिघाड झाल्याने त्यांनी मोटारीची वायर तोंडामध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील भास्कर मार्केट परिसरात असलेल्या हॉटेल शालिमार या परमिट रूम व बारमध्ये मद्यपान करत असलेल्यांमध्ये वाद होऊन एका जणाने गोळीबार केला. सुदैवाने यात कोणाला दुखापत झालेली नाही. मंगळवारी रात्री घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल शालिमार येथे दारु पित असताना अचानक टोळक्यातील एकाने जमिनीवर गोळीबार केला. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील कर्मचारी घाबरले. टोळक्याने तेथून पळ काढला. कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती हॉटेल मालकाला दिली व त्यांनी जिल्हापेठ पोलीसांना कळविले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस तपासणीत हॉटेलमधून गोळीबार…

Read More