जळगाव : जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बांभोरी (प्र.चा.) येथील शेकडो तरूणांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री श्री.देवकर यांचे स्वतः सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले. महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना जळगाव ग्रामीणमधील प्रचार रॅलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासोबतच अनेक ठिकाणचे तरूण पक्ष प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करत आहेत. बांभोरी येथील तरूणांनीही राष्ट्रवादीत प्रवेश करून माजी मंत्री श्री.देवकर यांना खंबीर साथ देण्याचा निर्धार केला. यावेळी मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, जळगाव कृऊबासचे संचालक दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा सरचिटणीस बरकत…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी सीसीटीव्ही व हायमास्ट लॅम्प लावण्यासाठी वीज पुरवठा बंद करण्यास नकार दिल्याने सब स्टेशनवर जाऊन खासगी कामासाठी हिरालाल गंगाधर पाटील (वय ४९, रा. हर्षवर्धन कॉलनी) यांना दोघांनी मारहाण करुन लॉगशीट फाडले व जबरदस्तीने वीज पुरवठा खंडीत केल्याची घटना बुधवारी रात्री शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी कुणाल हटकर व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तींविरुध्द शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हिरालाल गंगाधर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजी नगर सब स्टेशनच्या लैंडलाइन फोनवर बुधवारी रात्री साडे सात वाजता एक कॉल आला असता तो सुरक्षा रक्षक हेमंत पवार यांनी उचलला. कुणाल हटकर नावाच्या व्यक्तीकडे सीसीटीव्ही कॅमेरा…
जळगाव : प्रतिनिधी इच्छा देवी चौकात वाहनात न अवैधरित्या गॅस भरताना झालेल्या स्फोटातील जखमींपैकी पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या संजय गणेश तेरवडीया (रा. गणेश पेठ, पुणे) यांचा बुधवारी रात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे गॅस रिफिलींग स्फोटातील मृतांची संख्या ही पाचवर पोहचली. मागील आठवड्यात वाहनात गॅस रिफिलींग करतांना सिलींडरचा स्फोट होवून ११ जण गंभीर जखमी झाले होते. त्यामध्ये वाहनात बसलेल्या सात ते जणांसह गॅस भरणारा आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले होते. तर संजय तेरवडीया यांच्यासह त्यांची पत्नी प्रतिभा व मुलगी रेश्मा मुलीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले असून त्याठिकाणी उपचार आहेत. सुरु य बुधवारी रात्रीच्या सुमारास संजय तेरवडीया…
भुसावळ : प्रतिनिधी चाकूचा धाक दाखवून एक लाख रुपये लुटले असल्याचा प्रकार निंभोरा खुर्द, ता. भुसावळ येथे घडला. या प्रकरणी तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फरिदा रशिद पिंजारी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि. १० रोजी रात्री १:३० वाजता तीन जण त्यांच्याकडे आले. त्यांनी त्यांच्या साईटवरील चोरीचा माल भंगारात विकत घेतल्याचा बहाण केला. त्यानंतर पिंजारी यांच्या वडिलांना चाकूचा धाक दाखवल आणि तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर दुकानात असलेले एक लाख रुपये घेऊन त्यांनी पोबारा केला या प्रकरणी दि. १४ रोजी फिर्याव देण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मंगेश दराडे…
जळगाव / धरणगाव, १४ नोव्हेंबर – ममुराबाद, मोहाडी, दोनगाव, आव्हाणी, फुलपाट, धानोरा, टाकळी या भागात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी धनुष्यबाणाचा सळसळता जल्लोष पाहायला मिळाला आहे. माध्यमांशी संवाद साधताना, पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत सांगितले की, “होय, हा सामान्य टपरीवालाच बाळासाहेबांच्या पुण्याईने आणि जनतेच्या आशीर्वादाने विधानभवनात चौथ्यांदा प्रवेश करणार आहे.” आपण गावोगावी रस्ते, मुलभूत सुविधा देवून आणि पूल बांधले आणि गावं जोडण्याचे काम करून जनतेच्या सुखं आणि दु:खात जावून माणस जोडण्याचे काम केल आहे. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त पाठिंबा – मोहाडी पासून ममुराबादपर्यंत जल्लोषात प्रचार ! ममुराबाद येथे खंडेराव महाराज मंदिरासाठी ३ कोटींच्या निधीतून सुधारणा, या भागातील विविध…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीला वाल्मीक नगर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जनतेतून महाजन यांच्याबद्दल वाढलेला आशावाद व त्यांच्याकडे परिवर्तनाची अपेक्षा पाहायला मिळत आहे. आज दुपारी झालेल्या या रॅलीला सुरुवात करताना जयश्री महाजन यांनी रामायण महाकाव्याचे रचयिता महर्षी वाल्मीक ऋषींना नतमस्तक होऊन अभिवादन केले, ज्यामुळे परिसरातील जनतेत एकात्मता व आदराची भावना दिसून आली. त्यानंतर महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली सुरू झाली, ज्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जयश्री महाजन यांनी आपल्या भाषणात जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांविषयी आपली जाणीव व्यक्त केली. “सामान्य जनतेचे…
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांच्या या निस्सीम प्रेमाने आ. राजूमामा भोळे काही काळ हरखून गेले होते. आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी दुसऱ्या टप्प्यात मानराज पार्क परिसरातील कार्यकर्ते राहुल पाटील यांचे घरापासून रॅलीला सुरुवात केली. तेथून निवृत्ती नगर, मुक्ताईनगर, एसएमआयटी कॉलेज परिसर, भिकमचंद जैन नगर, भोईटे नगर मार्गे माजी नगरसेविका लताताई भोईटे यांच्या घरी समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी महिला भगिनींकडून आ. राजूमामा भोळे…
यावल : प्रतिनिधी शहरातील एका दुकानावर ५०० ची बनावट नोट चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण गंभीर महाजन (रा. रेंभोटा, ता. रावेर), राजेंद्र मुरलीधर पाटील (रा. अयोध्यानगर, जळगाव), नीलेश सुरेश पाटील (रा. डोणगाव, ता. धरणगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यांचा चौथा साथीदार फरार आहे. बुधवारी सायंकाळी भुसावळ रोडवरील एका दुकानावर चार जणा आले होते. त्यांनी येथे ५०० ची नोट दिली असता दुकान चालकाला संशया आला. त्याने पोलिसांना माहिती दिली. काही क्षणातच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.…
मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असण्याची शक्यता नाही. कामाच्या ठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. आजूबाजूला अधिक धावपळ होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. अनावश्यक वाद वगैरे टाळा. वेळ वाया घालवू नका. त्याचा पुरेपूर वापर करा. चांगल्या मित्रांसोबत भागीदारीत काम कराल. खबरदारी आवश्यक आहे. आर्थिक स्थितीत चढ-उतार होतील. घरामध्ये धार्मिक शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. शहाणपणाने पैसे खर्च करा. खूप जवळची प्रिय व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ शकते. ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होईल. त्रयस्थ व्यक्तीमुळे प्रेमसंबंधांमध्ये मतभेद होऊ शकतात. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. काही महत्त्वाच्या कामात संघर्ष होईल. कार्यक्षेत्रात परिस्थिती काहीशी…
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीला आज (दि. १४) छत्रपती शिवाजी महाराज नगर येथून जोरदार सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयघोषात रॅलीची सुरुवात करण्यात आली. समर्थकांच्या जोशपूर्ण घोषणा आणि महाराजांच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण तयार झाले. आज बाल दिनानिमित्त जयश्री महाजन यांनी रॅली दरम्यान लहान मुलांशी दिलखुलास गप्पा मारल्या. लहानग्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देताना, त्यांनी त्यांच्या गप्पांतून मुलांशी जिव्हाळ्याचे नाते जुळवले. मुलांसोबत फोटो काढताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद विशेष उल्लेखनीय होता. बालगोपाळांची जिद्द, ऊर्जा, आणि चिकाटी हीच खऱ्या नेतृत्वाची ओळख असल्याचे मत जयश्री महाजन यांनी…

