पुणे ; वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुणे शहर गुन्हेगारी घटनेने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा पुणे शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना घडली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू घेण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील सिग्नलवरती गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरुणांनी अश्लील कृत्य केले आहे. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. व्हिडिओ काढण्यापेक्षा पोलिसांना बोलवत जाब विचारायला हवा.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था आज जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केली आहे. एक खुन माफ करण्यात यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे थेट पत्राद्वारे केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे. मात्र त्यांनी अशी आगळीवेगळी मागणी करण्याचे नेमकं कारण काय? तर महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांवर संताप व्यक्त करत रोहिणी खडसेंनी ही मागणी केली आहे. रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या? रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चाही सातत्याने सुरू आहे. त्यातच एकनाथ शिंदेंचे जवळचे मानले जाणारे अजय अशर यांना ‘मित्रा’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्याने पुन्हा या चर्चेने वेग पकडला. मात्र, आमची कामे पाहूनच विरोधकांना अंदाज आल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या पसरवत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच, त्यांनी महायुतीत कोणीही नाराज नसल्याचेही स्पष्ट केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी नाराजी नाट्यावर देखील ते बोलले. ‘सरकारला मिळालेल्या प्रचंड…
पाचोरा : प्रतिनिधी ‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना’ याचा प्रत्यय वरखेडीसह पंचक्रोशीत आला. आजारी असलेल्या वडिलांचा निरोप घेऊन तो दहावीच्या पेपरला गेला आणि तिथून परतल्यावर त्याला वडिलांच्या मृत्यूची वार्ताच समजली. मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी खुर्द येथील रहिवासी दशरथ हरी पाटील (४१) यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा मुलगा शुभम हा लोहारा येथील परीक्षा केंद्रावर १० वीची परीक्षा देत आहे. शुक्रवारी त्याचा भूमितीचा पेपर असल्याने तो सकाळी ८:३० वाजता पेपर देण्यास गेला. जाण्यापूर्वी त्याने वडील दशरथ पाटील यांची भेट घेतली आणि मन घट्ट करीत तो पेपर देण्यासाठी पोहोचला. तिकडे शुभम हा परीक्षा देण्यासाठी गेला आणि इकडे वडील…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळातून डिझेलची चोरी करून मध्य प्रदेशाकडे पळणाऱ्या चोरट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाइलने अटक केली. पोलिसांच्या सापळ्यात तिघे अडकले आहेत. त्यांच्याकडून ४०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे काही चोरटे कारमधून ४०० लिटर डिझेल भरून भुसावळहून पळाले. ही माहिती भुसावळ पोलिसांकडून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. चोरी करणारे मध्यप्रदेशाकडे जाण्याची शक्यता ओळखून त्यांनी मुक्ताईनगर चौकात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला. पोलिस कर्मचारी सोपान वंजारी यांनी तातडीने कार्यवाही करत या ठिकाणी एक ट्रक रस्त्यावर आडवा लावला. यामुळे चोरट्यांना पकडने पोलिसांना सोपे झाले.मुक्ताईनगर येथे पोलिसांनी रस्त्यावर ट्रक आडवा लावल्यामुळे समांतर रस्त्यावरून वेगाने येणारी चोरट्यांची गाडी…
भुसावळ : प्रतिनिधी सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाख रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकूड मारून गंभीर जखमी केल्याची घटना कंडारी येथे ६ मार्च दुपारी २.३० वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलीप गणपत महाजन (वय ६२) यांनी तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा हेमंत महाजन याने घर बांधकामासाठी वडिलांकडे पैसे मागितले, परंतु त्यांनी नकार दिल्याने त्याने त्यांच्यावर हल्ला केला. तपास पो. कॉ. विकास बाविस्कर करीत आहेत. दरम्यान, या घटेनबाबत परिसरातील रहिवाशांनी मुलाच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.
जळगाव : प्रतिनिधी मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे आश्वासन देत जळगावचे माजी नगरसेवक नवनाथ विश्वनाथ दारकुंडे यांची तब्बल ९ लाख १८ हजार ५०० रुपयांत ऑनलाइन फसवणूक झाली. या संदर्भात गुरुवारी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादीनुसार नवनाथ विश्वनाथ दारकुंडे (वय ५५, रा. शिवाजीनगर, जळगाव) यांना त्यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून किरण आनंदा सानप, संगीता किरण सानप, समीक्षा किरण सानप (तिघे रा. ठाणे), शैलेश विनोदराय शुक्ला (रा. मुंबई) आणि दिवाकर राय (रा. दिल्ली) या पाच जणांनी वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ९ लाख १८ हजार ५०० रुपये स्वीकारले. त्यानंतर…
मेष राशी कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचा संयम कोणत्याही प्रकारे कमी होऊ देऊ नका. नवीन व्यवसाय सुरू कराल. सरकारी नोकरी ऐवजी खाजगी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी आज प्रेम संबंधात जवळीकता येईल. प्रेमविवाहातील अडथळे दूर होतील. पालकांकडून सकारात्मक वागणूक मिळेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. पती-पत्नीमध्ये आनंद आणि सहकार्य राहील. महिला दिनानिमित्त पत्नीसाठी काही खास प्लानिंग कराल. मिथुन राशी आज मालमत्तेशी संबंधित वादात पडू नका. खरेदी विक्री करताना विशेष काळजी घ्या. घाईगडबडीत कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्व मित्रांच्या मदतीने प्रलंबित कामे पूर्ण होऊन कामे मार्गी लागतील. कर्क राशी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा…
मुंबई : वृत्तसंस्था नाशिक, जळगाव जिल्ह्यांना सिंचनाचा मोठा फायदा करून देणाऱ्या नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पास शानसाने यापूर्वीच मान्यता दिली होती. आता त्याची पुढची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्याची निविदा काढण्यात आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही माहिती दिली. नार पार प्रकल्पाचा खर्च ७ हजार १५ कोटी २९ लाख रुपये आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून धरणांमधून ९.१९ टीएमसी पाणी उचलून १४.५६ किमी बोगद्याद्वारे गिरणा नदी पात्रात चणकापूर धरणाच्या बाजूस पाणी सोडण्यात येईल. यामुळे ४९ हजार ७६१ क्षेत्र सिंचित होणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषण ठरावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्यात सुरु असलेल्या सिंचनाच्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.…
जालना : वृत्तसंस्था वाळू व मुरूम माफियांचा राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ सुरु असतांना आता महिला दिनाच्या पूर्वी जालना जिल्ह्यातील परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्या पथकावर मुरूम उत्खनन करणाऱ्या माफियांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. यावेळी तहसीलदार प्रतिभा गोरे या देखील पथकासोबत होत्या. रात्री साडेबाराच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समजते. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या प्रकरणी तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रतिभा गोरे यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक 07/03/2025 रोजी मी माझे खाजगी वाहन क्र. MH.22.AW.9305 ने अवैध गौनखणीज उतखनन प्रतिबंधामक कार्यवाही करत असताना रात्री 12.50 वाजेच्या सुमारस इंदिरानगर परतुरच्या पुढे आबा…

