धरणगाव : प्रतिनिधी दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत जखमी झालेल्या गारखेडा येथील अल्पवयीन मुलाचा जळगाव येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. अपघाताची घटना सोमवारी सायंकाळी गारखेडा-धरणगाव रस्त्यावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मित्राचा वाढदिवस असल्याने प्रथमेश सुधाकर पाटील (गारखेडे), तसेच वैभव विठ्ठल देशमुख (अनोरे), हितेश भगवान भोई (अनोरे), शिवराज पंकज पाटील (गारखेडे) हे इयत्ता नववीत शिकणारे चौघे मित्र धरणगाव येथे केक घेण्यासाठी दुचाकी क्रमांक एम.एच.१९, बी.सी. ८३५५ ने धरणगावकडे निघाले होते. त्यांची धडक समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच. १९, ए.बी. ७०९८ सोबत झाली. या दुचाकीवरून शेखर जितेंद्र महाजन (१९) आणि गायत्री जितेंद्र महाजन (२८) हे भाऊ-बहीण अनोरेकडे जात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी घराबाहेर दुचाकी उभी करून पार्सल देण्यासाठी गेलेल्या ‘कुरियर बॉय’च्या बॅगमधून एका जणाने दोन पार्सल चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि. १७ डिसेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास गणपतीनगरात घडला. बॅगमधून चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत युवराज पवार (३७, रा. पिंप्राळा) हे कुरियर वाटपाचे काम करतात. मंगळवारी (दि. १७ डिसेंबर) दुपारी १२ वाजता दिवसातील पहिलेच पार्सल देण्यासाठी ते गणपतीनगरात गेले. त्यांनी दुचाकी घराच्या बाहेर उभी करून ते पार्सल देण्यासाठी गेले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका जणाने दुचाकीवर ठेवलेल्या बॅगेतून टी-शर्ट आणि जॅकेट असलेले अंदाजे १० हजार रुपये किमतीचे दोन पार्सल चोरून नेले. दुचाकीजवळ आल्यानंतर…
जळगाव : प्रतिनिधी एका २२ वर्षीय तरुणीचा तिच्या नकळत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान घडला. याप्रकरणी तरुणीने १६ डिसेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल योगराज पाटील (२६, रा. अयोध्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात २२ वर्षीय तरुणी कुटुंबासह राहते. राहुल पाटील याने तिच्या नकळत तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. अत्याचार असह्य झाल्याने तिने १६ डिसेंबर रोजी…
जळगाव : प्रतिनिधी शैक्षणिक संस्थेला भाडेतत्त्वावर जागा देण्याचे ठरल्यानंतर इमारतीची दुरुस्ती, रंगरंगोटी करण्यासह साहित्याची खरेदी करण्यात आली. मात्र, मालकाने जागा देण्यास नकार देत संस्थाचालक युवराज प्रकाश बारी (३५, रा. धनश्रीनगर) यांची एक लाख ७१ हजार रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार २४ जून २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान घडला. याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी, संतोष पदमसिंग पवार (६५, रा. मुंबई) व राजेश भरत जाधव (रा. ओमशांती नगर, पिंप्राळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज बारी यांची शैक्षणिक संस्था असून, त्यांना प्ले ग्रुप, नर्सरीचे वर्ग सुरू करण्यासाठी जागा हवी होती. त्यांनी संतोष पवार व राजेश जाधव यांच्या इमारतीसाठी त्यांच्याशी…
जळगाव : प्रतिनिधी रक्कम तिप्पट करण्याचे आमिष दाखविण्यासाठी बेंग घेणाऱ्याला केवळ ताब्यात घ्यायचे आहे, असा बनाव करायचा असला, तरी त्यासाठी आलेल्या पोलिसांनी स्वतःच्या गणवेशाचा वापर करीत वर्दीतच हे कृत्य केले. मात्र, काही रकमेचा मोह या पोलिसांना चांगलाच महागात पडला आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराचा पोलिस कर्मचारीच मास्टर माइंड आहे. याप्रकरणी जळगावच्या पोलिस अधिक्षक कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तपासाअंती हे पोलिसच असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकास पाटील यांना क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. त्यामुळे जळगावात एका स्पर्धेदरम्यान त्यांची सचिन धुमाळ याच्याशी ओळख झाली, ते एकमेकांच्या संपर्कात आले. काही दिवसांपूर्वीच ते राजस्थान येथे फिरायला गेले होते. त्याचवेळी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव एसटी डेपोमधील बाभूळगाव मुक्कामाला जाणाऱ्या बसचा चालक आनंद माळी हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले आणि तत्परता दाखवत गाडी थांबवण्यास सांगून प्रवाशांनी विभाग नियंत्रकांकडे तक्रार केली. घटनास्थळी तत्काळ येत विभाग नियंत्रकांनी दुसऱ्या चालकाला बोलावून बस मार्गस्थ केली. मद्यधुंद चालकावर विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आगाराची बस (एमएच १४/बीटी२३०४) ही बाभूळगाव या गावाला दररोज रात्री मुक्कामी जाते. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री सुमारे ५० प्रवासी असलेली बस बाभूळगावाला निघाली. पाळधी गावाजवळील पुलाजवळ प्रवाशांना एसटीचा चालक आनंद माळी हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे लक्षात आले. प्रवाशांनी पाळधीजवळील एका हॉटेलजवळ…
बोदवड : प्रतिनिधी बोदवड ते मुक्ताईनगर रस्त्यावर नाडगावजवळील उड्डाणपुलाजवळ भरधाव कंटेनर दोन दुचाकींना धडकले. या अपघातात पाच मजूर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, नाडगाव येथील तरुण जखमींच्या मदतीला सरसावले. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने नेपानगरकडून (मध्यप्रदेश) बोदवडकडे येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडक दिली व तो पसार झाला. अपघातात दुचाकीवरील पाचजण जखमी झाले आहेत. यात सुनील भिलाला (२२, नेपानगर) यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून अनिल डोंगरसिंग गिराडे (२२) याच्या हातापायाची बोटे तुटली आहेत. अपघातात अन्य एकजण तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथील दोन तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच नाडगाव येथील अक्षय खोडके,…
मेष राशी आज तुम्हाला कुटुंब आणि भावांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत बढती होईल. व्यावसायिक योजनांमध्ये सहभागी होऊ शकता. जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल. व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील. आज उत्पन्नाची स्थिती चांगली राहील. आर्थिक व्यवहारात सावधगिरीने पुढे जाल. घाईघाईत निर्णय घेऊ नका. वृषभ राशी आज संपत्ती आणि भांडवलात वाढ होईल. कौटुंबिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. लोकांशी संपर्क वाढवण्यात रस असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंद आणि सहवास मिळेल. महत्त्वाच्या कामात गुंतलेल्या लोकांना भेटाल. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीचे सहकार्य मिळेल. गुंतवणुकीत रस राहील. आर्थिक नियोजनात यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित प्रकरणे सोडविण्याचा प्रयत्न कराल. मिथुन राशी परिचितांकडून चांगली बातमी…
नागपूर : वृत्तसंस्था नागपूरमध्ये राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, आज दि.१७ ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. आज नागपूर येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पोहोचले असून यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांना पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. वास्तविक परंपरेप्रमाणेच ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.उद्धव ठाकरे विधान भवन परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते माजी मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले कि, छगन भुजबळांनी अजून संपर्क केला नसला तरी छगन भुजबळ अधून-मधून माझ्या संपर्कात असतात, नाराज लोकांना आता आमची भूमिका योग्य वाटत आहे, असेही त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधी पक्षनेतर ठरवायला आणखी थोडा वेळ घेतला तर काय हरकत आहे. भुजबळांसह अनेकांच्या बाबतीत मला वाईट वाटले. काही जणांचे जॅकेट वाट बघत असतील अशा लोकांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो. अजितपवर…

