Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीच्या सरकारने अनेक दिग्गज मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू दिल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे अनेक नेते देखील नाराज झाले आहे. तर विरोधक देखील आता सत्ताधाऱ्यावर टीकास्त्र सोडू लागले आहे. यात प्रामुख्याने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. छगन भुजबळ यांनी मनोज जलांगे पाटील यांच्या विषयी टोकाची भूमिका घेतली होती. त्यांनी तशी भूमिका घ्यायला नको होती, असे आमचे मत होते. मात्र आता त्यांना ही भूमिका घ्यायला लावली होती, असे दिसत असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळ यांचा वापर करण्यात आला,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे तर लवकरच खाते वाटप देखील जाहीर होणार आहे. तत्पूर्वी महायुतीतील काही नेते नाराज असल्याची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. यावर महायुतीमधील नेते उदय सामंत यांनी यावर वक्तव्य केले आहे. खाते वाटपाबाबत कुठलाही तिढा नाही. याबाबत दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. सरकार विरोधकांना उत्तर द्यायला सक्षम असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप जाहीर झालेले नाही. यावरुन सत्ताधारी पक्षावर विरोधक टीका करत आहेत. या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात मंत्रीपदावरुन वाद सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. यात…

Read More

चोपडा : प्रतिनिधी चोपडा – यावल रस्त्यावर नावरे फाट्याजवळ कॅटर्सचे साहित्य आणि कामगार घेऊन जाणाऱ्या वाहनाचा सोमवारी सकाळी अपघात झाला. या अपघतात ४ महिला जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळतात नागरिकांनी धाव घेतली व जखमी महिलांना तेथून उपचाराकरिता जळगावला हलवले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही तरी केटर्सचे साहित्य तसेच तयार जेवण सांडले जावून नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा – यावल रस्त्यावर साकळी गावाच्या पुढे यावल कडे जातांना नावरे फाटा आहे. या फाट्याजवळ सोमवारी सकाळी जळगाव येथून दहिगाव या गावात कॅटर्सचे साहित्य आणि कामगार घेऊन जाणारे वाहन क्रमांक एम. एच. १९ बी.एम. ५७२२ यास अपघात झाला. या अपघातामध्ये वाहनातील चार महिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बीएचआर’ प्रकरणी दाखल आलेल्या गुन्ह्यात मदतीसाठी लाखो रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाणांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात तर मविप्र प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी दिल्ली सीबीआयचे पथक सोमवारी जळगावात दाखल झाले. हे पथक या गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांची चौकशी करुन त्यांचे जाबजबाब नोंदविण्यासाठी आठ दिवस ठाण मांडून बसणार आहे. भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुनिल झंवर यांना कोठडीत मदत करण्यासाठी चाळीसगावातील एका मद्य विक्रेत्याच्यामार्फत तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी लाच मागितली होती. याप्रकरणी सुरज झवर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चाळीसगाव पोलिस ठाण्यात तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी राज्यातील जनतेने महायुतीला मोठे यश दिल्यानंतर महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झाला आहे तर जळगाव जिल्ह्याला यंदाच्या मंत्रीमंडळात देखील तीन मंत्री पद दिले असून यात अजित पवार गटाचे एकमेव आमदार व माजी मंत्री अनिल पाटील यांना डच्चू दिला आहे. यावर आता आ.अनिल पाटील यांनी मौन सोडत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मंत्रिपद मिळालेले नसले तरी माझ्या कामकाजात फरक पडणार नाही. प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करत राहणार आहे. जनसेवेसाठी मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला त्यावर आपली कोणतीही नाराजी नाही, अशा शब्दांत माजीमंत्री तथा आ. अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा जोरात सुरू असून, महसूल पथकाला गुप्त माहिती मिळताच प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे गिरड येथून रविवारी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडण्यात आले. यावेळी पथक प्रमुख भडगाव तहसीलदार शीतल सोलट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी समाधान हुल्लुळे, योगेश पाटील, अभिमन्यू वारे, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महसूल सहायक महादू कोळी, लोकेश वाघ यांनी चोख कामगिरी केली. मौजे कराब (ता. भडगाव) येथून दि. १५ रोजी रात्री अवैध गौण खनिज वाहतूक करणारा १ ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले. मौजे परधाडे (ता. पाचोरा) येथून अवैध गौण खनिज वाळू…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरात गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक पोलिस वाहन तपासणी करीत आहेत. दोन दिवसांत शहरात १९३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सुमारे एक लाख १९ हजाराची दंड आकारण्यात आला आहे. यामुळे पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नका अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक उमेश महाले यांच्या पथकाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. मुलांच्या हट्टापायी पालक मुलांना दुचाकी देतात मात्र, शाळकरी विद्यार्थी नियमांना बगल देतात. यासाठी पोलिस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहेत. परिवहन विभागानुसार, १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना वाहन चालवण्याचा परवाना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढतच असून, रविवारच्या तुलनेत सोमवारी पुन्हा रात्रीच्या तापमानात काही अंशी घट झाली. सोमवारी रात्री पारा ७.८ अंशापर्यंत घसरला होता. दिवसाच्या तापमानातदेखील लक्षणीय घट झाल्यामुळे दुपारच्या वेळेस गारठा जाणवत आहे. दरम्यान, १७ व १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीपासून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कडाक्याच्या थंडीचा परिणाम संपूर्ण जनजीवनावर झालेला दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो थंडीच्या काळात घराबाहेर निघणे टाळावे. थंडीपासून बचाव करतील अशीच कपडे परिधान करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

मेष राशी आज तुम्हाला बाहेरच्या लोकांना भेटण्यात आणि संपर्क साधण्यात आनंद वाटेल. सहकारी आणि भाऊ यांच्या सहकार्याने पुढे जाईल. स्पर्धेत धैर्य व शौर्य दाखवून यश मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाटेल. नोकरीत अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. कुटुंबात शुभ कार्य पूर्ण होतील. वृषभ राशी मित्र आणि कुटुंबियांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत नवीन मित्र मिळतील. व्यवसायाची स्थिती सुधारेल. कला आणि अभिनयाच्या जगाशी निगडित लोक महत्त्वपूर्ण कामगिरी करतील. प्रवासात मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. पैशांची बचत करण्यावर भर असेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्याने परिणाम आनंददायी राहतील. मित्र आर्थिक मदत करू शकतात. व्यवसायात सुख-सुविधा वाढतील. मिथुन राशी आज मन प्रसन्न राहील. सर्जनशील कार्यात गती येईल.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचा नुकताच मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे. यात सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर यांच्यासारख्या ताकदवान नेत्यांना मंत्रीपद मिळालीच नाहीत. अडीच-अडीच वर्षां फॉर्म्युला ठरल्याचं ऐकू येतंय. खरंतर त्यांनी सहा-सहा महिन्यांचा फॉर्म्युला केला असता तर सगळ्यांना मंत्रीपदं मिळाली असती असा टोला संजय राऊत यांनी लगावला. महायुती सरकारच्या मंत्र्याचा शपथविधी काल पार पडला, मात्र त्यामध्ये राज्यातील अनेक ताकदवान नेत्यांना वगळण्यात आलं, मंत्रीपद देण्यात आलंच नाही, त्यावरून राऊतांनी टोला लगावत महायुती सरकारवर टीका केली. जे आमच्याकडून सोडून गेले ते सत्ता, पद आणि पैसा या मोहासाठी गेलेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, अकार्यक्षमतेचे आरोप होते अशा अनेकांना वगळण्यात आलं आहे.…

Read More