Author: editor desk

यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यात अपघातांची मालिका सुरू असतानाच गुरुवारी दिग्रस तालुक्यातील साखरा गावाजवळ भीषण अपघात घडला. संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) यांच्या वाहनाला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने खासदार देशमुख या अपघातातून थोडक्यात बचावले असून त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार देशमुख हे एका कार्यक्रमातून परतत असताना साखरा गावाजवळ हा अपघात झाला. ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिल्याने वाहनाचे पुढील बाजूस मोठे नुकसान झाले. अपघाताची बातमी समजताच परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील मोरेश्वर नगर येथे गुरुवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास ३५ वर्षीय गृहिणी दर्शना उर्फ भारती दिपक तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस अहवालानुसार, मयत हे आर.पी.एफ. कर्मचाऱ्याचे पती असून, घरातील बेडरूममध्ये सिलिंग फॅनला साडीचा सहाय्य वापरून त्यांनी गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. शेजारी रहिवासी यांनी ही माहिती पोलिसांना दिली, त्यावरून भुसावळ शहर पोलीस नोंदवण्यात आली. पोलीस निरीक्षक उध्दव डमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील पोलीस तपास सुरु आहे. या घटनेमुळे मोरेश्वर नगर परिसरात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील भागात राहणाऱ्या महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता पिडीत महिला घरात झोपलेली असतांना, संशयित आशिष पांडूरंग जोहरे (रा. पिंप्राळा) याने महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. तसेच तीला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समोर समोर आल्यानंतर पिडीत महिलेने…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी कुर्ला टर्मिनस ते गोरखपूर दरम्यान धावणाऱ्या काशी एक्सप्रेसमधून प्रवास करताना एक महिला चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील मूळ रहिवासी व हल्ली वसई पूर्व येथे राहणारे अजय कुमार (वय ३९) हे आपल्या कुटुंबीयांसह २१ फेब्रुवारीला सकाळी कुर्ला टर्मिनस येथून गोरखपूरकडे काशी एक्स्प्रेसने प्रवास करत होते. ही गाडी दुपारी १२.४४ वाजेच्या सुमारास चाळीसगाव रेल्वे स्थानकावर थांबली. तर गाडी सुटल्यानंतर काही वेळात अजय कुमार यांच्या पत्नी किरण रावत (वय ३८) या दिसल्या नाहीत. तर, चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान गाडीत  शोध घेतला असता त्या आढळल्या नाहीत. त्यामुळे त्या चाळीसगाव स्थानक परिसरातून हरवल्याची…

Read More

बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत बुऱ्हाणपूर येथे प्रेमविवाह केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार,  एका गावातील अल्पवयीन मुलीचे गावातीलच दीपक संजय कोळी याच्याशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही घरातून पळून जाऊन मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे एका संस्थेत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर संबंधित तरुण व मुलगी पोलिसांसमोर हजर झाले व त्यांनी विवाह केल्याचा दावा करत त्याबाबतचे कागदपत्रे सादर केली. या प्रकरणात मुलगी १८ वर्षाखालील असल्याचे…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२७ फेब्रुवारी २०२६ मेष राशी तुमच्या पसंतीच्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते. आज तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. आज नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतात. घरात सकारात्मक वातावरण राहील. जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुमच्या मित्रांशी त्याबद्दल बोला. तुमच्या जोडीदारासोबत रात्रीच्या जेवणाचे नियोजन केल्याने तुमच्या नात्यात गोडवा वाढेल. वृषभ राशी आज तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या कामाची समाजात ओळख होईल. तुमच्या कामावरील आत्मविश्वासामुळे यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत संध्याकाळ घालवाल आणि वातावरण आनंदाने भरलेले असेल. आज, तुमचा कल प्रार्थना आणि प्रार्थनांकडे असेल आणि तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट…

Read More

सातारा  : वृत्तसंस्था  सातारा-मेढा रस्त्यावरील करंजे नाका येथे बुधवारी सायंकाळी एका तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. अक्षय रामदास गाडे (रा. सातारा) याच्यावर अज्ञात कारणावरून वार करण्यात आले असून या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास करंजे नाका परिसरात अक्षय गाडे उभे असताना संशयित हल्लेखोराने अचानक कोयत्याने वार केले. या हल्ल्यात गाडे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. काही संतप्त नागरिकांनी हल्लेखोराला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिका येथील सत्तेच्या चाब्या मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’ आणि ‘महिला व बालकल्याण समिती’च्या सभापतीपदासाठी गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक आता केवळ औपचारिकता उरली असून उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झाले आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षतर्फे डॉ. चंद्रशेखर शिवाजी पाटील यांनी एकमेव अर्ज दाखल केला. तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी शिवसेनाच्या ज्येष्ठ नगरसेविका सिंधुताई विजय कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. दोन्ही उमेदवारांनी विहित वेळेत नगरसचिव सतीश शुक्ला यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले. अर्ज दाखल करताना महापालिका परिसरात कार्यकर्त्यांची…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास, अर्थव्यवस्था, गुंतवणूक आणि रोजगार या मुद्द्यांवर सरकारची भूमिका ठामपणे मांडली. “टिपू सुलतान चांगला होता की नाही हा नंतरचा प्रश्न आहे; मात्र त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे आणि त्याला शिवरायांपेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न करणे आम्ही कदापि सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. देशाच्या इतिहासाचे दशकानुदशके चुकीचे सादरीकरण झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी टिपू सुलतान यांचा उल्लेख केला. “टिपू सुलतान महान राजा होता, असे शिकवले गेले; पण त्याने ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची केलेली क्रूर कत्तल याविषयी कधी शिकवले गेले…

Read More

बारामती  :  वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या सोबत त्यांचे वडील राजेंद्र पवार तसेच युगेंद्र पवारही उपस्थित होते. या वेळी पोलिस ठाण्याबाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. “एकच वादा अजितदादा”, “अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे”, “परत या परत या अजितदादा परत या” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. समर्थकांनी अजित पवारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा लढा केवळ पवार कुटुंबाचा…

Read More