भुसावळ : प्रतिनिधी शहरात रेल्वे शाळेच्या परिसरात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तिघांवर शहर पोलिसांनी रविवार रोजी रात्री साडेअकरा वाजता कारवाई केली. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, संशयित आरोपी दीपक रमेश म्याद्रे (४०), पंकज रेवाराम कहार (१९) आणि एक अल्पवयीन मुलगा असे तीनजण दुचाकीवर हातात तलवार घेऊन दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी रात्री साडेअकरा वाजता तिघांवर कारवाई करीत तलवार आणि दुचाकी जप्त केली आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी अडावद येथील भगवाननगरातील बापू हरी महाजन (३५) या तरुणाच्या खून प्रकरणात एका अल्पवयीनासह तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे. तंबाखू मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या खून प्रकरणाने अडावद गाव हादरले आहे. राज सुरेश महाजन (१९, रा. अडावद, ता. चोपडा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे, तर अल्पवयीनाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, लोखंडेनगरात राहणाऱ्या बापू महाजन याचा लाकडी दांड्याने तसेच दगडाने ठेचून खून झाल्याची घटना १ रोजी सकाळी भगवाननगरात उघडकीस आली होती. याप्रकरणी मृत तरुणाचे मामा शांताराम पुना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. अडावद पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये…
मेष राशी नोकरीच्या ठिकाणी नवीन सहकारी मिळतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये, सत्ताधारी व्यक्ती विशेष सहयोगी असल्याचे सिद्ध होईल. व्यवसायात वेळेवर काम करा. फायदा होईल. नोकरीच्या शोधात तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. नोकरीसाठी दिलेल्या परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. वृषभ राशी नोकरीत बढती झाल्याची चांगली बातमी मिळू शकते. क्रीडा स्पर्धांमध्ये प्रसिद्धी मिळाल्याने तुमचे वर्चस्व वाढते. व्यवसायाशी संबंधित लोकांना नवीन करार मिळेल. काही सरकारी कार्यक्रमात मदत करण्याची संधी मिळेल. गुपचूप नवीन उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्याची योजना करा. मिथुन राशी कामात खूप व्यस्त असाल. व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. काही कामात अडथळे येतील. नोकरीत वरिष्ठांशी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी आणि मोबाईल चोरून नेणाऱ्या दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता पिंप्राळा हुडको परिसरातून अटक केली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब अफजल खान पठाण वय-२३ आणि शेख आवेश शेख मोहम्मद वय-२१ दोन्ही राहणार पिंप्राळा हुडको, जळगाव असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोर्ट चौक, सुभाष चौक, नेहरू चौक या ठिकाणाहून दुचाकी तर खोटे नगर भागातून मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या शेतकरी हिताच्या कार्याला आदरांजली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी आज दि १ ऑक्टोंबर रोजी ११ कोटी ६९ लक्ष निधीतून साकारण्यात येत असलेल्या जळगाव भव्य अश्या कृषीभवनाचे भूमिपूजन करत तालुक्यातील ५०० प्रगतिशील शेतकऱ्यांचा सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान केला. यावेळी माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज. केळीतज्ञ – श्री. के. बी. पाटील (जैन इरिगेशन), जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, से. नि. कृषी संचालक- श्री. अनिल भोकरे, राज्य पुरस्कार प्राप्त कृषी भुषण अरुण निकम सर, बाळासाहेब राऊत (शिंदी), आर.के.पाटील (शिरसगाव), भगवान परदेशी (जामडी), सौ.सिमा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे सरकारने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. म्हणजे एका पात्र महिलेला एका वर्षात 18,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे.आत्तापर्यंत या योजनेचे एकूण तीन हप्ते म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याचे पैसे नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले होते आणि ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे 4500 मिळाले आहेत…
जळगाव : प्रतिनिधी येथील जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे आमदार राजूमामा भोळे चषक अंतर्गत ४ थी राज्य अजिंक्यपद (मानांकन) टेबल टेनिस स्पर्धा २०२४ चे आयोजन शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे दि. ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. मंगळवारी दि. १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी १९ वर्षाखालील खेळाडूंचे सामने संपले. यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. मंगळवारी १९ वर्षाखालील खेळाडूंच्या स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी मंचावर सामाजिक कार्यकर्ते विशाल भोळे, माजी नगरसेवक नितीन बरडे, प्रदीप तळवलकर, टेबल टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश चौबे, चंद्रशेखर त्रिपाठी, सचिव विवेक अळवणी, खजिनदार संजय शहा, सदस्य प्रा. चारुदत्त गोखले, राजू खेडकर, डॉ. श्रीधर…
धरणगाव ; प्रतिनिधी येथील तिळवण तेली पंच मंडळी, सुभाष दरवाजा तेली मढीच्या जागेवर भव्य-अत्याधुनिक सर्व सुविधांनीयुक्त सभागृह बांधण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी २६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. संबधीत कामाची प्रशासकीय मान्यता मंजूर झाली असून तेली समाज मंडळाचे सभागृहाचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या कामासाठी तेली समाजाचे पंच मंडळ आणि समाज बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली होती. धरणगाव नगरपरिषद हद्दीतील सिटीएस क्रमांक १४२ अ आणि सिटीएस क्रमांक १४२ ब जागेवर ( खालचा मजला व पहिला मजला) तेली समाज पंच मंडळासाठी बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम प्रलंबित होते. ते करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजना अंतर्गत नुकतेच…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथे मध्यरात्रीच्या सुमारास के. टी. नगरच्या मागील बाजूला असलेल्या परिसरात बापू उर्फ गरीब हरी महाजन (वय २८, रा. खर्ची, ता. एरंडोल, ह. मु. लोखंडेनगर अडावद, ता. चोपडा) या तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करीत डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला. ही घटना मंगळवार दि. १ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अद्याप खूनाचे कारण अस्पष्ट आहे. याप्रकरणी अडावद पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील बापू उर्फ गरीब महाजन हा तरुण गेल्या काही वर्षांपासून अडावद येथे आपल्या मामांच्या गावाला राहण्यासाठी आला होता. मध्यरात्रीच्या…
अमळनेर : प्रतिनिधी गटारीच्या कामासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात दोन लहान मुले बुडाली. मात्र, आठवीच्या मुलाने खड्यात उडी मारून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने दोघांचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, संत प्रसाद नगरमध्ये गटारीचे काम सुरू असून कंत्राटदाराने सुमारे पाच फूट खोल खड्डे करून ठेवले आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने खोदून ठेवलेले खड्डे पाण्याने पूर्ण भरले होते शुक्रवारी संस्कार पारध्ये (६) आणि वेदांत पारध्ये (३) हे दोघे दुकानावर वस्तू घ्यायला बाहेर निघाले आणि गंमत म्हणून खड्डे बघायला गेले. त्यात एकाचा काठावर पाय घसरल्याने तो खड्यात पडला. दुसरा त्याला धरायला गेला असता तोही पाण्यात पडला. खाली माती होती त्यामुळे ते गाळात फसले.…

