पारोळा : प्रतिनिधी एका गावातील अल्पवयीन युवतीस एका युवकाने फूस लावून मध्यरात्रीच्या सुमारास पळवून नेल्याची घटना घडली. याबाबत दोघांनाही पोलिसांनी पकडले असता दोन्ही अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. या युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवतीस दि. २७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकाने मध्यरात्रीच्या सुमारास फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला असता पोलिस उपनिरीक्षक अमरदीप वसावे व त्यांच्या टीमने त्यांना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथून पकडले. मंगळवारी त्यांची वैद्यकीय तपासणी करून सखोल चौकशी केली असता युवकाने युवतीवर बलात्कार केल्याचे निष्पन्न…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पाणी भरण्यासाठी २१ वर्षीय महिला घरी आलेली असताना तिला धमकावत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात घडली. याप्रकरणी ३० सप्टेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सुभाष चव्हाण याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका परिसरात मध्य प्रदेशातील एक कुटुंब वास्तव्याला आहे. या कुटुंबातील महिलेला सुभाष चव्हाण याच्या पत्नीने पाणी भरून ठेवण्याविषयी सांगितले होते. त्यानुसार ही महिला तेथे गेली असता त्यावेळी चव्हाण याने दरवाजा बंद केला व महिलेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर…
भुसावळ : प्रतिनिधी जळगावातील रहिवासी महिलेने भुसावळ येथे तापी पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५:३० वाजता घडली. बबली अरुण ढंढोरे (वय ५०, रा. शनीपेठ, जळगाव), असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, बबली ढंढोरे यांनी पुलावर पोहोचल्यानंतर नातेवाइकांशी संपर्क केला आणि काही क्षणातच तापी पात्रात उडी घेतली. ही घटना कळतात नागरिकांनी गर्दी केली होती. शहर पोलिस ठाण्याचे उद्धव डमाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत ढंढोरे यांचे जावई आकाश राजेश टाक यांनी याप्रकरणी पोलिसांत माहिती दिल्यानंतर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास शहर पोलिस हवालदार दीपक पाटील यांनी…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात पावसाचे वातावरण असतांना पुणे शहरातील आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली आहे. या धुक्यामुळेच हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. या घटनेचा एक व्हि़डीओही समोर आला आहे. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन…
मेष राशी कामाच्या ठिकाणी विश्वासू व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. म्हणून, सावध आणि सतर्क रहा. नोकरीत तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे काही सहकाऱ्यांना हेवा वाटेल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. प्रवास करताना अनोळखी व्यक्तीकडून काहीही खाणे तुमच्यासाठी घातक ठरू शकते. वाटेत एखाद्या प्राण्यामुळे अपघात होऊ शकतो. वृषभ राशी तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. मनातील कल्पना कृतीत आणण्यात यश मिळेल. जवळचा मित्र प्रमोशनमध्ये अडथळा ठरू शकतो. गुप्त शत्रूला मत्सर वाटेल. नवीन कामात तुम्ही पुढे असाल. शेतकऱ्यांना शेतीचा फायदा होईल. सहलीचा कार्यक्रम आखला जाईल. मिथुन राशी आईशी उगाच वाजेल. जमिनीशी संबंधित कामात नुकसान होण्याची शक्यता आहे. अन्यथा मारामारी होऊ शकते. कोणतेही नवीन काम करणे…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील मुलभूत सुविधांसाठीच नाही तर सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन विकासासाठीही हजारो कोटींच्या विकास निधीचा ओघ वाहत ठेवणा-या आ. मंगेश चव्हाण यांनी पाटणादेवी परिसराच्या वैविध्यपूर्ण विकासासाठी २० कोटी रुपयांचा निधी मिळवित तालुकावासियांना नवरात्रोत्सवाच्या पर्वणीवर अनोखी भेट दिली आहे. यामुळे या पुरातन तीर्थ व पर्यटनक्षेत्राचा कायापालट होणार आहे. खान्देशातील एक प्रमुख धार्मिक व पर्यटन क्षेत्र असा यास्थळाचा लौकीक असून तो अजून वाढणार आहे. पाटणादेवी हे चाळीसगाव तालुकावासियांचेच नव्हे तर अवघ्या खान्देशवासियांचेही कुलदैवत आहे. नवसाला पावणारी असे माता चंडिकेचे अधिष्ठान असून थोर गणितीतज्ञ भास्कराचार्य यांची ही तपोभूमी आहे. पुराणकाळापासूनच यापरिसराचे मोठे वैशिष्ट्ये राहिले आहे. निसर्ग व प्राणी, पक्षी संपदेने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने गायीला ‘राज्यमाते’चा दर्जा दिला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने सोमवारी आदेश जारी केला. यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्य सरकारने गायीला ‘राज्यमाता’ घोषित केले आहे, मी या पावलाचे स्वागत करतो, कारण मी शेतकरी आहे आणि ‘गाय’ ही प्रत्येक शेतकऱ्याची आई आहे. पण, निवडणुकीपूर्वी राजकीय खेळी म्हणून हे केले गेले आहे. नाना पटोले यांनी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारवरही हल्लाबोल केला. त्यांनी आरोप केला की, “नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून गोमांस निर्यातीत देश पहिल्या…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूड क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाच्या हातातील बंदुकीतून मिसफायर झाल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईत पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गोविंदा घराबाहेर जात असताना त्याच्याकडे परवाना असलेली बंदुक तपासून पाहत होता. त्याचवेळी चुकून त्यातून गोळी झाडली गेली. ही गोळी गोविंदाच्या गुडघ्याला लागली आहे. या घटनेनंतर त्याला तातडीने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या गोविंदावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचं कळतंय. गोविंदाबद्दलची ही बातमी समोर येताच चाहत्यांकडून काळजी व्यक्त करण्यात येतेय. सोशल मीडियावर अनेकांनी गोविंदाच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे. गोविंदाचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. एकेकाळी त्याने बॉलिवूड…
जळगाव : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यानुसार भागपूर उपसा सिंचन योजनेच्या रु. 3 हजार 533 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावामुळे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असून, जळगाव तालुक्यातील भागपुर- वावडदा सह 25 गावांच्या, तसेच जामनेर व पाचोरा पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्र्यांसह दोन्ही मंत्रीद्वयांना शेतकरी धन्यवाद देत आहे. सन 1999-2000 मध्ये या प्रकल्पासाठी 557 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मूळ प्रकल्पाअंतर्गत 18141 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट…
पारोळा : प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर बोजा चढविण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतांना सजा चोरवड येथील तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे (वय ३४) व खासगी पंटर शरद प्रल्हाद कोळी (वय ४३, रा. चोरवड, ता. पारोळा) यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील तक्रारदाराची साडेसहा एकर शेती आहे. त्या शेत जमिनिवर तक्रारदाराने गावातील विविध कार्यकारी सोसायटी मधून कर्ज घेण्यासाठी सदर शेत जमिनीचे सातबारा उताऱ्यावर बोजा चढवणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार यांनी लोणी बुद्रुक गावाचे तलाठी यांची चोरवड येथील कार्यालयात जाऊन दि. ४ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती.…

