Author: editor desk

बोदवड – गावागावात आकर्षक रांगोळी,फुलांची उधळण, ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी खडसे यांचे होत असलेले स्वागत आणि तरुण आबाल वृद्ध महिला अशा समाजाच्या सर्व स्तरातून भेटत असलेला प्रतिसाद बघता मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा विजयाचा दावा मजबुत होताना दिसत आहे रोहिणी खडसे यांनी बोदवड तालुक्यातील पळासखेडा, मुक्तळ, वाकी बोरगाव, वराड, सुरवाडे खु, सुरवाडे बु, मानमोडी, जलचक्र तांडा, जलचक्र खु, जलचक्र बु या गावांमधे प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधत आपल्या तुतारी वाजणारा माणूस या निशाणी समोरील बटण दाबुन मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली. यावेळी सर्व गावांमध्ये त्यांना ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला याप्रसंगी ग्रामस्थांशी…

Read More

जळगाव : हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक टपरीवाल्यांना आमदार, खासदार व मंत्री केले. पण हा टपरीवाला शेवटी लायकीवरच गेला. त्याला घरी बसविण्याची वेळ आता आली असून, २३ तारखेनंतर तो तुम्हाला विधानसभेत दिसणार नाही, अशी टीका शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी धरणगावात केली. महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ धरणगावातील कोट बाजार भागात शिवसेना कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत खा.राऊत यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारावर जोरदार टीका केली. पाणीपुरवठा खात्याचे मंत्री असताना गुलाबराव पाटील धरणगावकरांना पुरेसे पाणी देऊ शकत नाही. त्यांना दारूत टाकायला पाणी मिळते, लोकांना मात्र पाणी मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यांनी धरणगावात उद्योग…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील राजकारणात चाणक्य समजले जाणारे माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी, “मग येणार ना मंत्री बनून”अशा शब्दात विचारणा करून महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना मिठाई भरवून विजयासाठी आशीर्वाद दिले. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात आ. राजूमामा भोळे यांना गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागांमध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी गणपती नगरातील श्री गणपतीचे दर्शन घेऊन पहिल्या टप्प्यातील रॅलीला सुरुवात केली. तेथून गणपती नगर, आदर्श नगर, जीवन मोती सोसायटी, रामेश्वर कॉलनी, विश्वकर्मा नगर, राजपूत गल्ली मार्गे स्वामी समर्थ चौकात समारोप केला. दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी रॅली मार्गात माजी महापौर प्रदीप रायसोनी, माजी खासदार…

Read More

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, त्यांच्या आगमनावेळी गावागावात मोठा जल्लोष होताना दिसत आहे. ठिकठिकाणी महिला त्यांचे औक्षण करत आहेत. कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत केले जात आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा भास होत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द, वंजारी खपाट, अहिरे खुर्द, सोनवद खुर्द व सोनवद बुद्रुक, तरडे, पष्टाणे आदी गावात प्रचार रॅली काढली. यावेळी तळागाळातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. सेवेची संधी मिळाल्यानंतर पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्था, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधा आधी पुरविल्या जातील,…

Read More

बोदवड (प्रतिनिधी) : माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी तीस वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकासाला प्राधान्य दिले तिस वर्षात कुठेही सामाजिक तेढ निर्माण झाली नाही, कुठेही खंडणी, दादागिरी गुंडगिरीचे प्रकार घडले नाहीत परंतु गेले पाच वर्षात काही लोकांनी मतदासंघांचे वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना आपल्याला मतदानातून उत्तर द्यायचे आहे, असे प्रतिपादन माजी सरपंच कैलास चौधरी यांनी केले. ॲड.रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या बोदवड भागात ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या जनआशिर्वाद पदयात्रे दरम्यान ते बोदवडवासियांशी संवाद साधत होते. यावेळी माजी सरपंच कैलास चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधताना पुढे सांगितले…

Read More

बोदवड (प्रतिनिधी) : आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या तीस वर्षाच्या काळात नेहमी शहराच्या विकासासाठी पुढाकार घेतला त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. बोदवड शहराचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. त्यांचाच वारसा चालविणाऱ्या रोहिणी खडसे यांना या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने बोदवडवासियांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरपंचायत गटनेते जाफर शेख यांनी ॲड.रोहिणी खडसे यांच्या बोदवड शहरात ॲड.रविंद्र भैय्यासाहेब पाटील, उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान केले. यावेळी जाफर शेख पुढे म्हणाले की, विद्यमान आमदारांनी नाथाभाऊंनी आणलेल्या निधीला तांत्रिक कारणे देत, सत्तेचा दुरुपयोग करत, स्थगिती आणली किंवा निधी इतरत्र वळवला.…

Read More

जळगाव / धरणगाव 13 – शिवसेना नेते व महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि स्वतंत्र विकासाचा वचननामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित केला आहे. या वचननाम्यात मागील वेळेस दिलेल्या वचनांपेक्षा अधिक कार्य केले असून याही वेळेस मोठे प्रकल्पांवर भर देवून शेती रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची कटिबद्धता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प मांडण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विकासासाठी घेतलेल्या संकल्पाचे कौतुक केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव ग्रामीणचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला. तर गुलाबराव पाटील यांनी सांगितले की “धनुष्यबाणावर विश्वास दाखवून संधी…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : ठिकठिकाणी, घरोघरी हट्टाने आपल्या घरी बोलावून घेत भाचींनी आपल्या लाडक्या राजुमामा भोळे यांना बोलावून औंक्षण करीत फुलांचा वर्षाव त्यांच्यावर केला. प्रत्येक भाचीच्या ओवाळण्याचा हट्ट पुरविताना आ. राजूमामां भोळे यांना दमछाक झाले. आता प्रचाराला केवळ ५ दिवस उरले असताना आ. भोळे यांनी प्रचारात प्रचंड वेग घेतला आहे. आ. राजूमामा भोळे यांनी पिंप्राळा येथील भवानी माता मंदिर येथे पूजा अर्चा करून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर आ. भोळे यांनी दांडेकर नगर परिसर, पिंप्राळा बाजार रोड परिसर, शिवराणा नगर, शंकर अप्पा नगर, शिंदे नगर परिसर, जिल्हा बँक कॉलनी परिसर, इंद्रनील सोसायटी मार्गे स्वामी समर्थ मंदिर जवळ समारोप करण्यात आला. अनेक ठिकाणी…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा प्रचार दौऱ्याचा धडाका सुरु असून, त्यांचा प्रचार दौरा ज्या भागात असतो त्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादासह प्रचार रॅलीत सहभागही आता जाणवू लागला आहे. जयश्री महाजन यांच्या प्रचाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रचारातील नावीन्य. या नावीन्याचीच जळगावकरांना अधिक अपूर्वाई वाटत आहे. जळगावकरांचे प्रश्न होर्डिंगच्या माध्यमातून मांडणे असो की प्रचार फेरी सुरु असतांना, समोर आलेला एखादा लहानगा असो. प्रत्येकाशी जयश्री महाजन या संवाद साधत आहेत. त्यांच्या एकंदरीत वागण्या बोलण्यावरून त्यांची जळगावकरांशी असलेली जवळीक व संवाद साधण्याची हातोटी अधोरेखित होत आहे. प्रभाग क्रमांक ११ मधून काढण्यात आलेली प्रचार फेरीत समर्थकांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल येथून प्रसूत महिला व तिच्या नवजात बाळाला घेऊन येणाऱ्या १०८ या अॅम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात वाहनाच्या चिंधड्या होऊन त्याचे तुकडे दीडशे फूट उंच उडाले, तर तब्बल ५०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचे हादरे बसले. चालकाच्या समयसूचकतेमुळे अॅम्बुलन्समधील रुग्ण, त्याचे नातेवाईक, डॉक्टरचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाच्या दोन बंबाद्वारे आग विझविण्यात आली. ही घटना बुधवारी रात्री ९.१५ ते ९.३० वाजेच्या दरम्यान महामार्गावरील दादावाडीजवळच्या उड्डाणपुलावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल येथून एम.एच.१४ सी.एल.०७९६ ही १०८ अॅम्बुलन्स मनिषा रवींद्र सोनवणे (भिल) (२५, रा. बामणे, ता. एरंडोल) या प्रसूत महिलेसह तिच्या बाळाला घेऊन शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात येत होती.…

Read More