Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचार रॅलीने प्रभाग क्रमांक १ मध्ये निवडणूक प्रचाराला जोरदार सुरुवात केली. आज दुपारी के.सी. पार्क परिसरात झालेल्या या रॅलीत कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे आजच्या रॅलीचे खास वैशिष्ट्य होते. आज (दि.१७) महाविकास आघाडी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून काढलेल्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ इंदिरा नगर येथून झाला. त्यानंतर संपूर्ण खेडी परिसर, माऊली नगर, शांताराम पाटील शाळा या मार्गे जात ज्ञान चेतना अपार्टमेंट येथे प्रचार दौऱ्याचा समारोप झाला. जयश्री महाजन आपल्या विकासाच्या आणि शहर प्रगतीच्या मुद्द्यावर ठाम असून, यासाठी इतके दिवस केवळ भाषणातून वा सभांमधून…

Read More

जळगाव । महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश भोळे यांचा गेलुआ दहा दिवसापासून जोरदार प्रचार सुरु असून शहरातील विविध समाज, संस्था यांनी आमदार भोळे यांना विजयासाठी पाठींबा दिला आहे. विरोधकांच्या जवळीकांनी देखील आमदार भोळे यांना पाठींबा दिला असल्याने पुन्हा एकदा शहराचे आमदार म्हणून राजू मामांनाच पसंती मिळत आहे. गेल्या दहा वर्षात आमदार भोळे यांनी केलेला शहराचा विकास आणि भविष्यातील जळगावमधील विकास यांसाठी आमदार भोळे यांनाच जळगावकरांनी पसंती दिली आहे. दहा दिवसात प्रचारात आमदार भोळे यांना शहरावासियांनी भरभरून प्रेम दिले आहे. फुलांचा वर्षाव, रांगोळ्यांच्या पायघड्या, घरोघरी औक्षण करून महिलांसह पुरुषांनी देखील आमदार भोळे यांना विजयाची ग्वाही दिली आहे. त्यामुळे राजू मामांचा विजय…

Read More

मेष राशी आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. जर तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलावे. तुम्हाला योग्य मार्ग सापडेल. प्रेमाच्या बाबतीत तुमचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली राहील. आर्थिक क्षेत्रात प्रगती कराल. जर तुम्हाला आज काही नवीन योजना सुरु करायची असेल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. अति विचार करु नका. वृषभ राशी आज कुटुंबाकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. जर दुर्लक्ष केलात तर चिडचिड होईल. विनाकारण भावंडांशी वाद होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक कारणांमुळे कामाच्या ठिकाणी कोणाशी भांडण देखील होऊ शकते. सामंजस्याने वागा अन्यथा भविष्यातील लाभांपासून वंचित राहाल. संयम बाळगा…

Read More

जळगाव/धरणगाव दि. 15 – जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ वासुदेवांचा रंगीबेरंगी फंडा आता गावोगावी गाजत आहे. “वासुदेव आला रे, वासुदेव आला!” या उत्साही गजरात, वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराची धूमधडाका उडवून दिला आहे. हातात चिपळ्या, गळ्यात गजरा आणि मुखावर आत्मीयतेचा भाव, वासुदेवांचा ताफा प्रत्येक गावात थेट चौका – चौकात, घराघरात जाऊन प्रचार करत आहे. त्यांच्या गीतांमधून गुलाबभाऊंच्या विकासाचा व धनुष्यबाणाचा इतिहास उलगडत आहे. वासुदेवांचा प्रचार फंडा म्हणजे शिवसेनेची आपुलकीची आणि हृदयाला भिडणारी प्रचार शैली आहे. “गुलाबराव पाटील म्हणजे ‘हक्काचा आपला माणूस’, तुमच्यासाठी उभा राहणारा नेता,” असा ठसा त्यांच्या गीतांतून उमटत आहे. वासुदेवांचा आवाज, चिपळ्यांचा…

Read More

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, पातोंडी, बेलखेड, धामणदे, भोकरी, नरवेल, पिंप्रि भोजना, लोहारखेडा, बेलसवाडी, पिंप्री नांदू या गावांमध्ये जन आशिर्वाद पदयात्रा काढून मतदारांचे आशिर्वाद घेऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली. यावेळी गावागावांत रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटलेली दिसली. पदयात्रेत तरुणांचा मोठया प्रमाणावर समावेश होता. ‘रोहिणीताई आगे बढो.. हम तुम्हारे साथ है’ आणि ‘विकासाची एकच ग्वाही रोहिणीताई’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गावागावात आबालवृद्धानी रोहिणी खडसे यांना विजयासाठी आशिर्वाद दिले तर महिलांनी रोहिणी खडसे या आमच्या मधीलच एक भगिनी असून, त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाण…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवतीर्थ मैदानावरील जळगाव शहर वुलन मार्केट असोसिएशनने जाहीर पाठिंबा देऊन मार्केटच्या सर्व सदस्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. आ.राजूमामा भोळे यांनी शुक्रवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी वूलन मार्केट येथे भेट दिली. असोसिएशनतर्फे त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सन्मान करण्यात आला. त्यावेळी पदाधिकाऱ्यांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधला. प्रसंगी, जळगाव शहर वूलन मार्केट असोसिएशनतर्फे, आम्ही आ. राजूमामा भोळे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत. सर्व सदस्यांनी निवडणुकीत आ. भोळे यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले. प्रसंगी भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : आ. राजूमामा भोळे यांना बालदिनी दि. १४ नोव्हेंबर रोजी एका चिमुरडीने “विजयी भव” “आमचे मामा, राजूमामा” असे आशय असलेले व विजयासाठी सदिच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड भेट दिले. प्रसंगी चिमुरडीचे कौतुक करून आ. राजूमामा भोळे यांनी तिला धन्यवाद दिले. पिंप्राळा भागातील निवृत्ती नगरातील रहिवासी आरोही निकम या ७ वर्षीय चिमुरडीने “बालदिनी” आ. राजूमामा भोळे घरी भेटीला आले असता, त्यांना शुभेच्छांपर ग्रिटींग कार्ड भेट दिले. ग्रीटिंग कार्डच्या पहिल्या पानावर “विजयी भव” व उघडल्यावर “आमचे मामा, राजूमामा” असे लिहून आरोहीने आ. भोळे यांना सदिच्छा दिल्या. प्रसंगी आरोही हिला मिठाई भरवून आ. राजूमामा भोळे यांनी बालदिनानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या.

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा तथा सुरेश भोळे यांनी गेल्या १० वर्षाच्या काळात नेहमी मतदारसंघाच्या विकासासाठी पुढाकार घेतला. त्यांनी शहराच्या विकासासाठी वेळोवेळी निधी मंजूर करून आणला. त्यामुळे अनेक बदल घडून आले. त्यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी यांनी प्रचार रॅलीदरम्यान संवाद साधताना केले. जळगाव शहरात आ. राजूमामा भोळे यांनी राजर्षी शाहूनगर, जयकिसनवाडी, नवीपेठ भागात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात रॅली काढली. प्रसंगी जनतेतून भरभरून प्रतिसाद लाभला. राजर्षी शाहू नगर येथील तपस्वी हनुमान मंदिर येथे पूजा करून आ. भोळे यांनी दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली.…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज (दि. १५) रोजी सुभाष चौक येथे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. आठ वर्षांनंतर सुभाष चौकात जाहीर सभेला संबोधित करत एकनाथराव खडसे यांनी चौफेर फटकेबाजी करत आपल्या खास शैलीत महायुतीचा खरपूस समाचार घेतला. सभेत सुरुवातीला मुकुंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शहरात सिव्हील हॉस्पिटलसमोर असलेल्या जागेवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुध्द यांचा पुतळा हटविण्याचे षडयंत्र रचणाऱ्या भाजपाचे…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : शुक्रवारी प्रचारातील पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या स्वागतासाठी शहरातील महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद, मेस्कोमाता नगर सजल्याचे चित्र सकाळी दिसून आले. गल्लीबोळात रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात महिलांच्या औक्षणासाठी रांगा लागल्या होत्या. प्रत्येक भगिनी, भाचीचा ओवाळण्याचा हट्ट आ.राजूमामांनी पुरविला. लहान मुले, तरुण, महिला सर्वच वर्गातील नागरिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरील प्रेमवर्षाव पाहून आ. भोळेंना आनंदाश्रू आवरता आले नाही. शुक्रवारी दि. १५ रोजी पहिल्या टप्प्यात महर्षी वाल्मिक मंदिर येथे अभिवादन करून आ. राजूमामा भोळेंनी प्रचाराला सुरुवात केली. तेथून महर्षी वाल्मिक नगर, जैनाबाद, तानाजी मालुसरे नगर, दिनकर नगर, गुरुदत्त कॉलनी, मेस्को माता नगर परिसर, श्रीराम कॉलनी, दशरथ नगर, तळेले…

Read More