मेष राशी शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. नोकरीत पदोन्नतीसह संपूर्ण जबाबदारी तुम्हाला मिळेल. नवीन जोडीदाराकडून विशेष सहकार्य मिळेल. यामुळे नात्यांमध्ये जवळीकता येईल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. सहकुटुंब सहलीचा आणि देशाबाहेर फिरण्याचा आनंद घ्याल. वृषभ राशी शत्रू पक्षावर विजय मिळेल. व्यवसायात प्रगतीसह नोकरीचा विस्तार होईल. नोकरीत पदोन्नतीसह इच्छित पद मिळेल. कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून काही शुभ कार्यक्रमाचे आमंत्रण मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. मिथुन राशी मुलांच्या आनंदात वाढ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील. जवळच्या मित्राची भेट होईल. कामाच्या ठिकाणी एखादा विरोधक तुमच्या वरिष्ठांना चिडवू शकतो. कठोर परिश्रमानंतरच…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर ते मुंबईपर्यंत सोमवारी तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली. रामगिरी महाराज यांनी मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करूनही काहीही कायदेशीर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या आवाहनानुसार ही तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली होती. मात्र पोलिसांनी परवानगी न दिल्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही रॅल माघारी फिरली. नाशिकसह मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार भागातील तब्बल ५०० हून अधिक वाहने या रॅलीत सहभागी झाली होती. छत्रपती संभाजीनगरात रॅली निघत असताना सुमारे ६०० वाहनांची नोंद होती. एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना काल रात्री ठाणे शहरातील आनंद नगर जकात ब्लॉकजवळ घडली. एमआयएमचे नेते आणि…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील तिरुपती बालाजीच्या प्रसादानंतर आता राज्यातील सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले दिसणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता गंभीर आरोप होत आहेत. लाडूच्या प्रसादाच्या टोपलीतच उंदरांने पिल्ले दिले असल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या पाकिटांवर ही उंदराची पिल्ले दिसत आहेत. करोडो हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी येथील प्रसादाच्या लाडूमध्ये वापर करण्यात आलेल्या तुपामध्ये चरबी असल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील प्रसादाच्या लाडू मध्ये देखील उंदीर असल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे या…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील वडाळी दिगर येथील जि.प. प्राथमिक शाळा येथील उपक्रमशील शिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांना ध्येय उद्योग समूह,अहमदनगर यांच्या तर्फे दिला जाणारा “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” नुकताच माऊली सभागृह,सावेडी अहमदनगर येथे झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. दैनिक युवा ध्येय च्या 13 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला.या वेळी ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार,अहमदनगर आकाशवाणी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र दासरी,ध्येय उद्योग समुहाचे अध्यक्ष लहानु सदगीर व इतर मान्यवर,विविध पदाधिकारी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संदिप पाटील यांनी आतापर्यंत ढेकु खुर्द ता.अमळनेर,बिलवाडी ता.जळगाव या गावांमध्ये सेवा केली असून विद्यार्थ्यांसाठी शाळा आपल्या दारी,दप्तरमुक्त शनिवार,पढाई पे चर्चा,स्वच्छता सन्मान असे एक ना अनेक विविध…
जळगाव : प्रतिनिधी श्री गोविंदप्रभु हे महाराष्ट्रातील परिवर्तनाचे मुख्य आधारस्तंभ ठरतात. गोविंद प्रभू हे महाराष्ट्रातील सर्वात जुन्या प्रबोधनकारांपैकी एक ठरतात. संत समाजसुधारकांच्या विचारांमुळे आपल्या वैचारिक पातळीचा विवेकी विकास होतो, असे प्रतिपादन आ. राजूमामा भोळे यांनी केले. श्री. गोविंद प्रभू अवतारदिन महोत्सव तथा पंचावतार उपाहार या कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे यांनी उपस्थिती देऊन आशीर्वाद घेतले. यावेळी प. पु. विद्वांसबाबा शास्त्री (अध्यक्ष, महानुभव परीषद), प. पू. संतोषमुनी रेलकर महाराज, प. पू. कृष्णाजी महाराज, प. पू. कृष्णराज महाराज, प.पू. जावळे बाबा आदी उपस्थित होते. यावेळी आ. राजुमामा भोळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. आ. राजूमामा भोळे यांचा महाराजांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन…
धरणगाव : प्रतिनिधी येथील सु.क्ष.म.स.संचालक भास्करराव पवार (मराठे) यांचे सुपुत्र हेमंत भास्करराव पवार (मराठे) यांना पुणे येथील पत्रकार भवन येथे आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव चे सुपुत्र हेमंत भास्करराव पवार (मराठे) सहाय्यक कृषी अधिकारी वेल्हा (राजगड) पुणे यांना नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य आयोजित “राज्यस्तरीय नालंदा ग्राम समृद्धी राज्यस्तरीय आदर्श कृषी सहाय्यक पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. पुणे येथील पत्रकार भवनात हा दिमाखदार पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सचिन अरुण अनंतकवळस (प्रशासन अधिकारी तथा योजना अधिकारी संचालनालाय महाराष्ट्र राज्य पुणे), जितेंद्र तुळशीराम दाते (चेअरमन ए. आर. जे. ग्रुप), अनिल कमलाकरराव…
मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून ग्रामसेवक संघटनांच्या बाबतीत महायुती शासनाने महानिर्णय घेतले आहेत.आज रोजी मंत्रीमंडळ बैठकीत ग्रामविकास विभागाने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यात ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला असून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे याच बरोबर 75 हजार पर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीला 10 लाखांची व 75 हजार च्या वर उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना 15 लाख पर्यंतची कामे ग्रामपंचायत एजन्सी म्हणून करता येतील या निर्णयामुळे ग्रामीण विभागातील विकास कामांना चालना मिळेल. ग्रामविकास विभागाने घेतलेले महत्वाचे निर्णय कॅबिनेटमध्ये राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याच्या निर्णयानंतर…
जळगाव : प्रतिनिधी स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा, त्यातच आपली प्रगती आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज येथील संत एकनाथ रंगमंदिरात पार पडला. सन २०१८-१९, २०२९-२०, २०२०-२१, २०२१-२२ अशा एकत्रित स्पर्धांचे आज पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी अल्पसंख्याक विकास,…
जळगाव : प्रतिनिधी दोन दुकानदारांना कुऱ्हाडीचा धाक दाखवत गल्ल्यामधून २ हजार ३०० रुपये चोरून नेले. ही घटना २१ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी २२ रोजी शहर पोलिस ठाण्यात अजीज खान उर्फ बाबा (रा. गेंदालाल मिल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकाजवळ सैय्यद ऐहसान सैय्यद हैदर (३०, रा. शिवाजीनगर) यांचे रेल्वे स्थानकाजवळ चहा विक्रीचे दुकान आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री त्या ठिकाणी अजीज खान हा चारचाकी वाहन (एमएच १९ बीजे १२२१) घेऊन आला. त्याने कुन्हाडीचा धाक दाखवत सैय्यद ऐहसान यांना धमकावत गल्ल्यातून १ हजार ५०० रुपये काढून घेतले. त्यानंतर बाजूला असलेल्या दुकानात राहुल सुनील…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नांद्रा येथे शेताच्या बांधावर बनावट खते आणून विक्रीप्रकरणी चार जणांना अटक केली. त्यांना २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणले जात असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांद्रा, ता. जळगाव येथे बांधावर छापा टाकून साठा जप्त केला होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात शहादा येथील मे. दक्षकमल ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत पाटील, दिनेश पाटील, महेश माटे, अलताफ शेख मो. हनीफ यांना अटक करण्यात आले. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी चौघांना न्यायालयात हजर केले असता २७…

