केस पांढरे होणे ही आज अनेकांची समस्या बनली आहे. केमिकलयुक्त हेअर डाय वापरण्याऐवजी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतील, तर स्वयंपाकघरात सहज मिळणारी हळद उपयोगी ठरू शकते. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. केसांसाठी हळद का फायदेशीर? हळद केवळ आरोग्यासाठीच नव्हे, तर केसांच्या मुळांना पोषण देण्यासाठीही उपयुक्त आहे. नियमित वापर केल्यास केसांचा नैसर्गिक रंग टिकवण्यास मदत होते आणि केस मजबूत होतात. या उपायासाठी लागणारी सामग्री 2 चमचे हळद 1 चमचा चहापत्ती 2 चमचे कोरफड जेल 1 चमचा मेहंदी 1 व्हिटॅमिन E कॅप्सूल पाणी (आवश्यकतेनुसार) वापरण्याची सोपी पद्धत 1. प्रथम एका कढईत 2 चमचे हळद घालून मंद…
Author: editor desk
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरल्याने सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहीत “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं… पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे विधान केले होते. या वक्तव्यावर टीका करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी “दो कदम पीछे नहीं हटे… ५० कदम नीचे गिरे हैं, वह भी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली असून ते भाजपचे १२ वे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले आहेत. मंगळवारी भाजप मुख्यालयात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून नितीन नवीन यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. लोकांना प्रश्न पडेल की मोदी इतक्या लहान वयात मुख्यमंत्री कसे झाले, पण मी आजही स्वतःला कार्यकर्ता मानतो. आता नितीनजी माझे बॉस आहेत आणि मी एक कार्यकर्ता आहे.” राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी नितीन नवीन यांनी दिल्लीतील भगवान वाल्मिकी मंदिर, गुरुद्वारा बांगला साहिब आणि झंडेवालन मंदिराला भेट देत…
नागपूर : वृत्तसंस्था जन्मापासूनच वडिलांसोबत न राहता आईसोबत वास्तव्यास असलेल्या मुलाला आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. याबाबत भंडारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आईच्या कागदपत्रांचा विचार करून निर्णय घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकाकर्त्या मुलाचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वीच विभक्त झाले होते. त्यामुळे मुलगा जन्मापासून आईसोबतच राहत असून, त्याच्या पालनपोषणात वडिलांचा कोणताही सहभाग नव्हता. मुलाचे वडील मध्य प्रदेशचे रहिवासी, तर आई महाराष्ट्रातील रहिवासी आहे. दोघेही ‘लोहार’ समाजातील असले, तरी दोन्ही राज्यांत हा समाज ‘भटक्या जमाती’ (NT) प्रवर्गात मोडतो. मुलाने २०२१ मध्ये जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असता, वडिलांच्या जातीचे पुरावे सादर न…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप आपल्याच नगरसेवकांवर पाळत ठेवून त्यांचे फोन टॅप करत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही बोचरी टीका केली. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ब्लॅकमेल करून स्थायी समिती पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. “त्यांना महापौरपदापेक्षा स्थायी समितीतच जास्त रस आहे. जिथे पैशांचे व्यवहार, ठेकेदारीचे घोटाळे होतात, तिथेच या लोकांचा ओढा असतो,” असा आरोप त्यांनी केला. मुंबई महापौरपदाबाबत बोलताना राऊत म्हणाले की, भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही परिस्थितीत महापौरपदावरचा दावा सोडू नका, असा आदेश देण्यात आला आहे. “भाजपचा महापौरपदावरील दावा सुटणार नाही.…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील मुंगसे ते सावखेडा रस्त्यावर वाळूचा उपसा करण्यासाठी लागणारे मजुर घेऊन जाणारे ट्रॅक्टर सोमवारी सकाळी उलटून झालेल्या अपघातात १५ मजूर जखमी झाले आहेत. जखमींवर धुळे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंगसे ते सावखेडा रस्त्यावर वाळूचा उपसा करण्यासाठी लागणारे मजुर घेऊन जाणारे ट्रॅक्टर सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उलले. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता घडली. तर अपघात घडल्यानंतर तत्काळ १०८ अॅम्बुलन्सला कॉल करण्यात आली. परंतु, ही अॅम्बुलन्स तब्ब्ल ४ तास उशिरा आल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर जखमी मजुरांना खासगी वाहनांनी दवाखान्यात नेण्यात आले. या अपघातात ज्ञानेश्वर भाईदास भील, राहुल तुकाराम भील, अजय बन्सी भील, लखन…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात शेतातील बांधावर असलेले झाड तोडल्याच्या कारणावरून एका महिलेचा विनयभंग करून मारहाण व शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघा सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शेताच्या बांधावर असलेले निंबाचे झाड तोडले, या कारणावरून संशयित दोघे पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ करत होते. हे पाहून पीडित महिला शिवीगाळ का करताय, असे विचारत असता संशयितांनी महिलेलाच अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिचा विनयभंग करुन मोबाईल फोन हिसकावत दांड्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या पीडित महिलेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…
आजचे राशिभविष्य दि.२० जानेवारी २०२६ मेष : राशीच्या लोकांना पैसे जमा करण्यात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमची आर्थिक स्थिती काही प्रमाणात कमकुवत राहू शकते. तथापि, मित्रांच्या मदतीने समस्या सोडवता येतील. वृषभ : राशीच्या लोकांसाठी, भाऊ, बहिणी आणि मित्रांशी संबंधित बाबी काहीशा कमकुवत राहतील. तुमच्या राहणीमानातही बदल करावेसे वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने महिना त्रासदायक राहील. मिथुन : राशीच्या लोकांना विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे आकर्षित केले जाऊ शकते. व्यवसायात फायदेशीर बदल होऊ शकतात. तुम्हाला मोठी रक्कमही मिळू शकते. कर्क : राशीच्या लोकांनी घाईघाईने कोणतेही काम करू नये. तुम्हाला विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे आकर्षित केले जाऊ शकते. व्यवसायात फायदेशीर बदल होऊ शकतात. सिंह :…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या दोघांचेही लव्ह मॅरेज झाले होते. हत्या केल्यानंतर काही तासांतच आरोपी पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना महाराजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुमा परिसरातील न्यू हायटेक सिटी येथे घडली. मुस्कान रुग्णालयाच्या वर असलेल्या भाड्याच्या घरात पत्नीचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचे नाव सचिन…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार, या प्रश्नावरून महायुतीतील अंतर्गत राजकारण तापले असून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात उघड रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे गटाने मुंबईत अडीच-अडीच वर्षांचा महापौरपदाचा फॉर्म्युला मांडत भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असताना, भाजपने थेट शिंदे गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या महापौरपदावर दावा सांगून राजकीय पलटवार केला आहे. सध्या ठाणे महापालिकेत शिंदे गटाचे बहुमत असले तरी सत्ता टिकवण्यासाठी भाजपची साथ आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्याच्या महापौरपदावर भाजपचा हक्क असल्याचा ठाम दावा केला आहे.डावखरे म्हणाले, “ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले असले तरी भाजपचा सन्मानही…

